ऍडमिशन हॉलमदे, इकडे तिकडे पाहत, कोणी भेटते का एखादा तरी ओळखीचा दोस्त, माया शोध चालू होता. कस दिसण बे कोणी? हा त तिसरा राऊंड होता. सगळ्यांन, बारावीमदे केलेल्या मेहनतची चांगली बक्षीस घेऊन, आधीच दोन राऊंड खल्लास केले होते. आता उरल सुरलं, काई हाय का आपल्या नशिबात? का ते पण नाय? याचाच उत्तर शोधले, मी लई आस लावून, माया नंबरची वाट पाहत उभा होतो.
अचानक एक लंबु , बारक, सावळस, थोड ओळखीच पोट्ट, त्याच्या बाबांबरोबर उभ दिसल.