सनकी भाग ८
कायाच्या फॅशन हाऊस मध्ये कामाला सुरुवात करायचे ठरले. ठरल्या प्रमाणे शिवीन व रिचा 11 वाजता कायाच्या ऑफिस मध्ये हजर होते. काया अजून आली नव्हती पण सुधीरने त्यांचे स्वागत केले व काया पोहचतच आहे असे तो म्हणत होता. तोच काया ऑफिसमध्ये आली.
ते चौघे ही कॉफर्न्स हॉलमध्ये गेले कारण कायाने प्रोजेक्टच्या कामासाठी तिच्या ऑफिस मधील ही प्रशस्त जागा निवडली होती. प्रोजेक्ट विषयी सुरवातीची चर्चा झाली. त्यात वेस्टर्न कंपनीला कशा डिजाईन अपेक्षित आहेत तसेच इंडोवेस्टर्न या कॅटेगरीत काय- काय येऊ शकत व सुरवात उमन्स वेअर पासून करावी. अशी अनेक मुद्यांवर चर्चा झाली.
हिंदू अंत्यसंस्कार
नुकतेच एका आप्तांचे अंत्यसंस्कार होताना हजर होतो आणि काही मुद्दे मांडावेसे वाटले. ह्यावर काही उहापोह व्हावा आणि ह्या विषयातील अभ्यासकांनी / जाणकारांनी/ माहितगारांनी काही चर्चा करावी हा उद्देश.
अंत्यसंस्कार आयोजकांना जर फार माहिती नसेल तर ज्याला जे सुचेल ते तो करत सुटतो आणि एकूण प्रसंगाचे गांभीर्य जपताना त्रास होऊ शकतो
१ ) त्यामुळे सर्व साधारण हिंदू अंत्यसंस्कार करताना काय काय अभिप्रेत आहे ? त्यातील कोणते विधी किमान आवश्यक/ वैकल्पिक आहेत?
२) मूळ शोकग्रस्त कुटुंबियांना मृतदेहाच्या सजावटीचा त्रास होत असावा का?
लवकर शहाणे व्हा!
लवकर शहाणे व्हा!
============
निर्भयाच्या बलात्का-यांना फाशी लवकरच होईल, पण बलात्कार थांबणार नाहीत. ते चालूच राहतील. जोपर्यंत "किडक्या प्रजे"ची निर्मिती थांबत नाही, तोपर्यंत बलात्कार चालूच राहणार...
माणसाचा विवेक जगण्याच्या ताणातून संपतो, शरीराला (पर्यायाने मेंदूला) सडवणा-या पर्यावरणातून तो संपवला जातो. धान्याला किड लागली की धान्य निवडून किड संपत नाही. धान्याला उन दाखवावे लागते, धान्य साठवायची (पर्यावरण) जागा बदलावी लागतो.
सप्रेम निमंत्रण
नांदेड सिटी सिंहगड रस्ता , पुणे, येथे आयोजित वरील कार्क्रमास उपस्थित राहावे ही विनंती.
सौ. नेहा पराग प्रधान
सोलाण्याचं पिठलं
#सोलाण्याचं_पिठलं
(#Fresh_green_chickpeas_curry)
पिठलं हा मराठी माणसाच्या आयुष्यातला जिव्हाळ्याचा पदार्थ आहे.आणि गृहिणींच्या तर प्रेमाचा विषय आहे.कोणत्याही वेळी अभ्यागत आले की, गृहिणींचा आधार म्हणजे पिठलं-भातच.
पूर्वी नाटक कंपन्याच्या संगीत नाटकांचे प्रयोग रात्रौ उशिरा कदाचित पहाटेपर्यंत रंगत, अशावेळी बाहेरगावी होणाऱ्या प्रयोगानंतत कंपनीचा बल्लव पिठलं-भाताचा हातखंडा प्रयोग करत असे.
शिवाय कडू घास म्हणजे एखाद्याचं निधन झालं की त्याचे क्रियाकर्म आटपून घरी आल्यावरचं जेवण,जे शेजाऱ्यांकडून येतं तेही पिठल-भाताचंच असतं.यात दोन हेतू असावेत,असं मला वाटतं, एक म्हणजे शेजारचेही घरच्यांइतकेच दमलेले आणि
"शर"
माझ्या वडिलांची ५० वर्षांपूर्वीची कवितांची डायरी सांभाळून ठेवली आहे. वडील पत्रकार, कवी, संपादक होते. तरुण असतानाच गेले. त्या डायरीतील कविता खाली टंकत आहे. कवितेतला मला फारसा गंध नाही. मिपाकरांकडून जर काही रसग्रहण झाले वा प्रकाश पडला तर बरे ह्या उद्देशाने मिपावर टाकत आहे.
काव्यरस
नागझिरा - बिबट्या (बघण्या) साठीचा थरार
ही आमची चौथी सफारी होती.
आल्यापासून आम्ही बिबट्याच्या मागावर होतो.
पहिल्या दिवशी पहिल्या सफरीला फार अपेक्षा नव्हत्या. आधी दोन सफारीना जाऊन आलो असल्यामुळे एखादं जनावर लगेच दिसेल किंवा दिसावं अशी हौशी अपेक्षा तर बिलकुल नव्हती. आमचं कन्यारत्नसुद्धा नवीन जंगल म्हणून शांत होतं. आम्ही निघालो किंबहुना आत शिरलो तेव्हा तीन वाजले होते. आधी बघितलेल्या जिम कॉर्बेट किंवा रणथम्बोरपेक्षा हे नक्कीच वेगळं होतं. या अभयारण्याला पश्चिम घाटाचा वास होता, प्रत्यक्षात घाटापासून कितीतरी लांब असूनही एक आपलेपणा होता त्याचा. महाराष्ट्रात होत म्हणून मी असा विचार करत होतो का?
'तंबोरा' एक जीवलग - ९
सारांश काय तर गळ्यात सूर हवा. सच्चा सूर निरागसच असतो. त्याला बळेच निरागस करता येत नाही. त्या गाण्यात त्यांना बहूतेक, 'माझ्या कंठात असा निरागस सूर वसूदेत' असं गणपतीला म्हणायचं असावं. माझ्या गळ्यातला सूर निरागस होवो याला काही अर्थ नाही. म्हणजे आधी लुच्च्या होता तो निरागस होवो. अशक्य. काहीजण अस्सा निरागस सूर आधीच्या भागात सांगितलेल्या सगळ्या गुणवत्तेसकट कंठात घेऊनच जन्माला येतात. याला दैवी नाही तर काय म्हणावे! हे लिहिताना अशा मी काही ऐकलेल्या गवय्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणि सूर कानात गुंजतो आहे. त्या आगोदर मी न ऐकलेल्या पण ज्यांच्या सुराबद्दल ऐकलेल्या गवय्यांबद्दल.
मिसळपाव