नवीन वर्ष आलं की आपण उत्साहाने संकल्प करतो की आता नवीन काही तरी शिकूया. म्हणजे नवीन काहीतरी शिकायचा उत्साह एरवीसुद्धा अधून मधून येतच असतो, पण नवीन वर्ष म्हटलं की तो उत्साह जरा जास्तच असतो. पण होतं काय की आपण २-४ दिवस शिकायला बसतो, मग काहीतरी महत्वाचे काम येते किंवा कंटाळा येतो, मग आजच्या ऐवजी उद्या करू असे वाटते आणि ते काम रंगाळत जाते आणि मग शेवटी बंदच पडते. असे होऊ नये, म्हणून मी काय करतो ते मांडायचा हा प्रयत्न.
SMART Goals स्मार्ट गोल्स
सर्वात आधी मी काय शिकायचे ते ठरवतो आणि त्यासाठी SMART Goals ही पद्धत वापरतो.