Skip to main content

आज काय घडले... मार्गशीर्ष व. १२ श्रीजनार्दनस्वामींची समाधि !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 10/01/2021 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
जनार्दन स्वामी शके १४९७ च्या मार्गशीर्ष व. १२ रोजी प्रसिद्ध सत्पुरुष आणि एकनाथमहाराज यांचे गुरु श्रीजनार्दनस्वामी यांनी समाधि घेतली. जनार्दनस्वामी मूळचे चाळीसगांवचे देशपांडे. यांचा जन्म फाल्गून व. ६ शके १४२६ मध्ये झाला. पूर्वायुष्यांत हे यवनांच्या सेवेत होते.

शिकवणारी राईड

लेखक अन्या बुद्धे यांनी रविवार, 10/01/2021 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
#आजचीराईड 06.01.2021 God is everywhere. Devil lives in details. देव आणि सैतान यांच्या युद्धात देव जिंकला आणि त्याने सर्व जग व्यापलं. सैतानाला कानाकोपऱ्यात जाऊन तोंड लपवावं लागलं. Then onwards the devil started living in small details. असं असावं ते बहुदा अशी मी समजूत करून घेतली. तर हे सैतान छोट्या छोट्या डिटेल्समध्ये दडून बसतात आणि आपला परफॉर्मन्स खराब करत असतात. ते डीटेल्स शोधून त्या सैतानाला हरवायला हवं. शिकवण देतात, प्रात्यक्षिक देतात, उदाहरणातून पटवून देतात, सराव करून घेतात, शिक्षा करतात, फटके देतात पण.. पण जाणीव मात्र आतून होते. आपोआप होते. बहुतेकदा ही जाणीव आपल्या नकळत काम करते.

गुलमोहर सोसायटी, हत्ती आणि 'शेर'

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 10/01/2021 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले, "नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची." "विचार करून सांगतो, " मी म्हणालो. वास्तविक, गप्प बसून राहणे, गप्पा मारत बसणे किंवा अगदी गप्पी मासे पाळणे या 'गप्प' च्या बाराखडीत येणाऱ्या कुठल्याही क्रियेला माझा कधीच विरोध नसतो. मामांनाही हे माहिती आहे. आम्ही आपापल्या बाल्कन्यांमधून अशी चर्चा गेली वीस-बावीस वर्षं करत आलो आहोत.

प्रवास (भाग 2)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 09/01/2021 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 1 https://www.misalpav.com/node/48038 प्रवास भाग 2 अनघा : हॅलो आनंद? ..... : त्याचं शूट चालू आहे. तुम्ही कोण? मुलीचा आवाज ऐकून अनघा गोंधळली. अनघा : तुम्ही कोण बोलताय? ..... : मी कोण याच्याशी तुमचा काही संबंध नाही. मी आनंदचा मोबाईल attend केला आहे याचा अर्थ मी कोणीतरी नक्की आहे त्याची. तुम्ही फोन केला आहात तुमचं नाव सांगा अगोदर. अनघाला त्या मुलीच्या बोलण्याचा राग आला. पण त्याक्षणी तरी ती काही करू शकणार नव्हती. त्यामुळे तिने फोन कट केला. पण अनघाचं मन तिला स्वस्थ बसू देईना.

लाक्कुंदी आणि दांडेली - भाग ३ (अंतिम)

लेखक एक_वात्रट यांनी शनिवार, 09/01/2021 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस तिसरा:
कर्नाटकातील दांडेली मुख्यत्वे प्रसिद्ध आहे तिथल्या रिव्हर राफ्टिंगसाठी. आम्ही मात्र ते करणार नव्हतो. दांडेलीत जाऊन तिथला निसर्ग अनुभवणे आणि जमले तर तिथल्या अभयारण्याला भेट देणे एवढाच आमचा कार्यक्रम होता.

बालकथा - वेदिका शहाणी झाली.

लेखक nanaba यांनी शुक्रवार, 08/01/2021 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
श्रुतिका आणि वेदिका दोघी छान मैत्रिणी होत्या. बागेत रोज भेटायच्या, मजा करायच्या. श्रुतिकाला वेदिका फार आवडायची. तिचे नीटनेटके कपडे, गळ्यातल्या छान छान माळा,गोड गाणी म्हणणं, गोड बोलणं. वेदिका होतीही मोठी हुशार आणि दिसायची पण कित्ती छान! श्रुतिकाला फार वाटायचं की आपल्याला पण वेदिका सारखं सगळं छान जमलं असतं तर! सुट्टीत श्रुतिका वेदिकाकडे रहायला गेली. दोघी पहिल्यांदाच एकत्र रहात असल्याने दोघीही जाम खूष होत्या. वेदिका च्या आईन श्रुतिका येणार म्हणून तिची आवडती इडली केली होती. दोघी खायला बसल्या. श्रुतिकाने सगळं छान संपवलं , पण वेदिका मात्र अखंड बडबड करत बसलेली.

तेरेखोल किल्ला/Terekhol fort/ Tiracol fort

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 08/01/2021 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी हि मानवाची मुलभुत गरज, त्यामुळे प्राचीन काळी मानवी वस्ती वाढली ती नद्यांच्या काठी. पुढे निरनिराळ्या प्रदेशाची सीमा आखणी करायची वेळ आल्यानंतर सहाजिकच नदी हिच हद्द ठरविण्यासाठी वापरली गेली. सह्याद्रीत आंबोलीजवळ उगम पावून आणि पर्यटकांना धबधब्यात मनसोक्त भिजवून तेरेखोल नदी गोवा राज्याची उत्तर सीमा आखत समुद्रात विलीन होते. नदीच्या उत्तर काठावर आपण महाराष्ट्रात असतो, तर फक्त तरीने नदी ओलांडली तरी राज्य बदलून गोव्यात पोहचतो. पण नियमाला अपवाद असतो,तस चक्क नदीच्या उत्तर किनार्‍यावरचा अगदी समुद्राला खेटून असणारा भाग हा गोवा राज्याच्या हद्दीत येतो. नेमका ईथेच खडा आहे, "तेरेखोल किल्ला".

ज्ञात अज्ञात पंढरपूर ७ व्यास तीर्थ आणि व्यास नारायण मंदिर, पंढरपूर

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 08/01/2021 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञात अज्ञात पंढरपूर ७व्यास मंदिर व्यास तीर्थ आणि व्यास नारायण मंदिर, पंढरपूर आधुनिक जगतातील सर्वांत प्राचीन ज्ञानसंपदेचे साधन म्हणजे हिंदुंचे वेद होय. ते अपौरूषेय आहेत. तसेच ते मौखिक पद्धतीने शतकानुशतके जतन केले आहेत अगदी उकार, वेलांटी, अनुस्वार, काना, मात्राचेच नव्हे तर स्वराघाताताही कोणताहि बदले होवू न देता.

तप्तमुद्रा

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 08/01/2021 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा निर्मम कठोर आसमंतात दाटले तेव्हा अनाहत आत खोलवर निनादले अनाघ्रात अदृृष्टाची जाणवली रूणझुण स्पर्श,गंध,रस, रंग एक झाले कल्लोळून आकलनाच्या कवेत आले-आलेसे वाटले अज्ञेयाच्या धुक्यामध्ये नकळत वितळले जाणिवेची नेणीवेशी जेव्हा थेट भेट झाली जुन्या जखमेच्या जागी तप्तमुद्रा उमटली
काव्यरस

आज काय घडले.... मार्गशीर्ष व|| १० जयद्रथास प्रायश्चित्त मिळालें!

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 08/01/2021 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले.... मार्गशीर्ष व|| १० जयद्रथास प्रायश्चित्त मिळालें!jayadratha vadh शकपूर्व २००९ च्या मार्गशीर्ष व.