Skip to main content

जीजी

लेखक सौन्दर्य यांनी रविवार, 21/06/2020 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. कित्येक वेळा छोट्या छोट्या घटना, गोष्टी आपल्याला आपल्या पूर्वायुष्यात नेतात. ह्या घटना एखाद्या दिव्याच्या बटनाप्रमाणे असतात, बटन दाबले की लख्ख प्रकाश पसरतो तसे आपल्याला काहीतरी अचानक आठवते. जीजी म्हणजे माझी आजी, तिच्या विषयीची खालील आठवण ही अशीच एका रेडिओ प्रोग्रॅमवरून जागृत झाली. जीजी आज सकाळी ऑफिसला येताना एन.पी.आर. रेडियोवर (ह्युस्टनचे लोकल रेडिओ स्टेशन) एक ‘स्टोरी कोर’ नावाचा कार्यक्रम ऐकला. तसा तो दर शुक्रवारी ब्रॉडकास्ट होतोच म्हणा पण आज ऐकायचा योग आला.

असा भास होतो

लेखक मनोज यांनी शनिवार, 20/06/2020 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
आभास होतो कसा त्रास होतो तू येत आहे असा भास होतो स्मरतो गजरा केसात माळलेला माझा कसा मोगरा श्वास होतो डोळ्यात जादू तिच्या पेरलेली जो पाहतो तो तिचा दास होतो कळायचे मला ती न बोलताही साथी कधी तोच मी खास होतो असे कुणी का इतके आवडावे जो जीवनाचा खरा ध्यास होतो

पुस्तक परिचय - The Great Game

लेखक मित्रहो यांनी शनिवार, 20/06/2020 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
(पुस्तकाचा परियच करुन देताना प्रत्यक्षात ग्रेट गेम म्हणजे नक्की काय होते तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास आहे म्हणूनच दोन भागात हा पुस्तक परिचय देत आहे.) पुस्तक : The Great Game लेखक : Peter Hopkirk ग्रेट गेम म्हणजे काय? ग्रेट गेम हा शब्द जरी रुडयार्ड किपलींग या इंग्रजी लेखकाच्या किम या पुस्तकामुळे लोकप्रिय झाला असला तरी त्याआधी सुद्धा हा शब्द वापरण्यात आला होता. एकोणवीसाव्या शतकात ग्रेट ब्रिटन आणि रशिया यांच्यात मध्य आशियावर वर्चस्व ठेवण्यासाठी जो संघर्ष झाला त्यालाच ग्रेट गेम असे नाव दिले गेले.

रूटीनाच्या रेट्यातही

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 20/06/2020 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
रूटीनाच्या रेट्यातही कधी थोडं वेडं व्हावं दवबिंदूत इवल्या ओलं ओलंचिंब व्हावं कानठळी कोलाहली अंतर्नादी गाणं गावं प्रमेयाच्या पंखाखाली व्यत्यासांना विसरावं चारोळीनं महाकाव्य पचवून ढेकरावं धीट शून्यानं शतदा अनंताला हाकारावं
काव्यरस

दोसतार -५२

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 20/06/2020 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
घरी संस्कृत गोष्टींचे पुस्तक नव्हतेच. आज्जीची पुस्तके होती पण ती देवाची होती. त्यात गोष्टी नव्हत्या. हरिविजय , गोपिकाष्टकम , महाभारत रामकथासार अशी होती. आणि आज्जीला त्या गोष्टी माहीत होत्या आई ती पुस्तके वाचायची पण तीला त्यातील गोष्टी माहीत नव्हत्या. नाही म्हणायला संगीत मंदारमाला नावाचे एक नाटकाचे पुस्तक होते पण ते मराठीत . संस्कृत नाही. कुठेतरी सापडायलाच हवी संस्कृत गोष्ट. मागील दुवा http://misalpav.com/node/47035 संस्कृत पुस्तके दुकानात पण मिळत नाहीत. जी काही मिळतात ती श्लोक आणि कसल्याशा पुराणांची.

राजयोग - १७

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 19/06/2020 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१५ राजयोग-१६ *** अनेक व्यक्तीगत कारणांमुळे पूर्ण करायची राहून गेलेली ही मालिका सर्व वाचकांची माफी मागून पुन्हा सुरु करीत आहे. सर्व रसिक वाचक मोठ्या मनाने मालिकेला पुन्हा प्रतिसाद देतील अशी आशा आहे. या भागात फक्त भाग सोळा आणि पंधराची लिंक देते आहे. पंधराव्या भागात अनुक्रमणिका असल्याने मागचे भाग सहज उपलब्ध होतील. या काळात ही मालिका पूर्ण करावी म्हणून प्रोत्साहन देणार्या सर्व मिपाकरांचे अनेक आभार.

डोक्याला शॉट [तृतीया]

लेखक गड्डा झब्बू यांनी गुरुवार, 18/06/2020 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
"हरी ओsssम" असे मोठ्या आवाजात म्हणत रवी बाबाने चिलीम धरलेली हातांची जुडी कपाळाला लावली आणि डावीकडे बसलेल्या राजाराम बुवाने पेटवून धरलेल्या माचीसच्या दोन काड्यांजवळ तिचे टोक आणून सर केली. गांजाचा एक दमदार झुरका मारून तोंडातून धुराचे लोट सोडत चिलीम शेजारी बसलेल्या रज्जुभैय्याच्या पुढ्यात धरली. "चल चली को चाम ले...साई बाबा का नाम ले" असा घोष करून रज्जुभैय्याने जोरकस दम मारून चिलीम बाजूच्या सागर संजयक्षीर कडे पास केली. सर्वज्ञानी सागरने आधी तोंडावरचा N95 मास्क काढला. मग खिशातून 80% अल्कोहोल असलेल्या सॅनीटायझरची बाटली काढून दोन्ही हातांचे निर्जंतुकीकरण केले.

ग्राहकमंच : सामान्यांचा हक्क !

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 18/06/2020 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
बँक ऑफ इंडीयाचा नॅशनल इंशुरन्सबरोबर मेडी-क्लेमचा टाय-अप होता. बँकेच्या कस्टमर्सना माफक प्रिमियममधे मेडि-क्लेम कवर अशी योजना होती. फॉर्म भरतांनाच तिथे असलेल्या स्टँडींग इंस्ट्रक्शनवर सही करणं (प्रिमियम ड्यू डेटला खात्यातून परस्पर नॅशनल इंशुरन्सला पाठवला जाईल) अनिवार्य होतं. त्याशिवाय तो फॉर्म वॅलीड नव्हता. सात वर्ष प्रिमियम योग्य वेळी बँकेतून परस्पर खात्याला डेबीट होऊन पॉलिसी ऑटोमॅटीक रिन्यू होत होती. आठव्या वर्षी बँकेच्या गफलतीनं प्रिमियम भरायचा राहिला आणि पॉलिसी लॅप्स झाली. नेमक्या त्याच वर्षी पत्नीला हॉस्पिटलाइज करावं लागलं. पॉलिसी लॅप्स झाल्याची मला कल्पनाच नव्हती.

व्हिडिओ अभिवाचन:-गुरुजींचे भावविश्व-प्रस्तावना व भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/06/2020 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे. आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे.

अंतर

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 18/06/2020 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं माझं हे दूर असणं जसे नकाशावरचे दोन ठिपके. आठवण करून द्यायला जणू, की कितीही म्हटलं तरी झालोय परके. तुझ्या माझ्या ठिपक्यांना, जोडणारी ती रेषा नकाशात ती दोघांमधलं अंतर दाखवते. पण सरळसोट नाहीच ती, नात्यांसारखी तीसुद्धा नागमोडी वळते. मला त्यात नात्याची एक उसवलेली वीण दिसते... डॉ. माधुरी ठाकूर
काव्यरस