Skip to main content

चार्ज ड

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 08/12/2020 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
"गुड मॉर्निंग" चाळीशी चे वर्क फ्रॉम होम ६ फुटांवरून गुड मॉर्निंग "काय कसे काय" Ok, nothing great, nothing bad either "सर, एक प्रश्न विचारू" माझ्या होकाराची वाट न बघता "तुम्ही तुमचा मोबाईल १०० percent चार्ज व्हायची वाट बघता का"? नाही. तसा कधी जास्त विचार केला नाही. तुमचे काय? "सॉकेट आणि चार्जर ची कायम ची दोस्ती. सर्कस च होते. कायम चार्ज वरून असुरक्षित वाटत राहते." हो का? बर बर. सद्य स्थितीत माझा पण वापर जास्त आहे. पण १०० टक्के असावा असा आग्रह नसतो. मध्ये ब्रेक घेतला की जमून जाते. आणि असे आहे की मोबाईल जुना होतो तशी बॅटरी उतरते, बॅटरी उतरली की शेवटचे १०टक्के चार्ज व्हायला खूप वेळ लागतो.

योद्धा' शॉर्टफिल्म स्पर्धा प्रवेशिका अर्ज

लेखक हस्तर यांनी सोमवार, 07/12/2020 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण आदरणीय खा. शरद पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त योद्धा @ ८० अजूनी चालतोची वाट डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म स्पर्धा - २०२० सर्वोत्कृष्ट फिल्म : करंडक, रोख रु. १,००,०००/- व या सोबत अजून २० रोख बक्षिसे स्पर्धा सर्वांसाठी खुली, प्रवेशिका अर्ज www.supriyassule.comwww.ncp.org.in या वेबसाइटवर उपलब्ध ! आदरणीय पवारसाहेबांचा झंझावात आपल्या कलाकृतीतून उमटू द्या ! या स्पर्धेत सहभागी व्हा !

एक न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह (कोड्याचं माळ , योगेवाडी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )

लेखक व्लॉगर पाटील यांनी सोमवार, 07/12/2020 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
एक न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह जगातील एक मोठं महाकाव्य म्हणून महाभारत प्रसिद्ध  आहे. भारतीय समाजाचे आर्थिक, सामाजिक , राजकीय , कौटुंबिक प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसते . आजही आपल्या देशात , समाजात त्याच्या खाणाखुणा दिसतात . त्यातील माझ्या गावाजवळच्या एका गोष्टीचा संबंध गेल्या काही दिवसापूर्वी आला . योगेवाडी जवळचे कोड्याचे माळ . आजवर अनेक दंतकथा या माळाबद्द्दल व तेथील कोडयाबद्द्दल ऐकलेल्या आहेत . जसेकी कलावंतीण बाईचे कोडे , राक्षसाचा खेळ इत्यादी . पण थोडीफार मनाला पटलेली माहिती गेल्या काही दिवसापूर्वी मिळाली .

हजारो ख्वाहिशें ऐसी - २०० किमी BRM - भाग १

लेखक मालविका यांनी सोमवार, 07/12/2020 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
(खर तर हे कुठल्या जागेच वर्णन नाही तरीही आमच्या प्रवासाचे वर्णन आहे आणि म्हणून त्याला भटकंती सदरात मांडते आहे.) गोष्टीची सुरवात होते एका सायकलस्वारापासून. या माणसाने स्लो पौझनिंग सारखी आपली सायकलिंगची आवड बायकोकडे अर्थात माझ्याकडे पास केली. हळू हळू दोघे आपल्या लेकाला पण सायकलच वेड लावून फिरायला लागले. अनेक जण सल्ले मागायला यायला लागले. त्यातच याला भेटला माझा वर्गमित्र डॉ स्वप्निल दाभोळकर. सुरवातीला करमणुकीकरता म्हणून सायकल घेणारा माणूस थोडेच दिवसात एकदम सायकलच्या प्रेमात पडला. श्रीनिवास बरोबर इकडे जा तिकडे जा अशा फेऱ्या सुरु झाल्या.

सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 07/12/2020 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा भाग ७ - उलट-पलट आदिकाळापासून चालत आलेली व्यवस्था. तिने घर सांभाळायचे आणि पुरुषाने उदरनिर्वाहाचे बघायचे. यात कधीतरी अहंकार आणि आपल्यावरच ती अवलंबून आहे हा गैरसमज शिरला. हळूहळू कुटुंबव्यवस्था नावाखाली तिचे पद्धतशीर शोषण सुरू झाले. तिचा घरच्या कामांसाठी वापर करणे, शिकून काय करायचेय, घराची कामे करायला शिक्षणाचे चोचले कशाला हवे, स्त्री म्हणजे अबला अशी मानसिकता पसरवून तिचा गैरफायदा घेणे.. जिथेजिथे शक्य होईल तसे शोषण जगभरात होऊ लागले.

कोमेजलेला सोनचाफा

लेखक लई भारी यांनी रविवार, 06/12/2020 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
सोनचाफा आवडतो मला; विशेषतः त्याचा सुगंध. सगळ्यांनाच आवडत असणार. बर्‍याच वर्षांपूर्वी दादर स्टेशन बाहेर पहिल्यांदा बघितला आणि घेण्याआधी वास घेऊन बघत होतो तर फुलवाल्या आजी म्हणाल्या, "बाळा, वास घेऊ नये. देवाला वाहतात फुलं!" आज थंडी वाढली आहे तशी, संध्याकाळी बाहेर जाताना अंधार पडल्यावर गाडीच्या काचा बंद करून हीटर मोड वर चालू होता एसी. एका सिग्नलला गाडी थांबली आणि बहुतांशी रस्त्यावर राहणारी माणसं काहीबाही विकायला घेऊन आली. कुठेतरी वाचलेले आठवते की अशा लोकांना पैसे देऊन उत्तेजन देऊ नका. पळवून नेलेली मुलं घेऊन भीक मागतात. किंवा विनाकारण काही वस्तू गळ्यात मारतात वगैरे.

लेख

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 06/12/2020 21:53 या दिवशी प्रकाशित केले.

शायरी..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 06/12/2020 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही! शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही! अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही! मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही! जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे सहजता माऊली ही, असते मनात माझी! भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही! अतृप्त... ०====०====०====०====०====०====०====
काव्यरस

मटण दम बिर्याणी (व्हिडिओ सोबत)

लेखक मी_देव यांनी रविवार, 06/12/2020 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नस:
  • मटण - १/२ किलो
  • बासमती तांदूळ - ४०० ग्रॅम
  • जिरे पावडर - १ टीस्पून
  • धणे पावडर - २ टीस्पून
  • लाल तिखट - २ टीस्पून
  • दालचिनीच्या काड्या - ४
  • काळी मिरी - १ टीस्पून
  • तमालपत्र - २
  • मसाला वेलची - १
  • चक्रफुल - १
  • दगडफूल - १ चिमूट
  • लवंग - ६ ते ८
  • वेलची - १० ते १२
  • कांदे - ४
  • तेल - ४ टेबलस्पून
  • आलं लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
  • दह

म सा वी

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 06/12/2020 04:10 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे? म्हणजे विलायती देशी पहिल्या धारेची (हातभट्टी) ह्या मधली कुठली निवडायची? कुणाला आईस जास्त लागतो कुणाला कमी कुणाचा चिअर्स तर कुणाचा चांगभलं कुणाचा चखना काजू तर कुणाचा चकली फारच घोळ आहे बुवा. कुणाचा एक पेग पुरतो तर कुणाचे दोन शिवाय मजा नाही .... .... .... कुणी तरी सुरापानासाठी बोलवा रे प्रेर्ना अर्थातच लघुत्तम साधारण विभाजकाची