Skip to main content

AI आणि मी

लेखक चिनार यांनी गुरुवार, 14/01/2021 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुक आपल्यावर लक्ष ठेवतंय, व्हॉट्स ऍप आता आपला डेटा स्टोअर करणार, मग आपल्या इंटरेस्टनुसार आपल्यावर जाहिरातींचा भडिमार होणार... हे सगळं ठीक आहे. पण, एखाद्या वेबसाईटवरून एखादा शर्ट घेतल्यावर परत परत तोच शर्ट समोर दिसावा ही आर्टीफिशियल इंटिलीजन्सची कोणती पातळी म्हणावी? कोण बसलंय तिथं प्रोजेक्टरच्या मागे? अरे वांग्या, बायकोसाठी एखादी साडी किंवा कुर्ता घेतल्यावर महिन्याभराने परत तीच साडी किंवा कुर्ता घेतला तर त्याचे परिणाम कळतात का तूला? त्या झुक्याला म्हणा, स्वतः च्या बायकोसोबत असं करून दाखव एकदा! मला सांगतोय..! पुरुष मूर्ख असतात पण इतके नाहीत रे. काहीतरी व्हेरायटी दाखव लेका!

आज काय घडले... पौष शु.१ राजारामशास्त्री भागवत यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 14/01/2021 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजाराम भागवत शास्त्री शके १८२९ च्या पौष शु. १ रोजी महाराष्ट्रांतील सुधारक व प्रसिद्ध नवविचारप्रवर्तक राजारामशास्त्री भागवत यांचे निधन झाले. तीन वर्षे मेडिकल कॉलेजात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जुन्या शास्त्यांजवळ पांच-सहा वर्षे संस्कृतचे अध्ययन केले. त्यानंतर ते सेंट झेवियर कॉलेजमध्ये संस्कृत शिकवू लागले.

आज काय घडले .... मार्गशीर्ष व. ३० कौरवेश्वर दुर्योधन याचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 14/01/2021 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्योधन वध शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ३० या दिवशी कौरवसम्राट दुर्योधन याचें निधन होऊन अठरा दिवस चालू असलेले भारतीय युद्ध समाप्त झाले. दुर्योधन अनाथ व असहाय होऊन घोड्यावरून फिरत होता. रणभूमीपासून एक कोस अंतरावर एक सरोवर होते. त्या सरोवरांत मायेने पाण्याचे स्तंभन करून दुर्योधन विश्रांति घेत स्वस्थ राहिला.

तिळाचे लाडू

लेखक सरिता बांदेकर यांनी बुधवार, 13/01/2021 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
तिळाचे लाडू सौ सरिता सुभाष बांदेकर ही तिळाच्या लाडवाची पाककृती नाहीय, पण तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का??? याचा फोटो काढावा असे त्यावेळी वाटलं नाही कारण त्यावेळी सेल्फीची हवा नव्हती.म्हणजे मोबाईलच्या जन्मा आधीची ही खरीखुरी घडलेली गोष्ट आहे.

जलाशय

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 12/01/2021 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
आलो परतुनी आणखी जाहलो जुना जरी अजून माझा जीव तरंगे पाचूच्या पाण्यावरी गारवा असा त्याचा की भिडतो आत्म्यास थेट वितळते जग अवघे मीच एक तरंगते बेट तिरप्या कोनातूनी येई सुवर्ण प्रकाश शलाका स्पर्षता पाण्यास गारठे कवडसे जणू मूक हाका बाजूस एका आत्ममग्न संतत स्फटीकधार सांडते घुमते गव्हारात उन्हाच्या संगीत हाकांस लाभते का अजून मी अडकलो तिथेच मनाने ना कळे बहुदा आठवती शांत ते तुझे जलाशयासम डोळे -अनुप

मार्गशीर्ष व. १४ जोगा परमानंदांची समाधि ! शके १२६० च्या मार्गशीर्ष व. १४ रोजी प्रसिद्ध भगवद्भक्त जोगा परमानंद यांनी बार्शी येथे समाधि घेतली.

लेखक Ashutosh badave यांनी मंगळवार, 12/01/2021 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... joga paramanand तेराव्या शतकात परमार्थाचे पीक सर्वत्र सोळा आणे आलेले होते. जोगा परमानंद तेली जातीत निर्माण झाले. परमानंद हे यांच्या गुरूचे नांव आणि जोगा हे यांचे स्वतःचे नांव. हे बार्शीस रहात असत. तेथे असलेल्या भगवानाच्या मंदिराकडे ते रोज गीतेतिल एक श्लोक म्हणत, नमस्कार घालीत जात असत.

व्यंगचित्र

लेखक वागबोंद्रे यांनी मंगळवार, 12/01/2021 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
"तिमिरातुनी तेजाकडे" 1 आपल्या देशात अश्या काही संकल्पना आहेत, ज्या चुकिच्या आहेत, हे माहित असुनही आपन त्या बदलू शकत नाही.

सरपण

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 11/01/2021 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
सरपण लहानपणी गावी वीज नव्हती.गॅस नव्हता.स्टोव्ह नव्हते. स्वयंपाक ,पाणी तापवणे चुलीवरअसे.त्या दिवसांची आठवण आली अन सरपण आठवले. लिहायला इंधन मिळाले.सरपण नसले तर घरची चूल पेटणे शक्य नसे.मजूरीसाठी जाणार्या बाया बापड्या संध्याकाळी कामावरून परतताना वाटेत मिळेल त्या लाकूडफाट्याचा भारा डोक्यावर आणत.अजूनही आणतात.सुस्थितीतील घरच्या स्त्रियांना सरपण जमा करण्याचे कष्ट नसत. पुरूषांना त्याची काळजी.सरपणा साठी ,इमारतीसाठी,शेतीचीअवजारे,औत,कोळपे ,बैलगाड्या तयार करणे इ.साठी,लाकूड हवेच.मग शेतातल्या जुन्या,वहितीला अडचण असणारे झाडांची कटाई होई.झाडे जास्त व मोठी असली तर तोडायचा गुत्ता/ ठेका दिला जाई.

काही शब्द

लेखक Bhakti यांनी सोमवार, 11/01/2021 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही शब्द असतात मुके उभे उन्हात जणु पोरके मुले भूतकाळात ना भविष्यात डोकावत सहज वर्तमानाच्या क्षणांत घुटमळत वाटते समोरच्या मनी कराव घर रेंगाळावे उशीशी कोणाच्या रात्रभर पण होतात ह्रदयी कप्प्यात बंद बंद हसतात डायरीच्या पानांतून मंद मंद -भक्ती ११/०१/२०१७

आज काय घडले... मार्गशीर्ष व. १३ धनुवीर कर्ण याचा वध !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 11/01/2021 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
कर्ण वध आज काय घडले... मार्गशीर्ष व. १३ धनुवीर कर्ण याचा वध ! शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. १३ रोजी पृथ्वीवरील अलौकिक धनुर्वीर कर्ण याचा वध झाला. कर्ण आणि अर्जुन यांचे युद्ध अत्यंत निकराचे झाले.