Skip to main content

नाराजीनामा

लेखक बाजीगर
Published on बुधवार, 05/03/2025
अखेर ते घडले दागी मंत्री पडले ।। मंत्रिपदाचे ते कवच, भ्रष्टांना असते हवंच ।। कवच असता न्याय ओलीस, कवच नसता ओढतील पोलीस ।। म्हणे फोटो पाहून हेलावले, राजीनाम्याला पेन लावले ।। पोलीस,राजकारणी, मीडिया, डॉक्टर, न्याय, सर्वांची आहे मिलीभगत, वोटर जनता पाहतेय भांबावल्यागत ।। एकेक निर्णयाला लागतेय सदी, एक पडला, दुसरा कधी ?!

लातूरच्या पानगांवमध्ये आकाश दर्शन व विद्यार्थ्यांसोबत संवाद

लेखक मार्गी
Published on सोमवार, 03/03/2025
विज्ञान प्रसाराची "सुदिशा" नमस्कार. काल 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेच्या पानगांव जि. लातूर शाखेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलांसाठी व मोठ्यांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. लातूरचे खगोलशास्त्रज्ञ श्री. राजकुमार गव्हाणे सरांमुळे हा सहभाग घेता आला. आकाशात आपण तारे वर्तमानात जरी बघत असलो तरी त्यांचा प्रकाश भूतकाळातला असतो, तशी प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी सरांसोबतच्या जुन्या नात्याची नव्याने ओळख झाली! माझं गाव परभणी, त्यामुळे लातूर तसं जवळचंच!

दिसे ची ना

लेखक बाजीगर
Published on रवीवार, 02/03/2025
प्रसंग बाका, वाल्या च आका, दिवसा डाका, दिसेचीना।। पवन चक्की, जेल ची चक्की, गोष्ट पक्की, होईचिना।। सरपंच, रंगमंच, भ्रष्ट संच, न्याय चि ना ।। दागी मंत्री, गुन्हे जंत्री, राजीनामा, मागेचीना।। पळालं आंधळं, पोलीस पांगळं, दिसतंय सगळं सापडेचीना ।।

इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती

लेखक मार्गी
Published on शनीवार, 01/03/2025
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war! ✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे ✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक ✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा ✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज ✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा ✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज ✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा ✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट नमस्कार.

बाजाराचा कल: ३ मार्चचा आठवडा

Published on शनीवार, 01/03/2025
मंडळी, ज्यांना २२१०० या पातळीचे डोहाळे लागले होते, त्यांच्या नवसाला मार्केट अखेर पावले! मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की). बाय-द-वे - युयुत्सुनेटची ट्रेनिंग-डेटा वरची अचूकता आता जबरदस्त आहे आणि १० भाकीतांना फक्त ~३ मिनिटे इतका वेळ लागतो. त्यामुळे इथून पुढे युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल अशी आशा करूया... पुढे काय? क्लेमास्पेस डायाग्रॅम्वर निफ्टी वर जायची शक्यता १००% दाखवत आहे.

शिवजयंती विशेष - केंजळगड, रायरेश्वर आणि कारी-आंबवडे परीसर

Published on शुक्रवार, 28/02/2025

केंजळगड

.....पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला एक डोंगरी किल्ला. केळंजा या नावानेही ओळखला जाणारा हा किल्ला, वाई तालुक्यात, वाई शहरापासून वायव्येस साधारणपणे ३० किलोमीटर अंतरावर, तर पुण्याहून भोरमार्गे अंदाजे ९० किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. यादवकाळात वाईभोवती बांधण्यात आलेल्या, पांडवगड, वैराटगड, कमळगड यांच्याच मांदियाळीतील एक गड अशी याची ओळख. समुद्रसपाटीपासूनची उंची अदमासे ४२७५ फुट भरावी. गडाच्या पश्चिम बाजूला रायरेश्वराचे प्रचंड पठार गडापेक्षाही जास्त उंचीवर म्हणजे साधारणपणे ४५०० फुट उंचीवर पसरलेलं आहे.

We Rbots.

लेखक भागो
Published on शुक्रवार, 28/02/2025
जडव्यागळ असा असा कोणताही शब्द कोशात नाहीये, सर. तुम्हाला जगड्‌व्याळ असे म्हणायचे आहे का? नाही. पण असाच एक शब्द आहे. त्याचा अर्थ काहीसा असा आहे म्हणजे किचकट, गुंतागुंतीचे, समजण्यास अवघड. तुम्हाला जडजंबाळ असे म्हणायचे आहे का? थँक्यू. आवडली का? काय आवडली का, सर? कविता रे. सिंटक्स तपासला सर,बरोबर आहे. मला शब्दांच्या पलीकडले काही समजत नाही. असे म्हणजे मनात काही हलल्यासारखे वाटत नाही? गलबलल्यासारखे वाटत नाही? अंग मोहरून येत नाही? अंगावरून पीस फिरवल्यासारखे... कुठलीही गोष्ट हलण्यासाठी फोर्सची गरज लागते असे न्यूटनचे नियम सांगतात. तसा काही फोर्स इथे दिसत नाहीये.

हे जीवन सुंदर आहे...मराठी भाषा गौरव दिन.

Published on गुरुवार, 27/02/2025
"फुलांच्या त्या धुंद रंगोत्सवात चांदणीएवढे दिसणारे निळे फूल, शालीनपणे उमलले. त्याच्या तरल नाजूक वासाने वाऱ्याचे मन मोहरले.काळ्या पंखांवर लाल ठिपके असलेले एक फुलपाखरू इतर फुलांना सोडून त्याच्याकडे आले व त्यावर स्थिरावले. थोड्या अवकाशाने त्याचा गंध पाझरला,रंग कोमेजला आणि अंग आकसून फूल जमिनीवर गळाले. "हे तुझं आयुष्य! क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन!" तेथून उडून जाताना फुलपाखरू म्हणाले. झळाळणाऱ्या आभाळाखाली वाऱ्याच्या लहरीवर ते आर्त स्मृतीप्रमाणे तरंगू लागले. आनंद चाखायला खाली फुलांचा गालीचा, उडायला वर स्फटिकाप्रमाणे आभाळ ! तोच निळ्या रंगाचा लाल चोचीचा एक पक्षी आला.

नांदेड जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

लेखक vcdatrange
Published on गुरुवार, 27/02/2025
गेल्या आठवड्यात धावता नांदेड दौरा होता. अगदी थोडा वेळ काढूनही शहरा नजीकच्या प्राचीन मार्कंडेय शिव व ऋषी मंदिराला भेट दिली. मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्त्याचे अर्धवट काम सुरू असल्याने प्रत्येक ठेचीला सोबतींच्या शिव्या खात गोदावरी किनारच्या या मंदिरात पोहोचलो. परिसर आणि बाह्य भागाचे सुशोभिकरण सुरू असल्याने प्रथमदर्शनी निराश होत मंदिरात प्रवेश केला. शिव मंदिराची संपूर्ण वास्तूचे दगड क्रमवार उतरवून ठेवले आहेत. होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर देखील अश्याच पद्धतीने पूर्णत नव्याने रचले आहे. सध्याच्या वास्तूत कोणतेही कलाकुसर नसलेला मुख्य मंडप व गर्भगृह अद्यापि शाबुत आहे.

संकल्प - मराठी भाषा गौरव दिन

लेखक आकाश खोत
Published on गुरुवार, 27/02/2025
साहित्य संमेलनातलं मोदीजींचं आणि संमेलनाध्यक्षांचं भाषण ऐकलं आणि एका माहित असलेल्या गोष्टीची पुन्हा जाणीव झाली. मराठीला सरकारने अभिजात दर्जा दिल्यामुळे सरकार जे काही उपक्रम सुरु करेल त्याचा आर्थिक लाभ काही मराठी मंडळींना नक्कीच होईल. पण मराठीला लाभ तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आम्ही जाणीवपूर्वक मराठीसाठी काही करू. दुसऱ्यांशी संवाद साधायला म्हणुन भाषा हा अगदी प्राथमिक उपयोग झाला. आपल्याला ज्या संस्कृतीचा अभिमान असतो ती आपल्यापर्यंत पोहोचते ती भाषेमुळेच. भाषा आपल्याला माध्यम तर देतेच पण ओळख सुद्धा देते.