Skip to main content

तदेव लग्नम् ..

लेखक आजी यांनी सोमवार, 16/03/2020 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका मेंदीच्या कार्यक्रमाला गेले होते.हल्ली लग्नात हळद,मेंदी,संगीत,लग्न,खाना,रिसेप्शन,बारात (काही राहिलेले असल्यास चूभूदेघे) अशी 'इव्हेंटस् ची लांबलचक मालिका असते. लग्नाला 'इव्हेंट'म्हणायचे हे लक्षात ठेवावे लागते. त्याची एक इव्हेंट मँनेजमेंट असते. आणि ती करायला एक मॅनेजर असतो. ह्या सगळ्याचा एक बिझनेस असतो. तर मगाशी म्हटलेल्या मेंदीच्या कार्यक्रमालाही गर्दी होती. सगळ्याजणी खूप नटून आल्या होत्या. मुलगी जिथं बसली होती ती जागा 'डेकोरेट' केली होती. त्यासाठी खास एक बाई आली होती. तिच्या भोवती दोन मुली मेंदी काढत होत्या. हाताच्या बोटापासून ते कोपरापर्यंत.

मनगंगेच्या काठावर

लेखक तर्री यांनी सोमवार, 16/03/2020 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
कुमार १ यांचा
कोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद
धाग्यातील ‘भाषांतर एक आकर्षक तरी असते, नाहीतर एकनिष्ठ तरी – दोन्ही असणे कठीण !’ ह्या पु.ल. देशपांडे ह्यांच्या विधानाशी ठेहराव झाला. वाचता वाचता असा ठहराव हा निव्वळ आनंदाचा क्षण असतो. असे क्षण मिळणे हे कोणत्याही हाडाच्या वाचकाला परिपूर्ती ची अनुभूती देतो. मनगंगेच्या काठावर हे सबिता गोस्वामी ह्यांचे आत्मकथन नुकतेच वाचले. सबिता गोस्वामी ह्या भारतामधील BBC च्या पत्रकार. आसाम आणि ईशान्य भरात जेंव्हा भयंकर दहशतवादाच्या काळातून जात होता त्याकाळात सबिता पूर्ण ईशान्य भारतातून वृत्त संकलन करीत होत्या.

असुनी स्वत:च पाशी

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 15/03/2020 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
अध्यात्म मोप झाले, व्यवहार तो सुटेना अंतर्मनात चाले, तो घोळही मिटेना   मी एकटाच आलो, जाईन एकटा मी गर्दी कशास जमली? उत्तर कुठे मिळेना   विज्ञान हाच पाया, विज्ञान हीच निष्ठा मानून चाललो तर, तेही पुरे पडेना   दिक्काल वेग सारे, सापेक्ष एकमेका स्थिर वेग का प्रकाशा, बुद्धीस हे गमेना   बुद्धी पल्याड सृष्टी, मी त्यात एक बिंदू असुनी स्वत:च पाशी, मी कोण हे कळेना

आजारांच्या जागतिक साथी

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 15/03/2020 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूच्या आजाराची जागतिक साथ आल्याचे जाहीर केले आहे. ती साथ आटोक्यात राहावी म्हणून आपण सर्वजण योग्य ते प्रयत्न करीतच आहोत. आजाराच्या एखाद्या जागतिक साथीमुळे संपूर्ण जनजीवन ढवळून निघते. तसेच त्याचे अर्थकारण आणि समाजकारणावर गंभीर परिणाम होतात. या निमिताने जागतिक साथींच्या इतिहासात डोकावत आहे. त्याची थोडक्यात माहिती देतो. त्यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करूयात. इ.स. १३०० ते २०१२ या कालावधीतील साथींचा हा आढावा आहे. ....... १. इ.स.

‘ढोल’ नियतकालिकाचे दिवस (भाग- दोन)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/03/2020 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे १९९८ साली पहिल्या अहिराणी ‘ढोल’च्या फायनल प्रुफ तपासण्यासाठी बडोद्याला गेलो होतो. देवी सरांनी विचारलं, ‘तुमचा एखादा पासपोर्ट फोटो आणला का सोबत?’ मी ‘नाही’ म्हणालो. ‘ढोल’च्या मागील पृष्ठावर छापण्यासाठी माझा फोटो हवा होता, असं समजलं. फोटोबिटोचा विचार मी कधीच केला नाही. मग सर म्हणाले, ‘चला आपण फोटो काढून आणू.’ सरांनी स्कुटर काढली. मी मागे बसलो. स्कुटरच्या मागे बसून सरांशी बोलत मी आजूबाजूला पसरलेलं बडोदा शहर पहात होतो. सर बोलत होते. मी ऐकत होतो. बर्याडच अंतरावर फोटो स्टुडीओ होता. तिथं माझा फोटा काढला. आम्ही परतलो. फोटो दोन दिवसांनंतर मिळणार होता. सर पुन्हा तिसर्या.

कंटाळवाणा पास्ता?!?

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 14/03/2020 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
बाजारातून तयार मॅकरोनी चीज पास्ता आणून ठेवला होता , ओव्हन मध्ये ढकलायचा आणि खरपूस झाला कि खायचा.. पण ते कंटाळवाणा वाटलं..

वजनदार ग्रह -तारे आणि स्थळ -काळाची अदृष्य इलास्टीक झोळी (Einstein's theory of relativity and bending of space-time due to planets and stars)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शनिवार, 14/03/2020 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ मार्च.. आईन्स्टाईनचा वाढदिवस.. त्याचा जन्म १४ मार्च १८७९चा.. साधारण १०० वर्षांपूर्वी एका अफलातून प्रयोगातून त्याचा  शास्त्रीय सिद्धांत सिद्ध झाला..तोही एका खग्रास सूर्य ग्रहणाच्या so called काळ्या छायेत..  २००-२३० वर्षे चालत आलेलं न्यूटनचं फिजिक्स एका पेटंट ऑफिस मध्ये काम सुरु करून आपल्या thought experiments च्या भक्कम पायावर प्रयोगाचा पाया बांधणाऱ्या अफाट, अचाट बुद्धीच्या Albert Einstein नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने बदललं  .. सापेक्षता वादाचा सिद्धांत General Theory of Relativity..

रसलिंबू कोंबडी !

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 13/03/2020 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
रसलिंबू कोंबडी ! पाककृती १: भरपूर रसलिंबू ( बेडेकरांची किंवा इतरही त्यासारखे) + चांगलं देशी मध यात कोंबडी १२ तास तरी भिजवून ठेवावी आणि भाजावी किंवा हलकेसे परतावी पाककृती २: साहित्य : लिंबाचा रस, चांगला देशी मध , लसणीचा अख्खा कांदा , मीठ, तांबड्या कोरड्या मिरची चे फ्लेक्स , साथ संगती साठी पातीचा कांदा , काकडी चे वेगवेगळे काप ,, भरपूर लिबूरस+ मध + मीठ याचे मिश्रण करून घयावे , त्यात कोंबडी चे तुकडे १२ तास भिजवून ठेवावे , बनवण्याआधी थोडे तास त्यावर लसणीचा कांदा चित्रात दाखवल्याप्रमाणे यातील रसायनात कापून भिजवावा त्याचे तुकडे कोंबडी तुकड्यात चीर करून मध्ये खुपसून ठेवावे शिजवणे: आधी गरम लोख

दोसतार - ४२

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 13/03/2020 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
घण घण घण. तीन टोल पडले. दुसरा तास संपून तिसरा तास संपायची घंटा. आता तर परतीचा कोणताच विचारही करणं शक्य नाही. चालायचं तर फक्त वर्गाच्या दाराच्या दिशेने वर्गात जाण्यासाठी. एल्प्या पण फळा पुसून बाहेर येण्यासाठी निघालाय. मागील दुवा http://misalpav.com/node/46196 एल्प्या वर्गाच्या दारापर्यंत आलाय. त्याचे माझ्याकडे लक्ष्यही नाहिय्ये. मी त्याला काय तास कसा झाला हे खुणेने विचारले. पण त्याकडेही त्याचे लक्ष्य गेले नाही. एल्प्याचा चेहेरा इतका टेन्शन मधे असलेला कधीच पाहिला नव्हता. एल्प्याला काहीतरी जाम टेन्शन आलेय.