Skip to main content

शब्द

लेखक राजा सोवनि यांनी शुक्रवार, 09/10/2020 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द..... शब्द हा शब्द छोटा ,शब्दाला अर्थ मोठा शब्दच देती आसू, शब्दच देती हासू शब्दच उडवती खटका, शब्दच करवती सुटका शब्दाने वाढतो मान,शब्दाने जाते शान शब्दाने होतो खुलासा, शब्दाने मिळ तो दिलासा शब्दाने मिळते धैर्य , शब्दाने स्फुरते शौर्य शब्दाने मिळते भिक्षा, शब्दाने मिळते शिक्षा शब्दाने फुलते धाम,शब्दाने फुटतो घाम शब्दाने मिळते माया, शब्दाने प्रफुल्लित काया शब्दाने येते विरक्ती, शब्दाने होते भक्ती शब्दाने मिळते ज्ञान , शब्दाचे ठेवावे भान शब्दात असावी गहराई ,शब्दात आसावी नरमाई शब्द चांगले ठेवा टिपून ,शब्द वापरा जरा जपून शब्दावर द्यावे ध्यान, शब्द वापरा छान डॉ.राजा सोवनी

मानगड (Mangad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 09/10/2020 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
  मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीनंतर शिवाजी महाराजांना राजधानीच्या दुर्गाची जागा बदलण्याची आवश्यकता वाटली. राजगडावरुन राजधानी रायगडावर हलवली गेली. पण यामध्ये राजधानीच्या मुख्य गडाला भक्कम संरक्षण आवश्यक होते. अर्थातच यासाठी निसर्गाने पुरवलेल्या सुरक्षेबरोबरच मानवनिर्मीत दुर्गांच्या चिलखताची आवश्यकता होती. रायगडाभोवती आधीच काही दुर्ग उभारलेले होते.यात चांभारगड, सोनगड हे दुर्ग होतेच. पण आणखी एक प्राचीन दुर्ग रायगडाच्या घेर्‍यात होता. रायगडावर उत्तरेने हल्ला होउ नये म्हणून वायव्य दिशेला मानगड मजबुत केला.

slow down

लेखक अमलताश_ यांनी शुक्रवार, 09/10/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
एका क्षणाचा निळा डोह आकाशातून पाहिलेला. त्याच क्षणाचा अरुंद काठ. काठाच्या हिरवळीवरून डोहाच्या पाण्यात पाय खेळवत बसायचय , पावलांनी आकाशाचे तुषार उडवत. जरा थांब ना.... slow down . मला तो क्षण पकडू दे.

स्टँनली मिलग्राम ,आज्ञाधारकता आणि मानसशास्त्र

लेखक आदित्य कनोजे यांनी गुरुवार, 08/10/2020 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ स्टँनली मिलग्राम यांनी १९६२ साली एक प्रयोग पूर्णत्वास नेला..जो समाजातील माणुसकीच्या वावराच्या वागणुकीचा एक्स-रे काढणार होता..ह्या प्रयोगाने नुसतं स्टँनली मिलग्रामचच आयुष्य बदललं नाही तर समूह मानसिकतेच्या संशोधनाच्या वाढीस चालना दिली..इतिहासाच्या घटनांना आणि त्यातील पात्रांना समजून घेण्यासाठी ह्या प्रयोगाने राजमार्ग दाखवून दिला. आता जरा प्रयोगाकडे येऊयात म्हणजे एकूण पाश्वभूमी समजून घेता येईल.प्रयोगात दोन व्यक्तींना निवडलं गेल.

गंप्या ची वसाहत

लेखक राजा सोवनि यांनी बुधवार, 07/10/2020 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
गंप्या ची वसाहत गंप्या ची शहराजवळ वडिलोपार्जित शेती होती शहर वाढत गेल्यानेजमीनीच्या किमती वाढल्या होत्या.गंप्याने आपल्या मित्रां सोबत शेतीच्या जागी वसाहत करण्या चे ठरवले. जमीनी जवळून एक नदि वाहत होती,काठावर बरीच झाडे,हिरवळ होती,जमीनी चा एक भाग खडकाळ, टेकडी सारखा होता. गंप्या ने त्याच्या ईंजीनियर मित्रा कडून संपूर्ण जमीनी चा नकाशा तयार करवून घेतला व,वेगवेगळ्या आकाराचे प्लॉट पाडले. आपली वसाहत नाविंन्यपूर्ण असावी म्हणून, प्लॉट फक्त मराठी लोकांनाच त्यांच्या आडणावा प्रमाणे द्यायचे ठरले भरपूर झाडी गवताळ भागाचे प्लॉट मोरे,साळुंके,कोकीळ,,पारवे गरूड तसेच लांडगे,कोल्हे,हरणे वाघ तर नदि काठचे,मगर,हंस,बग

चुकलेला नेम - अंतिम भाग

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 07/10/2020 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
"भारत माता की जय ..." "भारत माता की जय " कचेरीच्या चारी बाजूने लोक गोळा झाले होते. क्षणाक्षणाला गर्दी आणि त्याचे रौद्ररूप वाढत चालले होते. जॉर्जचा एक शिपाई आधीच मरून पडला होता. त्याच्या मरणाला कारणीभूत ठरलेला दगड त्याचाच बाजूला रक्ताने लडबडलेला होता. कचेरीच्या मुख्य दरवाज्यावर लाथाडलेल्याचा आवाज येत होता. जॉर्जची नजर त्या दरवाज्यावर खिळून होती. शिपायांनीही आपापल्या बंदूका दरवाज्याकडे रोखल्या. अखेरीस तो दरवाजा तुटतो न तुटतो तोवर लोकांचा एक गट आत घुसला आणि शिपायांनी नेम साधला. शिपाई बंदूक पुन्हा तयार करेपर्यंत लोकांचा दुसरा गट आत घुसला. त्यांनी त्या शिपायांच्या बंदुका हुसकावल्या.

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 3

लेखक नयना माबदी यांनी बुधवार, 07/10/2020 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 3 24 जुन 2012 चहा -नाश्ता करुन आम्ही आंघोळीला गेलो. त्या लोकांनी आम्हाला गरम पाणी दिले होते पण थंडी इतकी जास्त होती कि पाणी लगेच गार होत होते. आम्ही आंघोळीला गेलो त्याच वेळेला जोरदार पाउस सुरु झाला. अगोदरंच थंडी त्यात पाउस. आम्हाला नीट आंघोळ करताच आली नाही. कसेतरी दोन तांबे अंगावर घेतले आणि आलो बाहेर. आंघोळ उरकुन जेउन आम्ही बालताल फ़िरण्यासाठी बाहेर पडलो. बालताल हे अमरनाथ यात्रेसाठी मुख्य तळ आहे.

चुकलेला नेम

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 07/10/2020 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
झोपाळ्याचा कुरकुरणारा आवाज अजूनही अंगणातून येत होता. मध्यानापासून आता सांजवेळ होत आली तरी गोपाळराव अजूनही झोपाळ्यावर तसेच बसले होते. झोपाळ्याच्या नक्षीदार लाकडी खांबावर मुंग्यांची रांग थबकत चालत होती. गोपाळराव मात्र आपल्या धोतराकडे रोखून बघत बसले होते.धोतरावरचा परवाचा दौतीचा निळा डाग अजूनही तसाच होता. त्या डागाशेजारीच आज नवीन डाग पडला होता. गर्द लाल रंगाचा तो उठून दिसत होता. खांबावरची एक मुंगी गोपाळरावांच्या हाताला डसली आणि त्याची तंद्री मोडली. हाताशेजारच्या पिस्तूलकडे त्यांचे लक्ष गेले.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २)

लेखक दुर्गविहारी यांनी बुधवार, 07/10/2020 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
अफझलखानः- अफझलखान हा मुळचा अब्दुल्लाखान.एका भटारीण बाईचा मुलगा.पण आपल्या अंगभुत गुणाने आणि पराक्रमाने तो मोठा झालेला होता. अफझलखान हि त्याला विजापुर दरबाराने दिलेली पदवी होती. स्वभावाने अत्यंत क्रुर असा हा ईसम.कपट आणि दगाबाजी हि त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच होती.