Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणींच्या शिंपल्यातले खेड

लेखक मनस्विता यांनी रविवार, 23/08/2020 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 बाबांच्या बदलीच्या नोकरीमुळे बारा नाही, तरी चार गावचे पाणी प्यायला मिळाले आणि आठवणींची अनेक गाठोडी माझ्याकडे सांभाळून ठेवली गेली. खरे तर सगळ्याच आठवणींचा पसारा मांडावासा वाटला. पण एवढा पसारा निस्तरायचा कसा, म्हणून मग एकच गाठोडे उघडायचे ठरवले. माझा आई-बाबांबरोबरच्या फिरतीचा प्रवास सोलापूरपासून सुरू झाला आणि पुण्यात येऊन थांबला.

तपश्चर्या

लेखक माझिया मना यांनी रविवार, 23/08/2020 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
इथे कोणी गिरिजा राजवाडे रहायच्या का? असे विचारणाऱ्या म्हाताऱ्या इसमाकडे दीपाने वळून पाहिले. गाडी स्टँडवर लावत ती मागे आली. काय काम आहे त्यांच्याकडे? असे तिने जरा रागातच विचारले. त्या कुठे आहेत, मला त्यांना पहायचंय एकदा, अजीजीने ते उत्तरले. हे असलं विचित्र उत्तर ऎकून दीपा आत गेली, आणि ८० वर्षाच्या सासूबाईंना घेऊन बाहेर आली. ओळख पटली नि गिरिजाबाईंना हे घर ना सोडण्याच्या आपल्या निर्णयाचा आनंद झाला. ६४ वर्ष वाट पाहून, मनाची समजूत घालून जिवंत समजत असलेला पती जिवंतच होता. रागाच्या भरात सोडलेले घर पुन्हा जवळ केले त्याने. गिरिजाबाईंनी देवाचे अाभार मानले. आज ६४ वर्षांनी तपश्चर्याला फळ मिळाले.