सैराट
सैराट
पाहता तिला भर दुपारी, पहाट होत जातो मी
चाकरी कुणाची असो, कंत्राट होत जातो मी.
*
तसा बर्फ-गोळा हेच नाव साजरे मला
बोलता ती कुणाशी, सैराट होत जातो मी.
*
मार्गिका असे माझी, सरळ नाकासमोरी
उल्लेख होता तिचा, भन्नाट होत जातो मी.
*
मी कुणाला काय द्यावे? लायकी माझी नव्हे
कफल्लक होत असता, खैरात होत जातो मी.
*
-डॉ. अशोक कुलकर्णी (एपी)
मिसळपाव
पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पंतप्रधान झालेच नसते तर? (पूर्वप्रकाशन “’मैफल’ ई-दिवाळी अंक-परिसंवाद)
लेखक: सुधीर काळे
भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान?
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हां मी ५ वर्षाचा होतो. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळच्या पहिल्या १० वर्षांच्या खेळ व शाळेच्या अभ्यासाखेरीजच्या कुठल्याच घटना मला आठवत नाहींत. मला साधारणपणे १९५६-५७ पासूनच्या आठवणी आहेत.