भूपाळी
आज खूप दिवसानंतर मी सकाळच्या वेळी भूपाळी गायली. तसा आपला आवाज खूप दमदार आहे. ते पहाडी का काय म्हणतात ना... तस्साचं... निमित्त होते माझ्या भावाला उठवण्याचे. तसा तो नेहमीच माझ्या आधी उठत असतो, पण काल जवळपास पहाटे चार वाजेपर्यंत एडिटिंगचे काम करत बसला होता. त्यामुळे मग सकाळी फक्त दोन तीन तासात जाग येणे कितपत शक्य आहे? अर्थात व्यवसाय म्हटला की या गोष्टी येतातच. रात्री कितीही वाजता झोपला तरी सकाळी ९ वाजता ऑफिसला जावेच लागते... त्याला हो... इथे त्याच्याबद्दल बोलतोय मी. तर... काय सांगत होतो? हां आठवलं... मी गायलेली भूपाळी...
ग म भ न श्रेणी नैवेद्य!
h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta
मिपाकरांच्या घरचे गणपती
h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
f
गणपती आले..
h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta
दर्शनमात्रे मनकामना पूर्ती
गणपती आलेले आहेत , घरोघरी आरत्या ऐकू येत आहेत ... वेळेनुसार देवांकडे काही मागणी करणे हा आस्तिकांचा स्वभाव आहे , काही गोष्टी मिळतात , काही नाही ... त्यात देवाचा किती सहभाग असतो हे तोच जाणे .... पण एकूणच देवाकडे विशेषतः घरी आणलेल्या गणपती कडे एखादी गोष्ट मनापासून मागावी आणि ती मिळू नये असं झाल्यावर देवाकडे काही मागण्यावरून लोकांचं मन उडतं असं होतं का ? आरत्या किती लोक शब्दांकडे लक्ष देऊन म्हणतात , त्यावर विचार करतात माहीत नाही त्यामुळे दर्शनमात्रे मनकामना पूर्ती ह्याचा विचार नसेलही केला कुणी .....
गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!
गणेश पूजा... सन १९७२
बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!
भाग १
हवाईदलातील माझ्या आठवणी...
१९७१साली बांगलादेशच्या लढाईची सांगता भारत विजयी होऊन झाल्याने आनंदी वातावरणात गणेशाचे आगमन झाले होते. हवाईदलातील चंदिगढ स्टेशनमध्ये मला पहिल्या पोस्टींगवर रुजू होऊन ५-६ आठवडे झाले होते. तेंव्हा सेक्टर १९ मधील एका मंदिरात सिव्हिलियन्स सोबत हवाईदलातील एयरमन गणेशोत्सव साजरा करत असत.
त्यावेळेस झालेली विसर्जनाची मिरवणूक आजही लक्षात राहिली आहे.
कल्पना करा, गणेशाच्या मोठ्या मोठ्या १०० च्या वर मूर्ती हार-माला घालून आर्मीच्या ट्रकवर सजवून निघालेल्या आहेत.
शतशब्द कथा!
हो, मी खोटं बोलते. काय करणार, पांढऱ्या वस्त्रावर काळे आवरण घालण्याची आमची प्रथाच आहे. कोर्टातून बाहेर निघाल्यावर नेहा भेटली. नोटा मोजून घ्यायची गरज नव्हती कारण दिलेल पाकिट जड होतं आणि नेहा प्रामाणिक!
अजूनही आठवते आहे..... समीरच प्रेत....तिचे रक्ताने माखलेले हात.... खूनाचा आरोप.... अटक झाली तेव्हा केवढी सैरभैर झाली ती! मी केस घेतली. शेवटी फॅमिली फ्रेंड. कोर्टाला पटले - कुंडीवर डोके आपटून अपघाती मृत्यू.
रक्ताच्या थारोळ्यातल्या प्रेताला तिने हलवून पाहिले. नवरा कसाही असला, तरी त्यांच्या बायका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतातच. आता हेच बघा ना.... छोट्याश्या भांडणाचं निमित्त.
आवंढा
माझा एक मित्र आहे. तो चित्रपट, टीव्ही सिरीयल यासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो. मधून अधून काही चित्रपटात, टीव्ही सिरीयल मध्ये छोट्या भूमिका देखील करतो. पण ते फक्त हौस म्हणून. मुख्य काम मात्र डायरेक्टरला असिस्ट करण्याचेच. परवा त्याची आणि माझी बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. खरं तर तो असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे काय हेच मला नीट समजत नव्हते. मग त्याला विचारलेच.
“यार... तू असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे नक्की काय करतोस? कित्येक वेळेस तर तू टीव्हीवर दिसतोस पण तुझे नाव मात्र कोणत्याच यादीत दिसत नाही. असे कसे?” मी भाबडेपणाने प्रश्न विचारला.
“अरे काही नाही रे...
पर्वतांतली मध्यरात्र
चमचमणारं स्फटिकरत्न आकाश माझ्या खिडकीतून आत पसरलंय
माझ्या खोलीतल्या अंधाराचा बाडबिस्तरा बाजूला सारून
सूचिपर्णी वृक्ष उंच गेलेत, अनादी काळापासून तसेच स्तब्ध
बर्फ, वादळं, पाऊस, या सगळ्या महाभूतांशी नजर भिडवून
माझी एकटी कुटी कडेलोटाच्या टोकावर तोल सावरून उभी आहे
जणू गगनचुंबी इमारतीच्या माथ्यावरचं माझं पर्सनल पेंटहाऊस!
अथांग दरीपलिकडे, अंधुक, गूढ क्षितिजावर आहेत अजूनही उत्तुंग शिखरं
युगानुयुगे बर्फाचा तोच आरसा चंद्राला एकटक दाखवताहेत
दूरवरून येतंय आर्त, सामूहिक, अखंड शृगालरुदन
निसर्गाचे एकनिष्ठ गस्तकरीच ते
कसं कोण जाणे, माझ्या मेंदूला दिलासा देतायत
की बाबा, तू एकटा नाहीयेस
..
..
आणि एकाकी
मिसळपाव