Skip to main content

#ALAN WALKER #MUSIC

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 15/09/2020 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
#ALAN WALKER #MUSIC Alan walker चे on my way आणि इतर गाण्यांची “World of Walker triology” mini film च आहे,त्याबद्दल इथे थोडे लिहिते आहे,साधारण २०१५ -१६ पासून टप्प्या टप्प्याने याची वेगवेगळी गाणी youtubeवर प्रदर्शित होत राहिली आहेत.२०२० मध्ये या गाण्यांच्या मालिकेचा शेवट झाला आहे. Faded (2015) and Sky नावाच्या गाण्याने या seriesची सुरुवात होते . ..कथा अशी आहे की, १. Tired या गाण्यात दाखविले आहे की, Alan walker हि संस्कृती प्राकृतिक आपदेमुळे नष्ट झाली असते.तेव्हा Walker black team (अनुयायी) हे नष्ट होतात. २.

मज सुचले गं

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 15/09/2020 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
मज सुचले गं सुचले मंजुळ गाणे हिंडता डोंगरापाठी सापडले कोरीव लेणे विसरल्या उन्हातली वाटा विसरले पथातील काटे ही गुहा भयावह आता स्वप्नासम सुंदर वाटे रसभाव भराला आले काव्याहून लोभसवाणे बोलाविण घुमती वाटे तालात नाचती प्रीती शब्दाविण होती गीते बेभान भावना गाती हा लाभ अचानक झाला हे कुण्या प्रभुचे देणे आकृती मनोहर इथल्या मी एक त्यातली झाले लावण्य बरसते येथे सर्वात तयात मी न्हाले सौंदर्य जीवना आले जन्माचे झाले सोने गीत:शांताबाई शेळके संगीत:दत्ता डावजेकर स्वर:आशा भोसले ################# शब्दापलीकडे जाऊन काहीतरी सुचवणारं.

शिवप्रतापाची झुंज ( भाग ३)

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 15/09/2020 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेचे आधीचे भाग ईथे वाचु शकता शिवप्रतापाची झुंज ( भाग १) शिवप्रतापाची झुंज ( भाग २) राजगडाच्या सदरेवर नेहमीप्रमाणेच कामकाज सुरु होते.बराच नवीन मुलुख स्वराज्याला जोडला गेला होता.त्याचे खलिते,महजर सदरेवर येत होते.कल्याणच्या बंदरात जहाजाची उभारणी सुरु होती.त्याच्या खर्चाची तजवीज लावायची होती.राजे स्वत उसंत न घेता या सार्‍या मसल्यात जातीने लक्ष घालत होते.ईतक्यात एक खलिता घेउन हेजीब विजापुरावरून आला आणि त्याने लखोटा थेट राजांच

कार्गो - एक फसलेला प्रयोग

लेखक साहना यांनी मंगळवार, 15/09/2020 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान कथा हा प्रकार मला विशेष प्रिय आहे. कार्गो हा नेटफ्लिक्स चा चित्रपट पाहायची उत्सुकता होती. आमचे एक मित्र ह्या प्रकल्पावर काम करत असल्याने सुद्धा विशेष उत्सुकता होती. पण हा चित्रपट सपशेल फेल आहे. कथानक तुम्हाला सांगितले तरी काहीही फरक पडणार नाही कारण ह्यांत स्पॉईलर असे काहीच नाही. "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" ह्यांत जसे मथळ्यांतच कलाईमेक्स सांगून कारण जोहर मोकळा झाला होता त्याच प्रमाणे कार्गो म्हणजे सुद्धा एक अवजड ओझे आहे जे तुम्हाला सहन करावे लागते. राक्षस आणि मानवांचा एक तह झाला आहे. राक्षस लोक म्हणजे X-men प्रमाणे विशेष शक्ती असलेले खूप वर्षे जगणारे लोक आहेत.

तहान

लेखक अन्या बुद्धे यांनी रविवार, 13/09/2020 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
झाडांचे उंच पिसारे वारा हलतो जरासा माझ्याही ओठावरती थिजली शुष्क पिपासा पेटले आभाळ वरती दूरस्थ शीतल जाळ पाण्यावर मंद लहरींच्या पायी बांधले चाळ पोकळीत वैशाखाच्या तरंगते उष्ण हवा डोंगरात झाडामध्ये शोधते शांत विसावा दगड झाड अन पाणी मी याहून वेगळा नाही कोलाहलातून शहराच्या अलगद निसटू पाही बुडता सूर्य मावळतीला घरट्यात परतती रावे कणाकणात या सृष्टीच्या अलगद मिसळून जावे जाग झोपेमधुनी येता जाणीव याची व्हावी आकाशी डुलत्या फांद्या मुळे जमिनीत असावी रोकडा क्षण आत्ताचा जाणिवेत पूर्ण भरावा साजरे पुरे अस्तित्व अन जगण्याचा उत्सव व्हावा -अनुप

मिपावर १२ वर्षे पूर्ण झाली...

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 13/09/2020 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
सहज मिपावर नजर टाकताना लक्षात आले की मिपासदस्य होऊन मला १२ वर्षे झाली...! त्या काळात माझ्याकडून ३०० धागे सादर केले गेले. हा ३०१वा असेल... 1 या धाग्यावर प्रियालींनी आल्या आल्या माझा बोल्ड उडवला. म्हणाल्या, मिपाचा दिवाळी अंक २००८चा येण्याच्या आधीच हा लेख प्रकाशित केला आहे? आता पाहता ९८०० टिचक्या त्याला पडल्या. नाडी ग्रंथ विषयाने धमाकेदार एन्ट्री घेतली. त्यानंतर विविध विषयावर माझे लेखन सादर करायला हा मंच फारच उपकारक झाला. मिपाकरांच्या मेळाव्यात नवे मित्र झाले. मुंबईला जाऊन बोटीतील प्रवासकरून घारापुरीच्या लेण्याची माहितीपुर्ण सफर झाली.

सोबतीण

लेखक Prajakta Sarwade यांनी रविवार, 13/09/2020 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज अंगणातच मला दुरावा दिसला, सगळयानी त्याला परक केल याची खंत सलत होती त्याला, त्याची ती अवस्था पाहवली नाही मला, मी दुराव्याला ही आपलेस केलं, असहायतेलाही साहय केलं, दुख ही दरात उभा राहुन पाहत होत सार. त्याच ही अगदी आनंदाने स्वागत केलं, तो मला विखुरताना पाहयला आला होता, त्यालाच मी प्रेमाच्या दोन शब्दांने सावरलं, ते एेकुन माञ त्याचे डोळे नभाळ झाले आणि दुख ही त्या क्षणी सुखावला, कसली तरी चाहुल लागली, कोण आहे तिकडे, पाहलं कोपरयात गुपचुप खाली मान घालुन एकटाच एकटेपणा बसला होता काय हवं तुला?

झड

लेखक चलत मुसाफिर यांनी शनिवार, 12/09/2020 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची येता झड जुने जातसे वाहून आठवणींचा दोदाणा आणि अंतरीची खूण धोधो पाऊस वाहता माझे मन स्वच्छ होई मागमूस किल्मिषांचा सापडेना कोण्या ठायी कडाडते वीज नभी लख्ख तेज चकाकते आठवणीतले हसू तिचे मज खुणावते झड थांबे घटकेने थंडगार आसमंत पाण्यातले प्रतिबिंब भासे मज शांत शांत (दोदाणा: पाण्याचा वेगवान प्रवाह)