Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणीतला सापमार गरुड

लेखक MipaPremiYogesh यांनी सोमवार, 31/08/2020 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
1 ऑक्टोबर, २०१८. नेहमीप्रमाणे आम्ही भल्या पहाटे - म्हणजे ५ वाजता पुण्यातून सासवडकडे कूच केले. बोपदेव घाटामार्गे सासवड पार करून यवतकडे निघालो. तिकडे थोडे अंतर गेल्यावर एक पूर्ण माळरान आहे. बऱ्याच वेळा आपल्याला माळरानाबद्दल काहीच माहिती नसते आणि बोडके डोंगर-दऱ्या दिसले की वृक्षारोपण करावे असे वाटते.

Soap Opera

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 30/08/2020 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
जमेल तसे जास्तीत जास्त स्वत:ला विकायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक सगळ्या मालिका सारख्या त्यात दळली फक्त कणी पाझरती सा-या वाहिन्या जसे गटारातील पाणी निर्बुद्धपणा कळसाला सारे कैकयीचे वंशज कमरेचे अजून कमरेला तेही सुटेल लवकरच रोज त्याच घाणीमध्ये डुकरासारखं लोळायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक पेराल तेच उगवते पहाल तेच निपजते तणासारखे वाढते TRP वर फोफावते पडद्यावर जे दिसेल ते सुख देवो मनाला अभिरुची सोडून दे डोकं बांध गुडघ्याला भरलं ताट टाकून कच-यावर पोट भरायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक पुरुषांना साड्या नेसवून पाचकळ विनोद करूया पडद्यामागून जोरदा

Food - Kitchen Affairs - २. शिरा

लेखक गणेशा यांनी रविवार, 30/08/2020 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
उशिरा का होईना, आमचा किचन मध्ये एकदाचा प्रवेश झाला. लग्नानंतर बायकोला, मी आधी स्वयपाक करत होतो असे सांगण्याची risk घेतली होती खरी, पण १-२ दा चहाच (ऑफकोर्स ती करते त्या पेक्षा भारीच) काय तो मी तिला करुन दिला बाकी किचन मध्ये मी शक्यतो कधी लुडबुडलो नाहीच. तशी बायकांपेक्षा पुरुषांच्या हाताला चव जास्त असते, असे माझे ठाम मत आहे. असे का ? हे मी माझाच विचार करत असताना लक्षात आले की, पुरुष हे कुठलीही गोष्ट करताना त्यातल्या वस्तु /जिन्नस मनसोक्त टाकतात, त्यात कंजूस पणा नसतो.. शिवाय त्यांचे लक्ष कदाचीत सासु सुनेच्या टीव्ही सिरिअल कडे नसते हे कारण पण असु शकते. शिवाय आज तू हे बनवले होते का?

Night Out...! Part-2 (Last Part)

लेखक प. शी. यांनी रविवार, 30/08/2020 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
पाटीलने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तिथे आधी पासूनच दोन कॉन्स्टेबल उभे होते. "काय रे, कश्याला हात तर नाही लावला ना?" घोरपडे ने गाडीत बसूनच विचारले. "नाय sir" कॉन्स्टेबल ने उत्तर दिले. पाटील आणि घोरपडे गाडीतून उतरले. "कुठेय?" घोरपडे ने रस्त्याच्या कडेला थुंकत विचारले. "त्या झाडाकडे..." कॉन्स्टेबल ने झाडाकडे खुणावत सांगितले. "पाटील, बघा जरा जाऊन" पाटील, रस्त्या शेजारील झुडपे ओलांडत झाडाकडे जाऊ लागला. "अजुन काय काय सापडलं?" घोरपडे विचारपूस करू लागला. "ही एक अॅक्टिवा आणि purse. हे लायसेन्स आणि आधार कार्ड मिळालं त्यातून" एका कॉन्स्टेबल ने लायसेन्स आणि आधार कार्ड घोरपडे ला दिलं.

ताजमहाल, कार्बन १४ कसोटी आणि प्रो. मार्विन मिल्स

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 30/08/2020 13:17 या दिवशी प्रकाशित केले.

ताजमहाल, कार्बन १४ कसोटी आणि प्रो. मार्विन मिल्स

1 मार्विनमिल्स यांची ओळख ३७ मिनिटांच्या चित्रफितीतून अशी होते. Link for Lecture by Prof Marvin Mills

मित्र हो, ताजमहालाच्या संदर्भात लेखमाला सादर केली जात आहे. त्या संदर्भात विविध पैलूंवर प्रकाश टाकला जावा म्हणून लेखन केले आहे. यामधील एक महत्वपूर्ण दुवा ताजमहालाच्या बनावटीचा काल निर्णय करता येईल का? हा मानला जातो.

श्रीगणेश लेखमाला २०२० - बालपणाच्या स्मृती

लेखक Giriratn Raje यांनी रविवार, 30/08/2020 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
1 बालपण म्हटले की खूप साऱ्या सुखद आठवणी ताज्या होतात.. हो ना? मनात विचार येऊन जातो, खरेच किती छान दिवस होते ते... कसले दुःख नाही, कसली जबाबदारी नाही वा कुठल्या गोष्टीचा विचार नाही की कशाचे दडपण नाही. अगदी स्वछंद, निर्मळ, निरागस आणि आता हवेहवेसे वाटणारे ते दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात येतात हे सोनेरी क्षण आणि उरतात फक्त आठवणी...

श्रीगणेश लेखमाला २०२० - जीवनातील पहिले महायुद्ध

लेखक प्रणव बनसोडे यांनी रविवार, 30/08/2020 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
1 मित्रांनो, महायुद्ध म्हटले की तलवार, रणगाडा, बंदुका, भाले इ. गोष्टी आल्याच. पण मी ज्या महायुद्धाचा उल्लेख येथे करत आहे, ते शीतयुद्ध-cum-महायुद्ध आहे. हे युद्ध आहे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे! आता तुम्हाला वरील उतार्‍याचा अर्थ कळला असेल. माझ्या बाबतीत दहावा वर्ग काय ठरला, याचे हे छोटे चित्र आपल्या डोळ्यासमोर मांडतो.

लंचटाईम

लेखक rushikapse165 यांनी रविवार, 30/08/2020 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
२०१७ साली शिक्षणासाठी मी पुण्यात आलो.शहर अनोळखी नव्हतं पण नवीन होत,त्यात पहिल्या वीस दिवसात मी माझ्या खोलीत एकटाच होतो,त्यामुळे खूप विचित्र वाटायच,रडायला यायचं.त्यात मला कोणाशी मैत्री करायला जरा जास्तच वेळ लागतो,म्हणून घराची आणि मित्रांची सारखी आठवण यायची. पण हळूहळू मी त्या वातावरणात रुळू लागलो,मित्रही बनत गेले,पण शेवटी हाॅस्टेल आणि घर यांच्यात फरक तर असणारच ना.त्यात मला भूक सहन करणे म्हणजे अशक्य.तसा मी हाॅटेल मॅनेजमेंटच्या काॅलेजात असल्यामुळे दुपारच्या जेवणाची व्यवस्था काॅलेजमधचयेच असायची.१२:५० ला आम्ही डायनिंग हाॅलकडे जायचो,तिथे रांगेतून ताट घेऊन टेबलवर जाऊन बसायच. पण आमच्यात काह

आजकाल

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 29/08/2020 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोलाहलात गर्दीच्या एकांत मी कवळतो अंधारून येता मीच अंतर्बाह्य झळाळतो रिक्ततेच्या डोहामध्ये सदा सचैल डुंबतो शून्य असूनही थेट अनंताशी झोंबी घेतो आठवता आठवता पुन्हा त्याला विसरतो दशदिशा कोंदून जो दहा अंगुळे उरतो
काव्यरस

Night Out...!

लेखक प. शी. यांनी शनिवार, 29/08/2020 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमच्या पापण्यांची हालचाल झाली. पुसटशी चमक त्याला दिसत होती. रस्त्यावर काचेचा चुरा पडला होता. त्याची bike रस्त्याच्या कडेला तशीच पडून होती. तो भानावर आला. डोक्याला हात लावत रस्त्यावरच बसुन होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती. त्याच कपाळ, भुवया, कान सर्व काही रक्ताने माखल होत. हाता-पायालाही बरचस खरचटल होत. गुढग्या जवळ खरचटल्यामुळे jeans फाटली होती. शर्ट रक्त आणि मातीन माखला होता. तो हळुहळु ऊभा राहीला. त्याची नजर सुमनवर पडली. सुमन रक्ता-मातीच्या चिखलात तशीच निपचीत पडून होती. तिचा एक पाय Activa च्या खाली अडकला होता. तिचे रक्ताने भरलेले केस तिच्या चेहर्यावर चिटकून होते.