Skip to main content

क्लीक - ३

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 20/09/2019 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
डिंग डाँग…" बेलचा आवाज आला. वाजले वाटते पाच. इतकी पक्की वेळ पाळणारा शिर्‍या ग्रेटच म्हणायला हवा. मी कानोसा घेते. " या या या" बाबाचा आवाज " घर सापडायला काही त्रास तर झाला नाही ना" हे वाक्य मी म्हणायचं ठरवलं होतं. बाबा का म्हणतोय! प्रोजेक्ट कॉऑर्डिनेशन नीट व्हायला हवं." विनायकराव नाही आले" बाबा कोणाला तरी विचारतोय. "नाही त्यांना अचानक...…" एक मस्त हरीश भीमाणी सारखा घनगंभीर आवाज उत्तर देतो. पोटात गुदगुल्या होतात या आवाजाने.
मागील दुवा: http://misalpav.com/node/45328 हा बहुतेक शिर्‍याबरोबर जे कोणी आलंय त्यांचा आवाज असणार.

खेड्यातली विहीर, दहीहंडी आणि मोनालिसा!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 19/09/2019 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुइक . . . . पुइक चक्क एका शुक्रवारी संध्याकाळी खुद्द कोरेगाव पार्कच्या पाचव्या गल्लीत पार्किंगला जागा मिळाल्याच्या आनंदात मी विजयोन्मादाने २-२ वेळा बटण दाबून गाडी लॉक केली. आज त्या जगन्नियंत्याची माझ्यावर कृपादृष्टी आहे... आज मुझे कोई नहीं रोक सकता.... हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा,डळमळू दे तारे .... मला काही फरक पडणार नव्हता... साक्षात नॉर्थ मेन रोडवर पार्किंग! माझ्या चालण्यात आपोआपच एक रुबाब आला....spring in the stride वगैरे जे म्हणतात ते हेच असावं. त्याच धुंदीत, झोकात, कैफात चालत असतानाच समोरून एक ओळखीचा चेहरा येताना दिसला. मन अचानक २५ वर्षं मागे गेलं.

ठाकठोक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 19/09/2019 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
ठाकठोक --------- मी तसा ओके आहे . फक्त एक गोष्ट सोडता . मला जास्त आवाज आवडत नाही . सहनच होत नाही. पण वरच्या मजल्यावरची ती जीवघेणी ठाकठोक ! ती बाई हे सारं मुद्दाम करते . मला त्रास द्यायला. छळायला. यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा; नाहीतर मी मरून जाईन असं वाटतं. आज मला बरं वाटतंय. शांत शांत . वेगळंच .कारण वरचा आवाज बंद झालाय. पण पोलीस आले आणि त्यांनी मला धरलं . “का खून केलास तिचा ?” एका पोलिसाने विचारलं. मला काहीच आठवत नव्हतं. सांगणार तरी काय? एका कामवालीने मध्येच तोंड घातलं ,” साहेब, ती बाईसुद्धा वेडसर होती. तिला सारखा पालींचा भास व्हायचा .

सायकल दौरा पूर्वेचा घाट- का, कुठे, कसा?

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 19/09/2019 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
का घातला घाट? या प्रश्नाला एकच उत्तर आहे शौक (हाच शब्द अधिक सोज्वळ आहे). खरे सांगायचे तर सायकलिंग हा शौक आहे, छंद आहे. निव्वळ फिट आणि तंदुरुस्त राहायला बरेच स्वस्तातले उपाय उपलब्ध आहे. शौक असल्याशिवाय कुणीही सायकलिंगवर पैसे उधळायला तयार होणार नाही.

क्लीक- २

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/09/2019 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
"अगं मुलाला भेट. बोला दोघे. कसं वाटतंय ते फील करा मग पुढे पाहू काय करायचं ते." गांगरलेल्या बॉलरला कॅप्टनने येवून पाठीवर हात ठेवत दिलासा द्यावा तस्सा बाबाने मला दिलासा दिला. "तु भेट एकदा श्री ला .भेटेल ग ती " बाबाने आईला परस्परच सांगुन टाकले. बाबाला नाही म्हणणं अवघड जातं. पक्का सेल्स्मन आहे. निदान भेटीसाठी तरी मी तयार झाले या आनंदात आईने चहात तिसर्‍यांदा साखर घातली आणि तोंड गोड करा म्हणून तो कप बाबापुढे ठेवला. मागील दुवा http://misalpav.com/node/45318 बरीच फोनाफोनी करत आजचा दिवस मुक्रर केला गेलाय.

केरळ मध्ये फिरण्यासंदर्भात माहिती हवी आहे

लेखक सान्वी यांनी गुरुवार, 19/09/2019 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही डिसेंबर महिन्यात केरळ मध्ये मुन्नार व आलेपी येथे फिरायला जाण्याचे नियोजन केले आहे. खूप वर्षांपासून केरळ पाहण्याची इच्छा शेवटी पूर्ण होणार आहे. कुठल्या टूर कंपनी बरोबर नसून आम्ही आमचे प्रवास करणार आहोत. सोबत २ वर्षांचा मुलगा आहे. मुन्नार येथे 4 दिवस आणि अलेपिला 2 दिवस मुक्काम आहे. कोणी जाऊन पाहिले असल्यास काय पाहावे हे सुचवा.

FLAME

लेखक राजे १०७ यांनी बुधवार, 18/09/2019 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
वीस बावीस वर्षे वयाचे आम्ही एका कॉलेजात शिकायला होतो. मी, सात्या, पव्या, आस्क्या, राजू आणि गुडघ्या एका रुमवर रहात होतो. आमच्या घरमालकाची मुलगी मला लयी लाईन देत होती पण राजाला ते देखवलं नाही. राजानं तिला बहीण मानावं असं फर्मान सोडले. आमच्यात राजा सभ्य नि निर्व्यसनी असल्यानं, हुशार मुलगा रुम पार्टनर आहे म्हटल्यावर आमच्या खोडींकडे बाकीचे कानाडोळा करत. त्यामुळे त्याचं ऐकणं भाग होतं. मी पण उजीवर (उज्वला) लाईन मारणं सोडून दिले. गुडघ्याला मात्र राजाचा लयी राग आला. एक दिवस गुडघ्यानं मला एक पोरगी दाखवली. म्हणला हिला मी पटवणारच. पोरगी धिप्पाड , भरलेली व जवान होती. मोठ्या खानदानी घरातली वाटत होती.

दिवाळी ओवाळी

लेखक राजे १०७ यांनी बुधवार, 18/09/2019 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ आली की आमच्या मुलांच्या टोळ्या तयार व्हायच्या. वसू बारसे पासून देवांना आणि तुळशीला, गायींना ओवाळण्यासाठी अंधार पडला की घरोघरी जाऊन गाणी म्हणत पाच दिवस ओवाळायची पध्दत होती आमच्या गावाला. शेवटच्या दिवशी ज्यांच्या घरी ओवाळलं त्यांच्या कडून सकाळी सकाळी पैसे घेत असू. नंतर सारखे वाटे करून आपापसात वाटून घेत असू. हे पैसे टिकल्या, लवंगी, चिमणी फटाके, भुईचक्कर, टिकल्यांचा पट्टा, शिट्टी विकत घेण्यास खर्च करायचो. कंजूस लोकांच्या घरी मुद्दाम खट्याळ गाणी म्हणायचो. व त्या घरच्या लोकांची जिरवायचो. तर ती गाणी अजूनही तोंडपाठ आहेत. १) दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. गाई कुणाच्या?

आणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो.

लेखक राजे १०७ यांनी बुधवार, 18/09/2019 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
नव्वद ब्याण्णव असं काही तरी साल असेल. मला पुण्याला भेट द्यायला फार आवडायचं. लक्ष्मी रोड वर नामांकित ज्योतिषांकडे भविष्य पाहणे, तुळशीबागेत नुसतं भटकणं, सारसबाग, पर्वती, संभाजी उद्यान वेळ मिळेल तिकडे भटकणं आणि खादाडी करणं हा सोलो प्रोग्राम असायचा. पिएमटीने कमी पण पायी खूप फिरायचो. मला नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू पहिल्या पासून खूप आवडायच्या. लहान रेडिओ, घड्याळं, विजेऱ्या अशा वस्तूंच्या शोधात मी कॅम्प मध्ये सायंकाळी भेट द्यायचो. अरोरा टॉवर परिसरात सायंकाळी रस्त्यावर असे विक्रेते स्वस्तात अशा गोष्टी विकायचे. आजकाल कुठेही चायना इलेक्ट्रॉनिक व इलक्ट्रीक वस्तू मिळतात.

(दुपारी)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 18/09/2019 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात चाल :- बीज अंकूरे अंकूरे (जिथे चालीत निमुट पणे बसणार नाही तिकडे दडपून कोंबा) ही चाल जमली नाही तर "डोळे कशा साठी"च्या चालीत बसवा, तेही नाही जमले तर "शुरा मी वंदीले" ते ही नाही जमले तर "आज ब्लु है पानी पानी" ते ही नाही जमले तर "अरुणी किरणी धरणी गगन झलके" आणि ते ही नाही जमले तर नुसती वाचा.