Skip to main content

तमसो मा ज्योतिर्गमय ...

लेखक Jayant Naik यांनी रविवार, 22/03/2020 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
तमसो मा ज्योतिर्गमय ... मुख्याध्यापक केतन कदम सरांनी आपला शाळेचा फेरा संपवला. ते नेहमी शाळेत शाळा सुरु होण्याआधी अर्धा तास शाळेत येत आणि सर्व शाळेत एक फेरी मारीत असत. सगळीकडे अगदी बारीक नजरेने पहात ते आपल्या हातातील एका वहीत आपली निरीक्षणे नोंदवून ठेवीत असत. मग ऑफिसमध्ये गेले की योग्य व्यक्तीला ते ते काम सुपूर्त करत असत . असा त्यांचा दिनक्रम असे. आपण काम केव्हा सांगितले आणि ते केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे पण त्या व्यक्तीशी बोलून ते त्या वहीत ते नोंद करून ठेवीत असत. शाळेच्या पटांगणात दोन तीन महिन्यापूर्वी लावलेल्या झाडांची निगा हा त्यांचा आवडीचा विषय होता.

मोगँबो - २

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 22/03/2020 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
हा सारंग ना नेहमी असेच करतो. ढोलकीवाल्याला आणायला दुसर्‍या कोणाला पाठवलं असते तर निदान तो तरी मिळाला असत अगिटारवर. हा कार्यक्रम होऊन जाऊदेत मग बघु या त्याला. "अरे हे आपण दरवेळी ठरवतो आणि होतं काय! कार्यक्रम झाला की सारंगसाहेब अभिनंदन स्वीकारत बसतात. आणि आपण लोकांना दिसतही नाही. " मीनाच्या बोलण्यात तक्रारीपेक्षाही कौतूकाचाच सूर होता. तीच काय पण सारंग बद्दल कोणीही तसेच बोलायचा. होताच तसा तो.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46242 मीना च्या बोलण्यात तथ्य आहे या अर्थाने सर्वांनीच माना डोलावल्या.

कृतघ्न -5

लेखक बाप्पू यांनी रविवार, 22/03/2020 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 आता पुढे माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी.

मास्कमधून

लेखक चांदणे संदीप यांनी रविवार, 22/03/2020 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
नाहीत तुला पाय तरी देशोदेशी जाशील गावागावा-वस्त्यांमधून द्वाडासारखा फिरशील तुझी असंख्य भावंडे माजवतील हाहाकार पण घे लक्षात, आमच्यात आहे शिल्लक प्रतिकार जितका झपाट्याने तू पोखरत जाशील आत तितकीच उसळून उठेल अशी माणसाची जात माणूस मारणं कदाचित असेल सोपं काम रे पण दाखव जिंकून त्याला म्हणशील मनात 'राम रे!' माहिती नसेलच तुला जगणं-जगवणं कोरोना बघ बापाला, मास्कमधून पापी पोराला देताना संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)
काव्यरस

मैत्री!

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 20/03/2020 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
टीप: 'केयलफिड्डी' या कवितेशी आशयात्मक साम्य भासल्यास योगायोग समजावा बरं का! 'केयलफिड्डी' दुवा https://www.misalpav.com/node/46119 ------ मैत्री! बाईचे दो सख्खे मैतर पहिला काका दुसरा अप्पा रोज मारते अलटुन पलटुन हाटसापवर गुलुगुलु गप्पा मैतर दोघे पक्के डांबिस बाई त्यांचा नाजुक बिंदू आव परंतू आणिति ऐसा विनयाचे जणु साती सिंधू रोजरोजच्या गप्पा ओल्या खूष जाहती अप्पा काका पाहु लागती स्वप्ने चावट मनात बांधुन "वाडा" पक्का परंतु बाई आहे खमकी दाद कशी ती लागू देइल! झुलवत ठेवी दोघांनाही धाडुन चावट बदाम, स्माइल दोघांमंध्ये संख्या छत्तिस तोंड पाहणे पसंत

माझा कृष्णा मामा

लेखक Sanjay Uwach यांनी शुक्रवार, 20/03/2020 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझा कृष्णा मामा कांही कांही माणसाना परमेश्वर फार सुंदर रूप देतो. माझ्या कृष्णामामाला पाहीले कि मला हॉलीवूडच्या चित्रपटातील धिप्पाड हिरोची आठवण यायची. स्वच्छ पांढरे धोतर ,त्यावर तीन बटणाचा पांढरा हाफ शर्ट, अंगाबाद्याने धिपाड,भक्कम मजबूत शरीरयष्टी ,उंचापुरा,कुरळे केस ,रंगाने गोरापान ,पायात जाडजूड कोल्हापुरी चप्पल ,कपाळावर कायम अष्ट्गंघ .कदाचित धोतर नेसणारी हि त्याची शेवटचीच पिढी असावी .सकाळ असो कि रात्र असो त्याच्या चेहऱ्यावरील हस्य मात्र कधिच ओसरत नसे.

मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 20/03/2020 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत गड-किल्ले, लेणी, मंदिरे पाहण्यासाठी बरीच भटकंती झाली होती. पण खर्‍या अर्थाने जंगल भ्रमंती अशी झाली नव्हती. नाही म्हणायला एकदा कॅम्प कोयना आणि एकदा आंबा घाटात प्रत्येकी २/३ दिवस मुक्कामी होतो. आंबा ते विशाळगड रस्त्यावर गव्याचे दर्शनही झाले होते. सह्याद्रीतील ह्या जंगलांचा प्रकारच वेगळा. गच्च हिरवी, काट्याकुट्यांची ही जंगले. इकडील जंगलांत वन्य प्राण्यांचा वावर फारसा नाहीच. अशातच मित्राने मेळघाट जंगल बघायला जायचा विचार मांडला. मेळघाट हे अमरावती जिल्ह्यात. अभयारण्याचा भाग प्रचंड विस्तृत, सातपुडा रांगेच्या दर्‍याखोर्‍यांनी भरलेला.