Skip to main content

श श क : प्रतिसाद

लेखक Prajakta२१ यांनी बुधवार, 29/04/2020 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊनमुळे कधी नव्हे ते तिने पहिल्यांदा शतशब्दकथा स्पर्धेत भाग घेतला होता उत्साहाने २ कथा पाठवून रोज लहान मुलासारखे संकेतस्थळ उघडून प्रतिसादांची वाट बघायला लागली पण काहीच प्रतिसाद नसल्यमुळे खट्टू व्हायची अशातच स्पर्धेची मुदत संपली,विजेते पण घोषित झाले आपण नसणार हे माहिती होतेच 'जाऊदे पहिलाच प्रयत्न होता,स्वान्त सुखाय लिहिले होते असेच गम्मत म्हणून' हिरमुसलेल्या मनाची समजूत घालून ती विसरून गेली आणि रोजच्या रहाटगाडग्यात मग्न झाली पंधरवड्याने मेल बॉक्स बघताना उडालीच टुणकन खुर्चीतून ---------------- "आपली संकेतस्थळावर --------------- हि शतशब्दकथा वाचली कथ

[शशक] अॅन फ्रँकच्या डायरीतील एक पान २०२०

लेखक SaurabhD यांनी बुधवार, 29/04/2020 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज आम्हाला कळतं आहे की त्यांना तेव्हा काय वाटत असेल. त्यांच्यावरही अशीच जिवाच्या भीतीने घरांमध्ये लपून बसण्याची वेळ आली होती. "आपलाही नंबर कधीही येऊ शकतो ..." हा फार भयंकर विचार आहे. कोणामार्फत ते आपल्यापर्यंत पोहोचतील काही सांगू शकत नाही. बाहेरून दिसताना सगळे चांगलेच दिसतात ... पण कोण 'आतून' त्यांचे झाले असतील ते कसं सांगावं. सततचं मानसिक दडपण की आपली एक चूक, निष्काळजीपणा ... आपल्या संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात घालेल. तेव्हा काही जण शत्रूच्या पकडी बाहेर निसटले आणि वाचले ...

प्राजक्ताची फुले

लेखक मनोज यांनी बुधवार, 29/04/2020 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
हळूवार वेच ती प्राजक्ताची फुले रानपाखरे वेलीवरती घेती तेथे झुले. मधुर गोजिरी होते किलबिल. तुझ येण्याची देती चाहूल. प्राजक्त ही मग बहरून येतो शुभ्र फुलांची रास घालीतो केस मोकळे शुर्भ वसने पायावर ते अलगत बसणे फुल फुलाशी घेते वेचून असेच मजला वाटे पाहून चोरुन घेई गंध नेटका अंगणी वाहे वारा अवखळ प्राजक्ताचा गंध सुगंधी की आसे तो तुझाच दरवळ

अए खुदा, अए परवरदिगार

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 29/04/2020 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेने इराणच्या आर्थिक नाड्या आवळल्यापासून इराणमधल्या लोकांना मोहम्मद रफीच्या  एका गाण्याची  वेळोवेळी आठवण येत असावी ज्यात "परवरदिगार"ने किती तऱ्हेतऱ्हेच्या संकटांतून भक्तांना वाचवले याचे वर्णन आहे (https://www.youtube.com/watch?v=Rad2gbRFY8w ). अमेरिकेच्या प्रोत्साहनाने सुरू झालेल्या (आणि चालू असलेल्या) "जागतिक आर्थिक बहिष्कारामुळे" इराणमधील लोकांवर फक्त हे गाणे गातच जगण्याची वेळ आली होती.

खूप झालं देवा आता....

लेखक Vivekraje यांनी मंगळवार, 28/04/2020 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
खूप झालं देवा आता, काहीतरी चमत्कार कर.. नाहीच जमलं काही तर, तुझं अस्तित्व अमान्य कर.. किड्या मुंग्यांसारखी देवा, माणसं मरत आहेत.. तुला कसं कळणार म्हणा, तुझी तर देवळच बंद आहेत.. माहितीय का देवा तुला, अख्ख जग इथं थांबलय.. सगळे जिवंत आहोत, कारण फक्त मरण पुढं लांबलय.. धावणारी माणसं सगळी, आज घरातच कोंडलीत.. मंदिरही सुनी तुझी, सगळी फुलं सुकी पडलीत.. शेवटी म्हटलं देवा, कुठूनतरी ये पुन्हा गाभाऱ्यात तुझ्या.. तेवढ्यात आला चमत्कारिक आवाज हळूच कानात माझ्या.. चक्क देवच कुठूनतरी , जणू माझ्याशीच बोलत होता.. शब्द त्याचे होते की, स्वप्नात भास मला होत होता.. देव म्हटला... बेटा.....

लेपाक्षी -हम्पी व परत ... भाग चौथा

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 28/04/2020 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 भाग 2 भाग 3 भाग 3 वरून पुढे सकाळी उठलो. आज तुन्गभद्रेच्या पलिकडे नावेने जायचे व स्कूटर भाड्याने घेऊन विरूपापुरागड्डी बेटाला भेट द्यायची ,सानापूर तलाव, जुना हम्प्पी व्हायडक्ट सारखा ब्रीज करीत ,हनुमान हळ्ळी , पम्पा सरोवर व अन्जनेय पर्वत असा भरगच्च बेत मनात आखला होता. नाश्ट्याला पुरी भाजी चा आस्वाद घेऊन मी १३ वर्शापूर्वी जिथे राहिले होतो त्या " अर्चना गेस्ट " हाउस च्या आन्टीना भेट दिली.

सुटकेस

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 28/04/2020 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
टपरीवर सिगारेट घेतली तेव्हा बॉसचे शब्द कानात घुमत होतो. आपण फक्त गाढवासारखे काम करतो. असे तो म्हणाला. 'आपण' म्हणजे त्यात तो ही आलाच की. सिगारेटचा कश घेत मी तो विचारच डोक्यातून काढून टाकला. विक्या म्हणतो खरं आहे. आपल्याला फक्त शिव्या खाण्याचे पैसे भेटतात. जो नम्रपणे ऐकून घेईल त्याची पगारवाढ नक्की. सिगारेट संपवून मी गाडीला किक मारली. तेवढ्यात विक्याचा फोन आला. "अरे ऐकना जगदीश, बॉसला घेतला होता मगाशी केबिनमध्ये" "पुन्हा एकदा?" "हो, बेकार ठासलीय त्याची... तिन्ही डायरेक्टरनी.." "काय ग्रेट न्यूज आहे यार.. हाहा.." "पण बॉस जाम भडलकलाय, ऊद्या आपल्या टीमचं काही खरं नाही.. जरा जपून.." "ठिक आहे.

सिनेमातले विनोदी प्रसंग..

लेखक चिनार यांनी मंगळवार, 28/04/2020 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवा प्रियदर्शनचा खट्टामीठा सुरु होता. नेमका तो रोड रोलर नेण्याचा प्रसंग बघण्यात आला. हा एक अफाट विनोदी सीन आहे. प्रचंड नुकसानीत असलेला कंगाल कॉन्ट्रॅक्टर सचिन टिचकुले (अक्षय कुमार) नगरपालिकेविरोधात एक कोर्टकेस जिंकतो. आणि नुकसानभरपाई म्हणून त्याला पालिकेच्या मालकीचा रोड रोलर मिळतो. पण तो रोड रोलर नादुरुस्त आहे हे टिचकुलेला माहिती नसतं. रोलर चालवण्यासाठी स्पेशालिस्ट ड्रायव्हर जॉनी लिव्हरला बोलावण्यात येते. आणि रोडरोलर पुराण सुरु होते. जॉनी लिव्हरने टिपिकल ड्रायव्हरच्या भूमिकेचं बेयरिंग अचूक पकडलं आहे.

कोरोना चे परिणाम - नोकरीवर गदा - व्यवसायाचा मुहूर्त

लेखक उमेश पाटील यांनी मंगळवार, 28/04/2020 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोना चे परिणाम - नोकरीवर गदा - व्यवसायाचा मुहूर्त असे होईल असे अपेक्षित होते पण इतक्या लवकर होईल हे अपेक्षित नव्हते, ३० मार्च ला आमच्या कंपनीने काम नाही या कारणास्तव माझासहित ८ कर्मचाऱ्यांना जून पर्यंतचा पूर्ण पगार देऊन राजीनामा द्यायला लावला आणि वर सांगितले कि काम पूर्वतत झाले कि परत घेऊ असं, धक्का बसला पण काय करणार आणि मी ज्या प्रॉडक्ट वर काम करतो ते rare स्किल या प्रकारात असल्याने (Infor ERP - System Admin पूर्ण देशात फक्त १७ जण) नोकर्या पण कमी अगदी ६-८ कंपनी मध्ये संधी असते.

निर्घृण खुन..

लेखक मन्या ऽ यांनी सोमवार, 27/04/2020 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
निर्घुण खुन.. काय अपराध होता तयांचा जे त्यांस असे मरण यावे? माणसांतल्याच लांडग्यांनी तयांस जीवे ऐसे मारीले या माणसांपरी ते लांडगे तरी बरे हेरतात ते सावज भुक शमविण्यासाठी संचारबंदी असोनी ऐसा जथ्था तेथ जमला अन् माणसांतल्या माणुसकीचा निर्घुण खुन तेथेची जाहला.. (Dipti Bhagat)