Skip to main content

एक व्हायरस साला आदमी को..

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 24/03/2020 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
ये व्हायरस साला आदमी को बहुत कुछ सिखाया.. मर्यादा- श्रध्देच्या, विज्ञानाच्या, स्वयंघोषित तज्ञांच्या अवघडपणा- जुन्या सवयी सोडण्यातला, सोप्या गोष्टी करण्यातला, जगण्याच्या वेगाला करकचून ब्रेक लावण्यातला, शांततेची सवय करण्यातला, अतर्क्याचा साक्षीदार होण्यातला, हतबलांच्या तांड्यातील एक असूनही.. विझू विझू आशेवर जगत राहाण्यातला न जाने ये व्हायरस साला आदमी को... और क्या क्या सिखायेगा
काव्यरस

आठवणीतील याहू चॅट रूम्स

लेखक पर्ण यांनी सोमवार, 23/03/2020 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
याहू मेसेंजर वरील मराठी चॅट रूम्स उदय १९९८ साली झाला... त्याकाळातील एकमेव इन्स्टंट चॅट मेसेंजर क्लाईंट म्हणजे याहू (तसं रेडिफमेल, हॉटमेल सुद्धा होते पण याहू एवढी प्रसिद्धी नव्हती)... शिवाय त्यांत आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या रूम्स, कम्युनिटीप्रमाणे लोकल चॅट रूम्स असायच्या... मी सुद्धा त्यावेळी याहूच्या मराठी चॅट रूममध्यें चॅट करायचे...सुरुवातीला फार अप्रूप वाटायचे..मस्त मजा- मस्ती , गप्पा-टप्पा, ज्ञानाची देवाण-घेवाण (knowledge sharing), त्यातल्या त्यात भांडणे रुसवे- फुगवे आणि मग एकमेकांच्या समजुती असे अनेक प्रकार चालायचे.... तर याचीच काही निगेटिव्ह बाजू पण होती...

लगीनघाई

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 23/03/2020 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
लगीनघाई ------------------------------------------------------------------------------------------------ शिवानीचं लग्न मोडलं होतं - हुंडयामुळे ! ... समाज शिक्षित झाला ; पण सुशिक्षित नाही. अजूनही नाही. मुली शिकल्या. विचार करू लागल्या. घराबाहेर पडल्या. नोकरी करू लागल्या .पण अजुनही मुलीची बाजू पडतीच . हुंड्याचा प्रश्न अजूनही ज्वलंतच ! आईबापांना कर्जात घालणारा . प्रसंगी खड्ड्यात घालणारा. अभिराज एक चांगला मुलगा होता. इंजिनीअर. उत्तम नोकरी आणि पगार असलेला . देखणा आणि टापटीप राहणारा. मुख्य म्हणजे लग्नासाठी अगदी योग्य उमेदवार असलेला. स्थळं बघण्याची सुरुवात झाली.

पार्टी

लेखक निखिल माने यांनी रविवार, 22/03/2020 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
३१/१२/२०१९ वेळ:संध्याकाळ अजून घेणार आहेस नको, उद्या त्रास होईल काही नाही होत रे, हाच प्रॉब्लेम असतो तुम्हा कधीतरी करणाऱ्यांचा. फार थोडक्यात आटपता. अरे काय करू तुझ्या सारखे आम्ही पिढीजात नाही, आमच्या वंशावळीत हे सेवन करणारे आम्ही पहिलेच, त्यामुळं जपून करावं लागत. घरी कळलं तर पिताश्री हाकलून काढतील. हो यार, पाहिलंय तुझ्या घरात मी. एकदा चुकून नाव काढलं तरी तुझा बाप मी धर्म भ्रष्ट केला असं बघत होता. जाऊदे आज तुझे बाबा कंपनी द्यायला नाहीयेत? अरे आई बरोबर गावी गेलेत. नाहीतर दोघांनीही मस्त कंपनी दिली असती.

हातावरील पोट

लेखक सर टोबी यांनी रविवार, 22/03/2020 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहिलं तर मिपावरून जवळपास मी रजाच घेतली आहे. माझ्या दोन लेखांवरील काही आक्रस्ताळ्या, मुजोर आणि हीनतेचा तळ गाठणारी एक प्रतिक्रिया यामुळे मी लिहिणं आणि प्रतिसाद देणं थांबविलं आहे. सहसा प्रवाहाविरुध्ध मतं मांडताना अवहेलना हि अपेक्षितच असते. परंतु कधी कधी आब राखणं आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. त्यामुळेच असा निर्णय मी घेतला आहे. आता या लेखाच्या निमित्ताने मी प्रकट होत आहे त्याचे कारणच तितके महत्वाचे आहे. कष्टकरी लोकांची आपल्याला आठवण सर्वसाधारण पावसाळ्यात होतेच होते.

दिवस... पक्ष्यांचा, आणि माणसांचा!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 22/03/2020 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ उजाडली, उन्हं अंगावर आली तरी आपापल्या घरट्यात आज पक्ष्यांना जागच आली नाही. कशी येणार? रस्त्यावर आणि आजुबाजूला कुठेही कसलाच आवाजही येत नव्हता. गाड्यांच्या आणि कर्कश्श आवाज करीत पहाटरंगी प्रकाशाला चिरत पळणाऱ्या मोटारसायकलींचा सवयीचा ध्वनी अजून कानावरही पडलाच नव्हता. कॅरियरला लटकावलेल्या दुधाच्या किटल्या सांभाळत सायकल चालविताना रस्त्यावरच्या खड्ड्यात सायकल आदळून होणारा किटल्यांचा आवाजही उजाडल्याची वर्दीच देत नव्हता.