Skip to main content

अनटायटल टेल्स ४

लेखक मकरंद घोडके यांनी गुरुवार, 09/01/2020 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
#क्षणांवर स्वार मने# एक फोटोच्या क्लिक मागे कितीतरी हजार गोष्टी अगदी आठवण म्हणून फोकस झालेल्या असतात.रंगसंगती बॅकग्राऊंड आणि खुद्द फोकस व्यक्ती सुद्धा तिच्या अनेकविध मुड्स सह अशी स्थिर किंवा जागच्या जागी थांबलेली! शरद सम्यक जेव्हा फोटो काढतो तेव्हा तो अक्षरशः जिवंत करतो असं त्याच्याबद्दल अनेक जण बोलत असतात आणि त्याने आपला फोटो काढावा म्हणून मरत असतात. त्याच्या आयुष्यात अतिशय धांदरट अशी किमया सिंग आली आणि त्याची फोटोग्राफी काहीतरी वेगळंच होऊ लागली त्याचे फोटो जिवंत तर होतेच पण आता ते स्वतःहून गोष्ट रंगवू लागलेत.किमया ऍक्टरेस आहे आणि प्रचंड महत्वकांक्षी तरीही शरद साठी कधीही कुठेही धावू लागते.ते

अनटायटल टेल्स ३

लेखक मकरंद घोडके यांनी गुरुवार, 09/01/2020 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
जसं माणसं दगडाला शेंदूर फासू फासू देव बनवत आलीयेत अगदी तसंच काही माणसे कामापूरते बोलून बोलून अगदी समोरच्याला डायबेटीस होईल इतकं गोड(गॉड) करत आली आहेत. खरी फॅक्ट अशी आहे की..जेव्हा गरज संपते तेव्हा मित्र म्हणून पाया पडणारे हळूहळू पाय काढायला घेतात आणि हीच का ती माणसे जी केवळ आणि केवळ तुमच्यासाठी या जगात जगत होती असा फुटकळ सवाल पडत राहतो. तिच मग तुमच्या माघारी गळे काढू लागतात. अशा अपेक्षित मान मरातब न मिळालेल्या लोकांचा एक समाज गोतावळा कायम तुमच्या बाजूने एक लांबून वर्तुळ मारून बसलेला असतो. बरं हा खटाटोप बऱ्याचदा गैरसमजांच्या मनबंगल्यांवर उभा असतो आणि एक ना एक दिवस तो कोसळतो..

अनटायटल टेल्स २

लेखक मकरंद घोडके यांनी गुरुवार, 09/01/2020 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच सुरू झालेला जॉब आणि हातातल्या न सावरता येणाऱ्या बॅग्स घेऊन ती स्टेशनावर आली आणि नको तो प्रसंग समोर उभा! नवरा म्हणून ज्याला आपण टाकलं तो दात कोरीत समोरच उभा! तसं लक्ष नव्हतं त्याचं तरी तिला उगाच आँकवर्ड वाटू लागलं.पुरुषी नजरेने बाईच बाईपण फक्त शरीर म्हणून! पण बाईच्या दृष्टीने ते मानसिकही असतं! आता मधेच त्याने ओळख दाखवली किंवा आपला हात धरला किंवा नेहमी करतो तशी शिवीगाळ केली तर काय?

अनटायटल टेल्स १

लेखक मकरंद घोडके यांनी गुरुवार, 09/01/2020 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
ते आणि मी म्हणजे तसे एकच! पण भेट व्हायची नाही ..अधे मध्ये एखादा फोन आणि सविस्तर गप्पा . कधी कान उघाडणी तर कधी प्रेमळ काळजी वजा पाठराखण . तसे कोण तुम्ही कुणाचे काहीही असता नसता, ठाऊक नाही, पण एक दुवा असतो. आपला माणूस कुठेतरी आपला विचार करतोय अशी हक्काची गडद सावली तुमच्या वर पडलेली असली कि आतून कसं छान आणि गारगार वाटतं राहतं. मी काम नसतानाही बऱ्याचदा त्यांच्याशी बोलायचो .

चुलीवरच्या मिसळीची पाककृती

लेखक निनाद यांनी गुरुवार, 09/01/2020 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीवरच्या मिसळीची पाककृती "तुम्च्या मिसळीची पाककृती आमाला पायजेल" अशी विचारणा आल्याने ही कृती देत आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने यात बदल करून घ्यावेत. --- गरम असा दिवस पाहून ठेवावा. मग सर्वात आधी दुकानात जाऊन आवडती बियर बाटल्यांची एक थंडगार केस आणावी. आपल्या आवडीचे धम्माल मित्र-मैत्रिण लोक घरी बोलवावेत. मस्त बियर पीत गप्पा हाणता हाणता अगदी रंगात आल्या की, 'चला चुलीवरची मिसळ करायची का?' असे पिल्लू सोडावे. ही कल्पना बहुदा सर्वांना आवडतेच! मग चूल पेटवण्याचे प्रयत्न सुरू करावेत. या वेळा पर्यंत सर्वांची 'किमान बियर पातळी' गाठलेली असेल तर उत्तम असते.

कूर्ग डायरीज ३

लेखक अभिरुप यांनी बुधवार, 08/01/2020 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
कूर्ग डायरीज ३ प्रस्थान आम्ही ज्या मोसमात फिरायला जात होतो हा मोसम खूप गर्दीचा असणार होता कारण नवीन वर्ष येऊ घातले होते. या गर्दीचा वैचार करून आमची सहल आम्हाला पार पाडायची होती. त्यामुळे निश्चितच एक प्रकारचं दडपण मनावर होतं . पण मुलींच्या आणि आमच्या सुट्ट्या याच काळात असल्याने परिस्थितीचा स्वीकार करणे क्रमप्राप्त होते. बेंगळुरू ते मदीक्केरी हे अंतर सुमारे २७५ ते ३०० किमी आहे. त्यामुळे प्रवासाचे ६ तास लागणार हे नक्की होते.

सेल्फिश

लेखक प्रमोद पानसे यांनी बुधवार, 08/01/2020 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला वारंवार कल्पना देउन आणी सावध करुनही काहिही फरक पडत नव्हता सुमती !! " आज पुन्हा एकदा ईगलमधे फृटज्युस च्या जागी बिअर आॕर्डर करणाऱ्या सुमतीसमोर मी घसा कोरडा करत होतो. सुमती .. माझ्याच कंपनीमधे ट्रेनी इंजिनियर म्हणुन अपॉईंट झालेली .येउन सात महिने लोटलेले.फ्रेश इंजिनियर होती.विस एकविस वर्षाच्या सुमतीचं जॉईन झाल्यावर एक महिन्यातच माझ्या डिपार्टमेंटला पोस्टींग झालं.आणी तीला प्रॉडक्शन प्लॕनिंगचे धडे देता देता कंपनीच्या वातावरणाचे ,आजुबाजूला वावरणार्या लोकांच्या मेंटलीटीचे धडे देणं गरजेचं वाटू लागलं.

महाराष्ट्राचा गवगवा वाढत आहे

लेखक माहितगार यांनी बुधवार, 08/01/2020 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी मागे एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :( नावाचा लेख लिहिला. इंटरेस्टींगली संदर्भाचा व्हिडीओ कदाचित माजी पाकिस्तानी राजदूतांनी चुक उमगल्या नंतर कधितरी हळूवार डिलीट केला त्यामुळे त्या लेखात पोक्ळी निर्माण झाली होती. त्याच महाराष्ट्रीयन स्त्री लेखिकेस स्वदेश विरोधाचे काम सध्या कसे चालू आहे हे माहित नाही पण केवळ स्वदेश विरोध पुरेसा नसतो त्याचा गवगवाही झाला पाहिजे तर गवगवा चालू ठेवणारे आणखी नव्या मराठी कथालेखिकेचे नाव पुढे आले आहे. तर सदर मराठी लेखिका हिवाळ्याची गार हवा खाण्यासाठी बाहेर निघते.

हातचं राखून

लेखक Rohini Mansukh यांनी बुधवार, 08/01/2020 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
दात नाही यावे दिसून हसतो आम्ही हातचं राखून सर्वांपासून लपून छपून रडतो आम्ही हातचं राखून वजनावर डोळा ठेऊन जेवतो आम्ही हातचं राखून पहाटेचा गजर लावून झोपतो आम्ही हातचं राखून करत नाही मनापासून मदत करतो हातचं राखून मित्रांनाही तोलून मोलून मैत्री करतो हातचं राखून भावनांना आवर घालून जगतोच आम्ही हातचं राखून - सौ. रोहिणी विक्रम मनसुख
काव्यरस

हतबल

लेखक शब्दसखी यांनी मंगळवार, 07/01/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर टक्क जागा आहे मी. घरच्यांना वाटतंय की झोपलोय मी अजून, पण जागा आहे मी. डोक्यावरचा पंखा मंद फिरतोय. तोही सहन नाही होत आहे मला. पण उठून बंद नाही करू शकत मी. हतबल आहे मी.