Skip to main content

सरतील कधी शोष शोषितांचे!

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 03/12/2020 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक दीर्घकथा सुरू करीत आहे. हजारो वर्षांच्या कालपटावर ही घडली आहे, व पुढे घडणार आहे. माणसे बदलतील, स्थलकाल बदलतील.. पण माणूस बदलणार नाही.. नक्की? बघूयात.. भाग - १ उपोद्घात कोणास ठाऊक, कदाचित विधात्यानेच घडविले असेल. डार्विनने शब्दांत मांडले येवढेच. प्राणीजातिलाच कशाला बदनाम करायचे? निसर्ग सुद्धा टिकू न शकणारे मोडून तोडून नवी निर्मिती घडवित असतो. जमिन प्रबळ आहे तोवर घट्टपणे मांड टाकून खदखदत्या अंगाराच्या छाताडावर बसून राहते. पण ती जरा कमी पडली की ज्वालामुखी तिच्या चिथड्या करून अग्नीलोळांचे राज्य तिथे स्थापन करतो. मैलोंमैल वाहणाऱ्या नदीला सागर पूर्णपणे गिळून स्वाहा करतो.

आरसा

लेखक आर्णव यांनी गुरुवार, 03/12/2020 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
झालं गेलं गंगेला मिळालं, विचार करू नये फारसा. बाकी सगळे ऐकतात हो, पण ऐकत नाही तो फक्त आरसा. आरशाची एक मोठी गंमत असते, त्यात पाहिल्यावाचून राहवत नाही. प्रतिबिंब नव्हे प्रखर सत्य ते, अधिक काळ पाहवत नाही. आरशावर का चिडू मी, तो थोडीच आठवणी साठवत होता. पण त्याच्या कडे पाहताना नेहेमी, मला माझा भूतकाळ आठवत होता. हल्ली आरशात मी बघतच नाही, कारण मग नंतर मन रमतच नाही. आता कल्पनेतच जगीन म्हणतो, सत्याला सामोरं जाणं जमतच नाही. आरशापासून पळत होतो, माझ्या सावलीला हसताना पाहून हबकलो. "स्वतःपासून कुठे पाळतोयस?" ऐकून ती व मी जागीच थबकलो.

मामलेदार नावाचं गारूड

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 03/12/2020 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल मामलेदार मिसळ चे जनक गेले आणि प्रकर्षाने तात्याची आठवण झाली. ज्या संकेतस्थळाचं नाव मिसळपाव आहे त्यावर मामलेदार मिसळ विषयी काही तरी लिहावे अशी अतीव इच्छा झाली. या संकेतस्थळाचा जनक तात्या अभ्यंकर आणि मामलेदार मिसळ म्हणजे तात्याचा जीव की प्राण. बाहेरून आलेल्या कुण्या जालमित्राला मामलेदार ला घेऊन जाणं हा तात्याचा छंदच. काल लक्ष्मण शेठ गेले आणि सर्व प्रसारमाध्यमांनी त्याची आवर्जून दखल घेतली, खास करून व्हॉट्स ॲप वर अनेकांनी मामलेदार मिसळ वर भरभरून लिहिलं. मामलेदार मिसळ ही ठाणे शहराची एक ओळखच. आमंत्रण हे त्याचं जरा कौटुंबिक सामाजिक रूप.

गोव्याचा इतिहास भाग -२ ( शिवोत्तर काल )

लेखक दुर्गविहारी यांनी बुधवार, 02/12/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
संभाजी राजांचा उदय मराठी राज्याचा पाया घालणारा स्वातंत्र्यसुर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्‍या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित.

चंद्रायण..!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 02/12/2020 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
ही रात निळीशार, ओतीत चंद्र-धार... स्वप्नातल्या कळ्यांना देते नवा आकार! पाण्यात चंद्र-पक्षी, मांडून सौख्य-नक्षी... किरणावरी शशीच्या होतात मंद स्वार!

व्यंगचित्रांच्या निमित्ताने...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/12/2020 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (संदर्भ: 2012 साली केंद्रीय विद्यालयांच्या राज्यशास्त्र- नागरीकशास्त्र विषयांतील अभ्यासाला पुरक असलेल्या स्वातंत्र्याच्या पहाट काळातील काही भारतीय राजकीय ऐतिहासिक व्यक्‍तींच्या व्यंगचित्रांमुळे भावना दुखावण्याचा प्रसंग उद्‍भवला होता. म्हणून तत्कालीन शासनाकडून अनेक चांगली व्यंगचित्रे त्या अभ्यासक्रमातून हटवण्यात आली होती. त्यावेळी लिहिलेला हा लेख. पण ब्लॉगवर अजूनही प्रकाशित केला नव्हता.) आजचे राजकीय नेते नको इतके संवेदनाशील झालेले आहेत.

पुन्हा पानिपत!

लेखक मनो यांनी मंगळवार, 01/12/2020 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
elephant भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.

मुसाफिर..

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 30/11/2020 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
मुसाफिर... अवचित एका मुसाफिरानं, जीवनात पाऊल टाकलं.. भूतकाळाच्या क्षणांचं पान, त्यानं अलगद पुसून टाकलं.. परीस स्पर्शानं त्याच्या, मनाला मोहरुन टाकलं.. आभार कसे मानू त्या योगेश्वराचे, ज्यानं माझं आयुष्यच उजळून टाकलं....!! जयगंधा.. ३०-११-२०२०.

कुणीतरी...

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 30/11/2020 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
कुणीतरी.. कुणीतरी माझच मला, नव्यानं ओळखायला शिकवलं.. आरशाचं स्थान जनात नसून, मनात असलेलं दाखवलं.. विचारांच्या पसारा-याला, मनातच आवरायला शिकवलं.. बावरलेल्या मनालाही, आशाकिरणांनी सावरलं.. सैरभैर चित्ताला त्यानं, विवेक देऊन स्थिरावलं.. कोमेजलेलं चैतन्य, एका आशीर्वादानं फुलवलं.. बदक नाही, प्रत्येक जीव, राजहंसच आहे हे जाणवलं.. "त्याच्या"कडे बघताना, "त्याची"च हो, हे समजावलं...!! जयगंधा.. ३०-११-२०२०.

JRDTata : राष्ट्रपुरुष

लेखक महासंग्राम यांनी रविवार, 29/11/2020 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
JRD जाऊन आज २७ वर्षे झाली.अनेकांच्या विस्मृतीत गेलेला हा दिवस, ना फारशा श्रद्धांजल्या, ना सोशल मीडियावर ट्रेंड्स. भारताच्या विकासात आमूलाग्र योगदान देणारा हा माणूस (केवळ JRD च नाही अनेक आदरणीय उद्योगपतींची नावं त्यात घ्यावी लागतील.) पण उद्योजकवर्गाला कधीही maker of modern India वैगेरे पदव्या जोडल्या जात नाहीत.