एका सैनिकाची परीक्षा.. मातृभूमीच्या प्रेमासाठी...
तुला कसँ सांगू आई, आज माझी परीक्षा आहे
या रणागणावर उरलेला मी शेवटचा सैनिक आहे,
खूप दिवस झाले होते इथे येऊन
सगळे कनटाळले होते सराव करून करून
या असल्या वातावरणात आम्ही काय काय नाही केल
ऊन थंडीमुळे आमच्या रक्ताच पाणी झाल
सगळ्याना वाटत होत की आता हे संपाव
हसत खेळत आपापल्या घरी जाव
पण बहुतेक हे आमच्या नशिबात नव्हत
दुर्दैवाने कालच रात्री हे रणागण पेटल...
अचानक हल्ला झाला, गोळयाचा पाउस पडला, बॉम्ब पडले, धुरात काहीच दिसेनास झाल,
सुरुवातीला बरेच पडले पण बाकीच्यानी सांभाळल, पण अपुर्या शक्तिवर आम्ही किती सावरायच?
शेवटी तेच झाल जे अपेक्षीत नव्हत, एक एक करत सगळ्याच आयुष्य थांबल...
आता इथे फक्त एकटा मी
मिसळपाव