जननीचा दुर्ग
शिवछत्रपतींची तब्बल वीस वर्ष राजधानी असलेल्या राजस दुर्ग राजगडाच्या संरक्षणासाठी आजुबाजुला गडांचा घेरा असणे आवश्यक होता. तसा तो आहे देखील. पश्चिम बाजु तोरण्यासारख्या बलदंड गडाने रोखून धरली तर उत्तर बाजु सिंहगडाने सांभाळली.पुर्वेला पुरंदर सर्व आक्रमणे आपल्या पोलादी छातीवर झेलण्यासाठी समर्थ होता. राहिली दक्षीण बाजु. या बाजुला तुलनेने दुय्यम गड असले तरी तीन गडांची एक साखळी असल्यामुळे एक भक्कम फळी निर्माण झाली आहे. यातील आग्नेयेला रोहिड खोर्यातील रोहिडा उर्फ विचित्रगड खडा आहे, तर गोप्या घाट, वरंध घाट आणि सुपे नाळीवर देखरेख करण्यासाठी कावळ्या किल्ला नजर रोखून बसला आहे.
मिसळपाव