Skip to main content

माझ्या टेलिस्कोपमधून गुरू- शनी महायुती बघण्याचा थरार आणि अनुभव

लेखक मार्गी यांनी बुधवार, 23/12/2020 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! नुकत्याच झालेल्या गुरू- शनी आकाशीय महायुतीचे माझ्या टेलिस्कोपमधून घेतलेले फोटो व व्हिडिओज शेअर करत आहे. प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव हा खूप रोमांचक असतो आणि दोन दिवस लोकांच्या प्रतिक्रियांमधून तो रोमांच जाणवतही होता. फोटोमध्ये त्याची केवळ एक मर्यादित झलक मिळते. ते फोटोज व व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे. हे फोटोज व व्हिडिओज मी परभणीमधून माझ्या स्टारट्रॅकर 114/500 रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून काढलेले आहेत. आणि टेलिस्कोपशिवायसुद्धा हे दोन्ही ग्रह एकमेकांना चिकटून असलेले बघणं आनंददायी होतं.

अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण

लेखक कुमार जावडेकर यांनी मंगळवार, 22/12/2020 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या. आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.) असं अनेकदा होतं.

कशाला हवी ही दुकानं?

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 22/12/2020 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षरशः १०-१५ वर्षे या वेगवेगळ्या दुकानांतून फिरून मला असे वाटते ,,ते असीम्य ,अदृश्य शक्ती असतांना ह्या दुकानांची गरज ती काय. अगदी अडाणी ,अशिक्षित लोकांना भोंदुच्या दुकानापाशी पाहिले की आपण अस्वथ होतो.मग नकळत वडीलधारी यांच्या मानाखातर सहस्त्रनामी जप करणाऱ्यांच्या दुकानात आपणही गेलोच होतो की...किंवा जातोच की.बुरखा ओढलेला असतो मनातल्या मनात तो दिसत नाही.सरळ उठून निसर्गात जाव वाटत.बर सामान्यांना नाही उमजत तर शहरातील प्रतिष्ठीत,शिक्षित अन्नदानाचे गोंडस नाव घेऊन,देणग्या उधळत या दुकानांना चालूच ठेवतात.बर अन्नदान कोणाला तर आपल्याच जनाला ...मग वृधाश्रम ,अनाथाश्रम का नाही दिसत ? सामान्यांन नंतर सो ..सो

फ्लॅट मध्ये चुलीचा स्वाद

लेखक साहना यांनी मंगळवार, 22/12/2020 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीवर आपण जेंव्हा काही ऍन बनवतो तेंव्हा लाकडाच्या धुराचा वास त्या अन्नात आपसूक घुसतो. आधुनिक मुलांना कदाचित हा वास आवडणार नाही पण गावांतून शहरांत गेलेल्या अनेक लोकांना हा वास मिस होतो. मक्याचे कणीस, पापड किंवा अगदी "नुस्तें" जरी गॅस वर बनवले तरी त्या लाकडाच्या धुराच्या वासाच्या शिवाय त्याची चव तेव्हडी चांगली वाटत नाही. ह्या शिवाय बिर्याणी, मटण, जंगली गेम मांस ह्याला जर तो थोडा धुराचा वास नाही तर त्याला अजिबात मजा येत नाही. त्यामुळे खालील ट्रिक वापरून आपण अगदी फ्लॅट मध्ये सुद्धा लाकडी धुराच्या वासाचे अन्न बनवू शकता.

दे दे लिंक दे !!

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 21/12/2020 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी काही माहिती सांगायला लागलं कि "लिंक दे" कुणी काही मत मांडले रे मांडले कि "लिंक दे" एखादा विचार मांडायला लागलं, कि (त्याच्या पुष्ट्यर्थ) "लिंक दे" ह्यात ज्ञानोपासनेचा भाग असेलही बापडा !! पण मला पुष्कळ वेळा ऐकू येते ते असे "तुला काही नवीन मुद्दा सापडलाय का , त्याला पुष्ट्यर्थ काही लिंक नसेल तर तू , तुझं बोलणं आणि तुझा मुद्दा व्यर्थ ..." किंवा मग "तु कुणाला काही उद्धृत करू पाहतोयस का ? मग तुझी वायफळ बडबड बंद कर आणि ज्याने कुणी ते मुळात काय म्हटलं आहे ते साल्या तू कुठून वाचलं ते आधी सांग. मी माझं स्वतंत्र बघून माझं मत मी बनवीन.

तळ कोंकण २०१८ : भाग १

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 21/12/2020 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिलचा शेवटचा आठवडा. अचानक ठरलेल्या तळ कोंकण सहलीसाठी आम्ही दोघे व सोबत स्नेही मंडळीपैकी एक जोडपे असे चौघेजण रेल्वेने पनवेलहून रात्री दोन वाजता सावंतवाडीकरिता निघालो. कोंकण रेल्वेचा प्रवास पूर्वी केला असला तरी तो सर्व रात्रीचाच होता. यावेळी मात्र रत्नागिरीपासून उजाडले होते. वाटेत नदी-नाले ओलांडण्याकरिता बांधलेले पूल, हिरवेगार डोंगर, बोगदे बघत व कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्टेशन मागे टाकत सकाळी साडे अकराच्या सुमारास सावंतवाडी रोड स्टेशनला पोहचलो.