मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

होयसाळेश्वर मंदिर शिल्पे

कंजूस · · मिपा कलादालन
हळेबीडु येथील होयसाळेश्वर मंदिरावरचे शिल्पांचे काही फोटो इथे देत आहे. साधारणपणे अडीच तीन फुट उंचीची ही शिल्पे सात ते दहा फुटांवर आहेत. त्या खाली नऊ नऊ इंचांचे हत्ती, घोडे, व्याल, शरभ ,सिंह तसेच वादक ,नर्तकांचे शिल्पपट दिसतात. बरीच शिल्पे चांगल्या अवस्थेत आहेत. होयसाळ जैन --हिंदू धर्मीय होते त्यामुळे दोन्ही शिल्पे दिसतात. फक्त जैनांची अशी दोन देवळे (= बस्ती/ बसदि ) इथून जवळच आहेत. हे फोटो ४ मार्च २०२० या दिवशी काढले आहेत.) फोटोंच्या मथळ्यात काही चुका असतील तर त्या सुधारण्यात येतील. ( सहल माहिती कर्नाटका समुद्र आणि सह्याद्री - २ या लेखात सापडेल.) फोटो १
द्वारपाल (डावा)



फोटो २
ब्रह्माणी




फोटो ३
गोपाल गोवर्धन



फोटो ४
शिल्पट थर



फोटो ५
नंदी



फोटो ६
मुरलीधर



फोटो ७
गरुड



फोटो ८
गरुड आणि नाग



फोटो ९
जैन मुनिवर



फोटो १०
गरुडारुढ लक्ष्मी विष्णू



फोटो ११
इंद्र इंद्राणी



फोटो १२
नरसिंहाकडून हिरण्यकश्यपुवध



फोटो १३
त्रिदेव आणि लक्ष्मी



फोटो १४
मुरलीधर, शालभंजिका(सालवृक्षाची फादी धरलेली नायिका, ब्रह्मा



फोटो १५
नायिका



फोटो १६
गरुडारुढ विष्णू, मकराच्या जबड्यातून गजेंद्राची सुटका. मकर थोडासा मुंगुसासारखा दिसत आहे.



फोटो १७
शिवतांडव



फोटो १८
शालभंजिका



फोटो १९
कमळात बसलेले लक्ष्मी विष्णू



फोटो २०
नंदीस्वार शिवपार्वती



फोटो २१
विष्णू आणि शिव



फोटो २२
शिवाकडून दैत्य(?)वध



फोटो २३
गजासुरवध



फोटो २४
दुर्गेकडून वध ?



फोटो २५
माहेश्वरी ?



हळेबीडु च्या होयसाळेश्वर मंदिरापासून जवळच (तीनशे मिटर्स) असलेल्या 'पार्श्वनाथा आणि शांतिनाथा बसदि ' म्हणजे जैन देवळातले काही फोटो पुढे देत आहे. पार्श्वनाथा बसदीत ठेवलेले शिलालेख - १) लेख १ २) लेख २ ३) लेख ३ ४) लेख ४ ५) लेख ५ ६) पार्श्वनाथ मूर्ती ७) शांतिनाथ मूर्ती. ===============

वाचने 13436 वाचनखूण प्रतिक्रिया 21

कंजूस Sun, 03/15/2020 - 14:16
फोटो विकिमिडिया कॉमन्सवर चढवले आहेत ( या लेखातले गूगल फोटोतले आहेत.) पण एक गोची झाली. मोबाईलच्या landscape mode मध्ये घाईघाईने shoot झालेले असल्याने त्याच्या कॉमन्सच्या image link ने फोटो आडवे उमटतात. image attribute मध्ये style ="transform : rotate(90deg);" वापरल्यावर सरळ होतात पण मोठी जागा व्यापून टाकतात - इतर लेखनावर पसरतात. विकिमिडिया कॉमन्स फोटोंचा exif data (metadata) copy करते. जे आवश्यक आहे. फोटोला app वापरून modify केले तर तो exif data उडतो.

चौकटराजा Sun, 03/15/2020 - 22:20
वरील फोटो पाहून महाराष्ट्रामधील काय भारतातील सर्वच शिल्प कामापेक्षा बेलूर हळेबिडू यांचा दर्जा किती उच्च आहे हे कळून येते !

In reply to by चौकटराजा

प्रचेतस Mon, 03/16/2020 - 12:56
होयसळ शिल्पे अतिशय नाजुक कलाकुसरीने मढलेली असली तरी त्यांचे उणेपण चेहऱ्यांवरील अविभार्वात आहे असे ती शिल्पे बघता जाणवते. चेहऱ्यावर अत्यंत रुक्ष भाव दिसतात. युद्धांतील शिल्पांच्या चेहऱ्यावर आवेश, किंवा युगुल शिल्पांच्या चेहऱ्यावर उत्कटता अशी ती जाणवत नाही. हे काहीसे दागिन्यांनी नक्षशिखांत मढलेल्या एखाद्या पुतळ्यासारखे वाटते. या उलट वेरुळमधील दशावतार लेणीतील स्थौण नृसिंहाचे शिल्प बघा. काय तो आवेश आहे चेहऱ्यावर, भृकुटी ताणल्या गेल्या आहेत, दाढा विचकल्या गेल्या आहेत, डोळे खोबणीतून बाहेर येत आहेत आणि अविश्वासाने भेदरलेला हिरण्यकश्यपू सुटकेची धडपड करतो आहे. अगदी जिवंत शिल्प आहे हे.

कंजूस Mon, 03/16/2020 - 14:19
होयसळ शिल्पांच्या ( १०-१२ शतक)भावात उणेपण आहे हे खरंय. तसं पाहिलं तर गुप्त काळापर्यंत (सहावे शतक) शिल्पे जिवंत होती नंतर चेहरे प्लास्टिक झाले. १४-१५ शतकांत तर भव्यता हेच प्रधान कारण झाले.

In reply to by कंजूस

चौकटराजा Mon, 03/16/2020 - 14:23
येथील बरीच शिल्पे स्वतः स्वतन्त्र कलाक्रुती आहेत. ती प्रसंगाची पॅनेल नाहीत. प्रसंग आला की निश्चित भाव आले . तरीही वरील काही चित्रात मंद स्मित तुम्हाला दिसून येईल !