महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा
महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा

लहरींचा गुंता : सुर - बेसुर, रंग - बेरंग (Interference of Waves like Photons and Sounds)
(आधी सर्वांनी मिळून आवाज केला. नंतर सर्वांनी मिळून दिवे लावले. यात karona जाईल कि नाही हे माहित नसलं तरी साऱ्यांचं एकत्र येऊन (आपापल्या घरीच राहून).. एका वेळी एक होणं याने निदान सर्वांच्या मनाला तरी resonance concept or constructive interference नुसार उभारी येईल. एकाच वेळी प्रार्थना म्हणायची पद्दत आहेच सर्व धर्मामध्ये . आपापल्या घरी राहून एकत्र येणं आणि त्यातून एकपणाची जाणीव होणं, शक्तीचा गुणाकार होणं आणि मनाला उभारी येणं हे सुद्धा कमी थोडीच आहे? असो. तर विक्रम वेताळांनी नेहमीप्रमाणे फिजिक्स मधल्या resonance ची चर्चा केली.. resonance of sound, resonance of light यांची चर्चा केली .
तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका - करोना महात्म्य ।।२।।
करोना माहात्म्य ||२||
तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका
मनुष्य मरणाला भीत नाही आणि हाच करोनाशी लढताना सगळ्यात मोठा अडचणीचा भाग ठरणार आहे. जो मरणाला भीत नाही, तो स्वतः बेसावध असतो आणि दुसर्याचे जीवनही बेसावधपणे धोक्यात घालू शकतो.
मुंग्या..
आजकाल टीव्हीवरती मुंग्या येत नसल्याने रामायण-महाभारतामुळे अपेक्षित असलेला नॉस्टॅल्जीक फील म्हणावा तसा येत नाहीये. हल्ली जसं टीव्हीवर काही नसलं तरी सूर्यवंशम असतो तसं त्याकाळी मुंग्या असायच्या. या मुंग्या बऱ्याचदा एखादा कार्यक्रम सुरु असतानासुद्धा यायच्या. सिनेमा रंगात आला असताना म्हणजे हिरोच्या आईला किंवा हिरोईनला व्हीलेनच्या आदमींनी नुकतंच पकडून नेलंय. आणि हिरोला आत्ताच ही बातमी शेजाऱ्याकडून मिळालीये. आणि हिरो माँ कसम वगैरे म्हणून फायटिंग मोड ऑन करून व्हीलेनच्या अड्ड्यावर पोहोचणार तेवढ्यात टीव्हीवर मुंग्यांचं आगमन व्हायचं.
वन वर्ल्ड: टुगेदर ॲट होम!
करोनाविरोधातील लढ्यात जिवाची बाजी लावणारे आरोग्य सेवक, आणि या आघाडीतील प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आम्ही थाळ्या वाजविल्या, टाळ्या वाजविल्या आणि दिवे-पणत्या लावून त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. असे काही केल्याने करोनाची महामारी नष्ट होणार नाही हे माहीत असूनही देशातील तमाम जनता यामध्ये सहभागी झाली, तर अनेकांनी विरोध व्यक्त करीत पंतप्रधानांची खिल्ली उडविली.
या कार्यक्रमांवरून देशातील समाजमाध्यमांच्या जोडीने प्रसारमाध्यमांमध्येही वैचारिक द्वंद्व जुंपले असताना, जागतिक आरोग्य संघटनेने अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
करोना हा खलनायक नव्हे नायकच : करोना महात्म्य ।।१।।
करोना महात्म्य ।।१।।
मी सध्या काय करतो
मी सध्या काय करतो
गेले काही दिवस सक्तीच्या विश्रांतीसाठी अर्धेधिक जग घरात कोंडले गेले आहे त्यात आपली काय कथा? लोक आपापल्या परीने वेळेचा सदुपयोग करताहेत. घरून काम चालले आहे तरी बराच मोकळा वेळ हाताशी आहे. वाचन लेखन चालू आहे. चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे तर आहेच पण खूप दिवसात संपर्कात नसलेले मित्र आणि नातेवाईक यांना फोनवरून आणि व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून भेटणे चालले आहे. गप्पा रंगतात आहेत. कन्येची दहावीची परीक्षा तीन पेपर उरलेले असतांना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेली आहे. त्यामुळे धड अभ्यास न धड सुट्ट्या अशी परिस्थिती.
लॉकडाऊन : चौदावा दिवस
एखादी गोष्ट आपल्याला हवी असते , व ती अगदी अनपेक्षित रित्या आपल्याला मिळते तेव्हा आपली जी परिस्थिती होते तीच सध्या आपली या लॉकडाऊन मध्ये झालीये. आपल्याला अचानक का होईना पण सुट्टी मिळालीये. पण ते २-3 दिवस असतं तर ठीक होतं. आता २ आठवडे झालेत , अजून एक आठवडा बाकीच आहे. त्यातही सध्याची परिस्थिती पाहता ही सक्तीची सुटी आणखी वाढते की काय ? अशी धास्तीही आहे. बरं घरात बसून रोज नवी करमणूक तरी काय शोधायची हा प्रश्न आणखी त्रासदायक.
कार्यकारणभाव (लघुकथा)
वैताग नुसता वैताग.. घरातल्यांनी नुसता वैताग आणला आहे.
माणसाने बुद्धीने चालावे की अंधश्रद्धेने ?
आयुष्याची तिशी ओलांडल्यावर पहिली कार घेणार आहे तर घरच्यांनी हे तारे तोडावेत ?
बायको म्हणतेय "अहो.. माझ्या बाबांनी सुचवलं आहे, गाडीच्या क्रमांकाची बेरीज ७ यायला हवी. ७ अंक आपल्या दोघांकरिताही शुभ आहे"
इकडे बाबा म्हणतायत "अरे गाडी घ्यायचीच तर किमान दोन महिने थांब. सध्याची ग्रहस्थिती तुला अनुकुल नाही"..
निवृत्तीनंतर बाबांना ज्योतिषशास्त्राने तर सासर्यांना न्युमरोलोजीने पछाडले.
तर आईची अजूनच वेगळी तर्हा "अरे आपल्या कुटूंबात कुणाला चार चाकी वाहन लाभत नाही रे.
मिसळपाव