Skip to main content

एका नातवाची आजी....

लेखक Vivekraje यांनी शुक्रवार, 02/10/2020 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
रोजची रात्री साडेआठची बस. या बसला शक्यतो रोज अप डाऊन करणारे, काही कॉलेजची मुलं अशी नेहमीची गर्दी. मुंबईत नसलो तरी आम्ही बस ने अप डाऊन करताना तसाच लोकलचा फील यायचा आम्हाला. कारण प्रत्येक बस ला वेगळा ग्रुप, वेगळी माणसं त्यामुळे आपली रेग्युलर बस चुकली की एकदम अनोळखी प्रदेशात आल्यासारखं वाटायचं. असंच त्या दिवशी माझी रोजची साडेसातची बस चुकली अन मी साडेआठच्या बस मध्ये बसलो. बस गच्च भरलेली घामाचा कोंदट वास , उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे हवेतही उष्णता जाणवत होती. बस सुटायला थोडावेळ बाकी असताना एक आजी बसमध्ये शिरली, हातात छोटंसं गाठोडं , एक नायलॉनची पिशवी.

फोटोयुक्त लेखनाची नवी रेसिपी

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 01/10/2020 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
.field-items img {border: 1px solid #669999;} नमस्कार मिपाकरांनो, मिपावर लेखनात फोटो समाविष्ट कसा करावा? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. वास्तविक ह्या विषयावर खाली दिलेले दोन उपयुक्त धागे मिपावर उपलब्ध आहेत. मिपावर चित्रे टाकण्याची कृती - डॉ.

बळी तो कान पिळी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/10/2020 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे एवढ्यात तीन बातम्या ऐकण्यात आल्या. दर्जेदार वृत्तपत्र आणि राष्ट्रीय चॅनलवरुन या बातम्या ऐकल्या असल्याने या अफवा नसाव्यात, त्यांत तथ्य जरुर असावं : बातमी क्रमांक एक : ‘तयार होऊ घातलेली करोनाची लस (अनेक असल्या तरी) जगातल्या काही श्रीमंत देशांनी आधीच बुक करुन ठेवल्या. म्हणून अशा काही लसींना अधिकृत मान्यता मिळताच त्या श्रीमंत देशांना आधी पुरवल्या जातील.’ विसनशील आणि गरीब देशांपर्यंत ही लस पोचायला म्हणून खूप उशीर होणार आहे. तोपर्यंत अनेक लोक आपला प्राण गमावू शकतात.

पेटता दिवा (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 01/10/2020 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
जंगलाच्या वेशीबाहेर ते दोघे उभे होते. केशव आणि राघव. दोन्ही हात कमरेवर ठेवून, ते आत खोलवर जंगलाकडे बघत होते. जंगलाच्या खोलीचा, घनतेचा अंदाज घेत होते. आज त्यांनी पैज लावली होती होती. आणि ती आजच पूर्ण करायची होती. शाळा नेमकीच सुटल्याने, ते लगबगीने जंगलाकडे आले होते. कोणी आपल्याला पाहिले नाही ना? याची भिती होती. परंतु तसे काही झाले नव्हते. ते दोघे त्या जंगलाच्या वेशीबाहेर उभे होते. सूर्य मावळतीला आला होता. डोंगराआड जाण्याची त्याची लगबग सुरू झाली होती. कोणत्याही क्षणी, तो त्या मोठ्या डोंगराआड अदृश्य झाला असता.

स्थलांतर..

लेखक Vivekraje यांनी गुरुवार, 01/10/2020 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
भाकरी साठी शोधली चाकरी, चाकरीसाठी सोडलं गांव.. शहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव.. रोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं.. मजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं.. थकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल.. माझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल.. तेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला.. उद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला.. घरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती.. आठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती.. जायला रस्ते भरपूर होते, पण साधन काही मिळणार नव्हते.. स्थलांतरित मजुरांचे हे दुःख कधी कुणा कळणार नव्हत

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ....( आजकालचं)

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 01/10/2020 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं.. सक्काळी उठल्या उठल्या पहिला मेसेज चेक करता? झोपेतसुद्धा मोबाईल उशीपाशीच ठेवता? काय म्हणता, Last seen चेक करत उशीरापर्यंत जागता?? मिशीतल्या मिशीत किंवा गालातल्या गालात दिवसभर हसत असता? म्हणजे मग झालं तर! घोडं गंगेत न्हालं तर! व्हर्च्युअल जरी असलं, तरी बावनकशी जेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ज्या प्रोफाइलला आपण हळूच पहात असतो, तिथे typing दिसणं ...म्हणजेच feeling loved असतं. आणि online दिसूनही blue tick न दिसणं, काय सांगू?
काव्यरस

अ ब्यूटीफुल डे इन द नेबरहूड- मुलाखतकाराची मुलाखत

लेखक ए ए वाघमारे यांनी बुधवार, 30/09/2020 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
Tom Hanks प्रसिद्ध अमेरिकी नियतकालिक ई-स्क्वायरच्या १९९८ सालच्या एका अंकात आलेल्या ‘Can You Say … Hero?’ या मुखपृष्ठकथेवर आधारलेला गेल्या वर्षी आलेला हा चित्रपट. सत्य घटनांवर आधारित. फ्रेड रॉजर्स या अमेरिकी टीव्ही सेलिब्रेटीभोवती केन्द्रित. फ्रेड रॉजर्स हे एक अनोखं व्यक्तिमत्त्व अमेरिकी मनोरंजन क्षेत्रात होऊन गेलं. त्याचा लहान मुलांसाठीचा “Mr. Roger’s Neighbourhood” नावाचा कार्यक्रम जवळपास चाळीस वर्षं तिकडच्या बालचित्रवाणीवर चालला. हा एक विक्रमच आहे.

मावळतीला

लेखक Pratham यांनी मंगळवार, 29/09/2020 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस मावळतीकडे झुकताना सावल्या अदृश्य होऊ लागतात.मनात एक हुरहूर लागून राहते.ती हुरहूर आपल्याला नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाही,हवीहवीशी तरीही नकोशी.एक वेगळीच भावना असते ती.चार भिंतीमध्ये बसून राहिले तर मन उदासीन होते तेच जर मोकळ्या हवेत गेले तर एकदम शांत वाटते,अस्तित्वाची जाणीव होते.सूर्य मावळतानाचे दृश्य खूप सुखद वाटते.सूर्य हळूहळू कलत असतो,आकाशात तांबड्या-केशरी रंगाची उधळण असते.एखाद्या तळ्या किनारी मावळतीचे दृश्य भलतेच सुंदर दिसते.पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते,आकाश लाल रंगात न्हाहून गेलेले असते,पक्षी दिवसभर अन्नासाठी भटकून परतताना दिसतात.झुंडीने ते एका संथ लयीत उडत असतात.पाण्य

प्रतिभा

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 28/09/2020 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझ्या रोज भोवती असते एक अदृश्य सोबती असते मी कधी रिक्त शाश्वती असते... वा कधी दिव्य आरती असते! आसवांचे जुनेच लोलक, पण- मी नवी रंगसंगती असते सांजवेळी तुझा विसावा मी आणि दिवसा तुझी गती असते तू करू पाहतोस जे त्याची फक्त मी मूक संमती असते - कुमार जावडेकर

आठवणी २ - मु. पो. बारामती

लेखक मनस्विता यांनी सोमवार, 28/09/2020 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझे बाबा पाटबंधारे खात्यात कामाला असल्याने त्यांची साधारण दर चार वर्षांनी बदली होत असे. पाटबंधारे खात्याची कामे सुरू असतील अशा ठिकाणी म्हणजेच बर्‍यापैकी लहान आणि अगदीच क्वचित शहरात बदली होत असे. आई बाबांचे लग्न झाल्यापासून आणि माझ्या जन्माच्या आधी भाळवणी, सातारा, करमाळा अशा ठिकाणी बदल्या झाल्या होत्या. बदली झाली की चंबूगबाळे आवरायचे अन् निघायचे. सामानाची बांधाबांध व्यवस्थित करता यावी म्हणून आईने त्या काळात मिळत असतील ती खोकी तसेच पॅकिंगसाठी म्हणून आमचे लहानपणीचे कपडे सांभाळून ठेवले होते. एवढी गावे फिरलो तरी कपाचा एक टवकासुध्दा निघाला नाही असं पॅकिंग असायचं.