Skip to main content

लॉकडाऊन: सत्ताविसावा दिवस

लेखक अजित पाटील यांनी सोमवार, 20/04/2020 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर कुणीही कधी विचार केला नसेल अश्या परिस्थितीत आपण सर्वजण अडकलो आहे जर कुणी आपल्याला असे थांबा म्हटले असते तर आपन कधीच थांबलो नसतो पन ते निसर्गाने किंवा मानव निर्मित उपद्रव्या मुळे सर्व जग थोडा वेळ का थांबलो आहे. काही काळ असेना सर्व जण स्वतच्या कुटुंबासोबत किंवा स्वतःसोबत वेळ घालवत आहेत. काही दिवसापूर्वी प्रशांत चा फोन आला कि लॉक डाउन वरती माझे अनुभव लिहण्याची विनंती केला म्हणून हा छोटासा प्रयत्न करत आहे. फेब्रुवारी मध्ये ऑफिस च्या कामासाठी अमेरिकेला जायचे होते. चीनमध्ये कोरोनाने विषाणूने ऊहान शहराला विळखा घातला होतो.

धाड

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी सोमवार, 20/04/2020 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा. चिमुलवाड्यावर बहुतेक सर्वच घरांत बायका आपल्या कोवळ्या पोरांकडून ''ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा" बोबड्या आवाजात वदवून घेत होत्या. मॉन्सून पूर्व कामांच्या नावाखाली दिवसातून कमीत कमी ४-५ वेळा लाईट जाण्याचे प्रकार सुरु होते. भरलेले गटार समजून उसपण्याच्या नावाखाली खोदलेल्या चरित १ -२ दारुड्यांनी आपापले पाय मोडून घेतले होते ! "उनासाठी खूप झाला, आता पावसासाठी लवकरच ह्या छत्र्यांचा वापर होउदे रे देवा"- अशी प्रार्थनाच बहुतेक लोक करीत असावे. बाकी मागच्या वर्षीच्या गरमीपेक्षा ह्या वर्षीची गर्मी जरा जास्तच आहे असे प्रत्येकाला वाटत होते.

पुन्हा एकदा रामायण

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 19/04/2020 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
रामायणाचं पुनर्प्रक्षेपण आज संपलं. पुन्हा एकदा इतिहास घडवुन. २०१५ मध्ये चालु झालेल्या मालिकांच्या लोकप्रियता मोजण्याच्या पद्धतीनुसार रामायण तेव्हापासुन आजपर्यंत सर्वात जास्त लोकांकडुन पाहिली गेलेली मालिका ठरली. ३३ वर्षांपूर्वीचा हाच इतिहास पुन्हा एकदा घडवत. नाक मुरडणाऱ्यांनी तेव्हाही नाकं मुरडली आणि आताही. तेव्हा म्हणे केबल नसल्यामुळे, एकच वाहिनी आणि पर्याय नसल्यामुळे जे दाखवतील ते लोकप्रिय व्हायचं. आणि आता लोकांना घरात बसुन दुसरं काम नाही, त्यामुळे पुन्हा.

लॉकडाऊन: सव्वीसावा दिवस

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 19/04/2020 04:05 या दिवशी प्रकाशित केले.
img { padding: 8px; border: 1px solid #ccc; margin-top: 10px; margin-bottom: 10px: margin-left: auto; margin-right: auto; } p { text-align: justify; }

भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी पहिल्यांदा केवळ 22 मार्चला एक दिवस घरात बसण्याचे आवाहन केले. त्याचवेळी त्यांनी संध्याकाळी पाच वाजता घंटा, टाळ्या वाजवून करोना विषाणूशी दोन हात करणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवेकरऱ्यांचे कौतुक करण्यास सांगितले. आम्ही आणि आमच्या सोसायटी मधील सर्वांनीच अगदी उत्साहाने घंटा वाजवून ती काही मिनिटं साजरी केली.

माम्मा मियाचे गणित : (गणित असले तरी) न बिचकता वाचण्यासारखे, पण घाबरवणारे

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 19/04/2020 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
(आधीचा संदर्भ: https://misalpav.com/node/46429) जर १९ फेब्रुवारी २०२० च्या दिवशी आणि थोडे त्या आधी व थोडे त्या नंतर मिलानमधल्या सान सिरो स्टेडियममध्ये एकत्र जमलेल्या आणि त्यानंतर सर्वदूर पांगलेल्या या ४०,००० - ५०,००० फुटबॉलवेड्यांच्या उन्मादाचा परिणाम गणिती दृष्टीनें अभ्यासायचा असेल तर?  जरी हे कधी तरी कोणीतरी एखाद्या शोधप्रबंधात मांडेलच तरी त्यासाठी विचार करताना लक्षांत आले- माझ्या स्वतःच्याच गणिती कल्पना (mathematical fundamentals) पुसटल्या आहेत.

माम्मा मियाचे गणित : (गणित असले तरी) न बिचकता वाचण्यासारखे, पण घाबरवणारे

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 19/04/2020 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
(आधीचा संदर्भ: https://misalpav.com/node/46429) जर १९ फेब्रुवारी २०२० च्या दिवशी आणि थोडे त्या आधी व थोडे त्या नंतर मिलानमधल्या सान सिरो स्टेडियममध्ये एकत्र जमलेल्या आणि त्यानंतर सर्वदूर पांगलेल्या या ४०,००० - ५०,००० फुटबॉलवेड्यांच्या उन्मादाचा परिणाम गणिती दृष्टीनें अभ्यासायचा असेल तर?  जरी हे कधी तरी कोणीतरी एखाद्या शोधप्रबंधात मांडेलच तरी त्यासाठी विचार करताना लक्षांत आले- माझ्या स्वतःच्याच गणिती कल्पना (mathematical fundamentals) पुसटल्या आहेत.

परवड !

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शनिवार, 18/04/2020 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
तो एक शनिवार होता. राजाभाऊ साठे, दामलेंच्या श्री सीता-राम बुक डेपोत कामाला असत. शनिवारची सुट्टी असून सुद्धा आज दामल्यांनी त्यांना फोन केला व दुकानावर येऊन नवीन आलेली बुके दाळावयास व त्यांचा हिशोब करण्यास सांगितल्याने झक मारीत त्यांना दुकानात जावे लागले होते. दुकान म्हणजे तसें जवळही नव्हते. दुकानात पाऊल ठेवण्यासाठी त्यांना फॉण्ड्यावरून ३० किमी. दूर पणजीला जावे लागायचे. रोजच्याप्रमाणे राजाभाऊ पणजीला जायला निघाले. वाटेवर जाताना त्यांनी साधलेंच्या दुकानावरून रोजचा पेपर घेतला व राशी भविष्य असलेले वर्तमानपत्राचे दुसरे पान उघडले.

हनुमान जयंती स्पेशल खबांटकी नाईट राईड (सायकल)

लेखक सुमोसायकलिंग यांनी शुक्रवार, 17/04/2020 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
२१ एप्रिल २०१९ हनुमान जयंती स्पेशल खबांटकी नाईट राईड..!! आज ऐनवेळेस नाईट राईडला जायचे ठरवले. तसे पहाटे पहाटे किंवा रात्री उशीरा राईडला जाण्याचा अनुभव होताच. पण रात्रभर राईड करण्याची पहिलीच वेळ. आपण ठरवले की आपण काहीही करु शकतो याचा पुन्हा एकदा प्रचिती आली. सर्वजण सात वाजता रावेत ब्रीज वरून निघणार आहेत.मी उशीरा घरी आल्यामुळे निघायला आठ वाजणार होते. माझ्यासारखेच आणखी दोघे होती, अजित दादा आणि नितीन पानसे. ठरल्याप्रमाणे आम्ही आठ वाजता रावेत ब्रीजला भेटलो.

पषम पूरी

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 17/04/2020 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
पषम् पूरी हा केरळी प्रकार आहे. राजेळी केळ्याची भजी. कोची, तिरुवनंथपुरम जाणाऱ्या रेल्वेत हा पदार्थ नाश्त्याला मिळतो. चहा आणि गरम पषम् पुरी खातात. कसे करायचे याचे विडिओ युट्युबवर बरेच आहेत. केरळी लोक मोठी वरून लाल सालीची आणि आतून सोनेरी पिवळसर असलेली राजेळी केळीच वापरतात. पण आपण इथे साधे केळेच वापरले आहे. लॉकडाऊनमुळे अगदी साधे सोपे आणि पौष्टिक प्रकार करण्यासाठी उत्तम.

कृती
फोटो १