Skip to main content

प्राणवेळा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी बुधवार, 06/05/2020 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
आठवांच्या काळवेळा पाहिल्या. हृदयाच्या प्राणवेळा पाहिल्या. मालवेणा चंद्र भोळा कालचा. कालच्या या चांदण्याही राहिल्या. सोसली मी ही तमांची अंतरे. रात्र काळी झाडपाने मंतरे. गारव्याने जाग आली या फुला. पाकळ्यांच्या गंधपेशी दाहिल्या. प्राण झाले कातिलांचे सोबती. सांग हे का माणसाला शोभती ? वाचण्याचे मार्ग सारे संपले. शेवटाला प्रार्थना मी वाहिल्या. -कौस्तुभ वृत्त - मालीबाला
काव्यरस

राक्षसमंदिर!

लेखक अज्ञातवासी यांनी सोमवार, 04/05/2020 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रकाशित! ©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे. ||प्रारंभ|| रटरटत्या उन्हात मल्लापाची भट्टी अजूनच रसरसली होती. कोळशाना वारा घालण्याचं काम अम्मा करत होती. "अम्मा, पाणी मिळेल काय?" अम्माने वर बघितले. आडव्या गंधाच्या रेषा ओढलेल्या, काळाकुट्ट चेहरा तिच्या समोर उभा होता. "हं." अम्मा हुंकारली, आणि आत गेली. त्या माणसाने तिथेच ठाण मांडलं आणि त्याच्या जवळची पोतडी उघडली. पोतडीतून त्याने एक डबी काढली. तिच्यातून चिमूटभर तंबाखू घेऊन त्यात चुना मिसळला. ती तंबाखू हातावर खसाखसा मळली.

दारू, लॉकडाऊन आणि अर्थशास्त्र

लेखक chittmanthan.OOO यांनी सोमवार, 04/05/2020 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोनामूळ लोकांचं बातम्या बघायचं प्रमाण लई वाढलंय . त्यात त्या काय सांगशील ज्ञानदान तर पोरसोरस्नी पण बातम्यांचा नाद लावलाय. तस रोजच्याच बातम्या असतील म्हणून टीव्ही लावला बघतोय तर काय कुठलं पण चॅनल लावा नुसत्या दुकानाबाहेर रांगा. तोंडाला मास्क,डोक्याला टोपी आणि हातात आठवड्याचा बाजार करायला लागेल एवढी मोठी पिशवी.दुपारच्या उनात रांगा किलोमीटर लांब गेल्या पण यांनी शिस्त काय सोडली नाही. मास्कने चेहरा झाकला होता पण डोळ्यातलं ते. समाधान तो आनंद कॅमेरामन च्या कॅमेरात कैद होत नव्हता.

सुपारी

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 04/05/2020 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी सुपारी घेतो. माणसं मारण्याची !... पण एक सांगतो , मी असं उगाच कोणाला मारत नाही . तर मी पैसे घेऊन खून पाडतो .आता कळलंच असेल तुम्हाला, मी एक मुडदे पाडणारा धंदेवाईक खुनी आहे म्हणून. लोकांचे वेगवेगळे धंदे असतात. उल्टे – सीधे ! समाजाला ते माहितीही असतं . त्यांना छुपी मान्यताही असते .मग आम्हीच काय घोडं मारलंय ? माझाही हा धंदाच आहे. असाच एक डॉन आहे ,त्याची मोठी गॅंग आहे, त्याचे अनेक धंदे आहेत. त्यातलाच हा एक - माणसं मारायचा . त्याचंही रुटीन असतं. तो काय करतो, रुटीनपेक्षा वेगळं काम आलं तर तो त्याच्या गँगच्या पोरांना सांगत नाही .मग तो माझ्यासारख्यांना अशी कामं देतो. मी त्याच्या गँगमध्ये नाही.

अग्निपथ: देख ना फिर से मत, कर शपथ, कर शपथ!

लेखक ए ए वाघमारे यांनी सोमवार, 04/05/2020 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
अग्निपथ अमिताभच्या अग्निपथ बद्दल खूप काही ऐकून होतो. पिक्चर कल्ट वगैरे आहे म्हणून. त्यामुळे अखेर नेटफ्लिक्सवर पाहण्याची हिंमत केली. हा चित्रपट कल्ट आहे हे कोणी ठरवलं देव जाणे पण तो रिलीज झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप का झाला असेल हे सांगणं मात्र काही अवघड नाही. अत्यंत कमजोर कथा जिला अमिताभने फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर तारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

[कविता' २०२०] - क्वारंटाईन!

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/05/2020 12:43 या दिवशी प्रकाशित केले.

क्वारंटाईन!




आलो तुझ्याचसाठी सेव्हन समुद्रावरून कंटाळून प्रेमाला, सदा करून ऑनलाईन सखये आलो कमवून बंडल काही डॉलरांचे निवांत फिरूया दोघे सारे स्पॉट टुरिस्टांचे यंदाच करून शुभमंगल पुढच्या वर्षी लिटल सन पाहतो उघड्या डोळ्यांनी हे ड्रीम फ्लाईटात बसून हाय! पडला हाती छाप विथ सरकारी डिझाईन तू तिकडे लुकिंग फॉर्वर्ड मी इकडे क्वारंटाईन!

सांग सांग भोलानाथ

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 04/05/2020 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असतांना खरंच वाटायचं - सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का - असे विचारल्यावर भोलानाथ बरोब्बर उत्तर सांगू शकेल.  आता विचारावेसे वाटत आहे - सांग सांग भोलानाथ - बिअरचा पाऊस पडेल कां ? नाही, नाही, कोरोना व्हायरसमुळे माझ्या मेंदूवर काहीही परिणाम झालेला नाही - मी पूर्णपणे "होशोहवास के साथ (अविरत हिंदी चित्रपट बघण्याचा लिहिण्यावर मात्र परिणाम झाला आहे )" लिहितो आहे हे  थोड्याच वेळांत तुमच्या लक्षात येईल.  आपण वसंतोत्सव वगैरे करत थंडीच्या दिवसांतून हळूहळू उष्ण काळांत प्रवेशतो.