Skip to main content

इथे पुस्तके राहतात !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 29/01/2020 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून ते आतापर्यंत वाचन हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. बालपणी त्याची सुरवात छोट्याशा रंगीबेरंगी गोष्टीच्या पुस्तकांनी झाली. पुढे माध्यमिक शाळेत अभ्यासेतर अवांतर वाचन चालू झाले. तेव्हापासून ते थेट कमावता होईपर्यंत जे काही असे वाचन झाले त्यासाठी विविध वाचनालयांचा आधार घेतला. पुढे कमावता झाल्यानंतर काही प्रमाणात पुस्तक खरेदी करीत राहिलो. तरीही पुस्तकांचा मुख्य स्त्रोत हा वाचनालय हाच राहिला होता. ३०-४० वर्षांपूर्वी वाचनालये ही सुसंस्कृत शहरांचे वैभव असायची. आज त्यांचे प्रमाण आणि सर्वसाधारण दुरवस्था आपण जाणतोच.

भाग १३ अंधारछाया प्रकरण १२ - मग खाज सुटते सगळीकडे! कुठे कुठे, कशी कशी खाजवू? ...पाणी ओतू अंगावर, का मोरीचा ब्रश फिरवू कमरे खालून?

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 28/01/2020 15:29 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

बारा मंगला संक्रांतीचे तिळगूळ, गुळाच्या पोळ्या, सगळं यथास्थित झाले. आपले दहा पंधरा दिवस बरे गेले म्हणायचे असे मनात आले. त्या दिवशी ती विहिरीकडे गेली. यानंतर दरवाजाकरून घेतला रहाटाच्या खालच्या जागी. त्याला कुलुपाची व्यवस्था केली. तेंव्हा हायसे वाटले. पण तेंव्हा पासून बराच फरक पडलाय तिच्यात. एक प्रकारचा अल्लडपणा आलाय असे वाटले. गुरूजींना भेटून सांगितले. तसे ते म्हणाले, ‘आता महत्वाची पायरी आली आहे. हीच तिची मानसिक स्थिती तिला सोडवणार आहे आपल्या जंजाळातून. पण चुकून पुन्हा निराशा वाटली तर मात्र खंड पडेल बरे व्हायला’.

झटपट लेअर्स तिरंगा दम बिर्याणी ( चिकन )

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 28/01/2020 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकर्स , बिर्याणीच नुसतं नाव काढलं की खाणाऱ्यांच्या तोंडाला बदाबदा पाणी सुटत एखाद्या विकेंडला तिकडून ऑर्डर सोडली जाते " आज बिर्यानी होज्जाय ? बायको सुगरण असेल तर ठीक, माझ्यासारखी असेल तर आधी कपाळावर आठ्या येतात भुवया उंचावतात " बिर्याणी म्हणजे अर्धा दिवस गेला असा एक दीर्घ उसासा टाकून ती बनवायला घेतली जाते आणि साग्रसंगीत करता करता जीव अर्धमेला होतो ती गोष्ट वेगळीच ! वर चविच एक लेबल लागलेले जे ,आपणच (लग्न नवीन असल्यामुळे )जीव ओतून कौतुकाचे ४ शब्द ऐकून घेण्याच्या उपद्व्यापायी लावून घेतलेलं असतंय तशी झाली तर ठीक नाहीतर " गेल्या वेळची भन्नाट होती अग" मग आपला एक तीक्ष्

शशक-करिअरभृण हत्या

लेखक Cuty यांनी मंगळवार, 28/01/2020 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
बारावीचा निकाल! 64 टक्के. खोलीत ती मलूल होऊन पडली होती. बाहेर आईच्या डोळ्यांत पाणी, 'कसं फसवलं बघा पोरीनं. हुशार आहे, ईंजिनिअरींग करायचं म्हणून जेवायचं ताटसुध्दा उचलू दिलं नाही. खोलीतून बाहेर येऊ दिलं नाही. सगळं जागेवर. तुम्हीच सांगा.' 'नशीबंच फुटकं!', वडिल. 'अहो बीसीएसला नक्की अॅडमिशन मिळेल.',एकजण. 'हो खड्ड्यात गेलं ईंजिनिअरींग!!', वडिल उद्विग्न. सर्वजण पांगले. 'जन्मतःच नख लावलं असतं तर दोन्ही पोरांची शिक्षणं सुरळीत झाली असती.

Bicycle Diaries: एकता मूर्ती चा दौरा (अर्थात Trip to Statue of Unity)

लेखक mayu4u यांनी मंगळवार, 28/01/2020 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
उपोद् घात मार्च मध्ये सहकुटुंब एकता मूर्ती (Statue of Unity) ला भेट दिली, तेव्हाच “सायकल वरून इथं यायला लै धमाल येईल” असं डोक्यात आलेलं. फक्त, तेव्हा फुफाटा असल्यानं हा प्लॅन हिवाळ्यात करायचा असं ठरवलेलं. बघता बघता उन्हाळा सरला. पावसाळा पण गेला. आणि हिवाळा येऊन ठेपला. नेहमीप्रमाणे प्लॅन ठरवला तेव्हा खूप लोक इंट्रेस्टेड होते. सुट्ट्या बघून 25-29 डिसेम्बर अशा तारखा ठरल्या. सुरुवातीला मी, शिन्या (यांचे पती), मोदक, निनाद आणि जोजो असे सगळे इच्छुक होते.

अनामिक

लेखक Rohini Mansukh यांनी मंगळवार, 28/01/2020 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
भटक्यांना जसं गाव नसतं प्रत्येक नात्याला नाव नसतं ओळखदेख नसताना आपण कुणाशीतरी हसतो तीच तर पहिली पायरी आपण तिथेच तर फसतो कधीकधी एकमेकांशी रंगतात गप्पा हळूहळू व्यापू लागतो मनातील कप्पा बंधु, सखा, प्रियकर नक्की कोण ते ठरत नसतं आपल्याच भावनांचं आकलन आपल्याला होत नसतं समाजमान्य चौकटीत ते बसणारं नसतं म्हणूनच ते जास्त फुलवायचंही नसतं अचानक जुळून येतं आणि अचानकच संपतं एक आठवण बनून फक्त मनामध्ये उरतं त्याची स्पष्ट व्याख्या किंवा ठिकाणठाव नसतं अशा प्रत्येक नात्याला काही नाव नसतं - सौ. रोहिणी विक्रम मनसुख
काव्यरस

एकदा तरी माती व्हावे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/01/2020 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा तरी माती व्हावे कधीतरी इतरांच्या पायी जावे एकदा तरी माती व्हावे नको राग लोभ कशाचा मी माझाच नाही आहे सर्वांचा नको व्यर्थ माझे माझे करावे एकदा तरी माती व्हावे दैन्य इतरांचे पाहून मग कळते मी किती सुखी ते आपलेच सुख आपल्याला टोचावे एकदा तरी माती व्हावे चारी ठाव घरी खातसे ताटात गरम पक्वाने कागदावर अन्न केव्हातरी चाखावे एकदा तरी माती व्हावे वापरसी अंघोळीस पाणी मुबलक फासशी साबण अंगास सुवासीक शरीर सार्वजनीक स्नानास अनुकूल असावे एकदा तरी माती व्हावे सेवा करवून घेई स्वत:ची हातात सार्‍या वस्तू येती कधीतरी झाडू मारूनी उष्टे उचलावे एकदा तरी माती व्हावे आत्मकेंद्री स्वभाव होई म
काव्यरस