Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२० - समारोप

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 02/09/2020 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मागील दहा दिवस सुरू असलेला गणेशोत्सव अन मिपाच्या श्रीगणेश लेखमालेचा शब्दोत्सव यांचा आज समारोप होतोय. मिसळपावची स्थापना श्रीगणेश चतुर्थीची. मिपाचा यंदा चौदावा वर्धापनदिन. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या मिपा श्रीगणेश लेखमालेचे हे नववे वर्ष. यंदा 'आठवणी - स्मृती' या विषयावर लेखमाला घेण्याचे जाहीर केले आणि मिपाकर नॉस्टॅल्जिक झाले. हा विषय किती जिव्हाळ्याचा आहे, हे आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आले. वाचकांनाही हा विषय व लेखमाला आवडल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले. या लेखमालेच्या निमित्ताने मिपाकरांनी किती वेगवेगळ्या आठवणींचा धांडोळा घेतला!

एकतारी

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 01/09/2020 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
धपापता ऊर गातसे ललित । हळवे ते सूर जीवघेणे ।। विरहाने चूर ठिणगी विदेही। जाणवतो धूर काळजात ।। वेदनेचा पूर क्षितिज ओलांडे वासुदेव दूर भिजे स्वतः ।। राऊळीं कापूर एकटा झुरतो । ज्याची हुरहूर तोच जाणे ।। चांदण्या फितूर दिसे कृष्णमेघ । वाजे कणसुर एकतारी ।। - अभिजीत

नोकरी ते उद्योजकता: एक ध्येय वेडा प्रवास!

लेखक केडी यांनी मंगळवार, 01/09/2020 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
Shvaan मी स्वयंपाक कधी करायला लागलो हे खरेच आठवत नाही, पण स्वयंपाक करायला लागलो याचे कारण मात्र माझे बाबा होते. बाबा मुळातच खवय्ये होते आणि आई सुगरण, त्यामुळे आमच्या घरात चमचमीत पदार्थांची रेलचेल असायची. बाबांच्या या खवय्येगिरीमुळेच असेल कदाचित, मला स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली.

टंकबोली

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 01/09/2020 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
बोली ही कुठल्याही संभाषणात संवादात आपण वास्तव जगात वापरतो.आपण त्याला वैखरी वाणी असेही म्हणतो. ही बोली वापरताना आपण नकळत अजून एक संवादाच माध्यम वापरत असतो ते म्हणजे देहबोली. ही देहबोली आपल्या बोलीत मिसळून गेलेली असते. या देहबोली व बोली यांच्या समुच्चयातून आपल्या भावना प्रकट होत असतात. आपल्या बोलीतून व्यक्त होणारे भावना, विचार यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले प्रकटीकरण झाल्यानंतर समोरच्याला झालेले त्याचे आकलन यात ताळमेळ नसेल तर गैरसमज तयार होतात. हा ताळमेळ तपासायचा कसा? आपण तो प्रतिसादातून तपासायचा प्रयत्न करतो. म्हणजे पुन्हा आकलन हा मुद्दा अपरिहार्य.

मिशन कुंभार्ली (सायकलवरून कुंभार्ली घाटाची सफर)

लेखक मालविका यांनी मंगळवार, 01/09/2020 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
मिशन कुंभार्ली श्रीनिवास बरोबर राहून सायकलचं वेड चांगलंच लागलंय आता. त्यात कोरोना , लॉकडाऊनमुळे कुठेही बाहेर पडणं, भेटणं बंद झालंय. सुरवातीचे लॉकडाऊनचे महिने नवीन रेसिपी कर, ईशान बरोबर अंगणात खेळ, शेतावर चालायला जा यात गेले. पण जसजसा हा लॉकडाऊन वाढला नि पावसाळा सुरु झाला, वातावरण आणखीनच बोअरिंग व्हायला लागलं. यातच चिपळूण सायकलिंग क्लब ची स्थापना झाली नि त्यातले मेंबर्स नवीनवीन ठिकाणी सायकलच्या फेऱ्या मारायला लागले . शेवटी मी पण त्यांच्यात सामील व्हायचं म्हटलं पण त्यांच्या वेगाशी माझा वेग काही जुळेना नि माझ्यासाठी म्ह्णून श्रीनिवास थांबून पाठी पडायचा.

देव आणि माणूस

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/09/2020 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आधी देव का आधी माणूस? आज आपण जे देव भजतो ते सगळ्याच प्रकारच्या सजीवांचे देव आहेत का? (आहेत असं आपण समजतो. माणसाला बुध्दी आहे. म्हणून तो पूजा, पाठ, विधी, कर्मकांड वगैरे करतो. मुक्या प्राण्यांना बुध्दी नाही, म्हणून ते देवाला भजत नाहीत, असंही आपलं प्रामाणिक मत असू शकतं. ) प्राण्यांसाठी विशिष्ट एखादा देव असेल तर तो कोणता? प्राणी आपल्या देवाची प्रार्थना कशी करतात? पूजा कशी करतात? प्राण्यांच्या देवांची मंदिरं कुठं असतात? समजा प्राण्यांचा देव मूर्त स्वरूपात असला तर त्या देवाची मूर्ती कशी असेल? वाघांचा देव वाघासारखा असावा का?

सांग दर्पणा

लेखक ज्येष्ठागौरी यांनी मंगळवार, 01/09/2020 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सांग दर्पणा... एका अगदी प्रिय दुकानात चक्कर मारताना अतीव सुंदर आरसा दिसला,एकदम स्वच्छ चकचकीत आणि सागवानी लाकडाची सुंदर किनार.मन थबकलं तिथंच,मनात विचार करूनही त्या क्षणी घरात योग्य जागा सापडेना त्याच्यासाठी. मग पुन्हा येण्याचा निश्चय करून वळले. शास्त्रात शिकवलंय की आरसा ही एक प्रकाश परावर्तित करणारी चमकदार वस्तू असते.