Skip to main content

(ताळमेळ)

गुरुवार, 28/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ताळमेळ

काव्य हे जुळे कधी कधी उगाच शब्दभेळ
हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ

सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥

बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री

गुरुवार, 28/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

भारतीय क्रिकेट चमुस हार्दिक शुभेच्छा.

=====================
ऑफिसच्या रीक्रीएशन रूममधील एका संभाव्य चित्र "रेशमाच्या रेघानी"च्या धमाल चालीवर.
(आचार्य अत्रेंच्या "झेंडूची फुले" परंपरेतील व माझ्या "एप्रिल फुले" ह्या धमाल कार्यक्रमातील एक स्वरचित ताजे विडंबन गीत)
======================
अहो येता जाता सट्टा का हो लावता,
अन क्रिकेटच्या खेळाला बट्टा का हो लावता.

बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री
चंगळच चंगळ करूनी घ्या हो,
हात नका लावू कुणी कामाला

नवा कोरा टीव्ही लाख मोलाचा,

"स्वयेश्री प्रोफेसर पाहती" स्वरचित विडंबन गीत

गुरुवार, 28/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
परीक्षा सुरू होत आहेत,त्यासाठी संबंधितांना शुभेच्छा.कविवर्य गदिमांची क्षमा मागून एक स्वरचित विडंबन गीत सादर करित आहे.
(टीप:ह्यातील कॉलेज माझे व युनिव्हरसिटी माझी नसून तुमची ही नाही.)

स्वयेश्री प्रोफेसर पाहती,परीक्षेत मुले कॉपी करिती.

सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचे
समीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.

सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचे
अनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.

कांही भित्रे त्या वर्गातील,कैसे वाटती आज सुशील
प्रश्न तयांचे कैसे सुटतील,ग्लास पाण्याचे ते ढोसती.

राजा भोज याने कालिदासाला दिलेली समस्या

लेखक चतुरंग
गुरुवार, 28/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

भोज राजाने फक्त दोन ओळी दिल्या आणि कालिदासाला श्लोक पूर्ण करण्यास सांगितले - काय आहेत त्या दोन ओळी?

--- -- --- ---
--- -- --- ---
सिंदूर बिंदू विधवा ललाटे
ते पाहुनी विस्मय फार वाटे

(उत्तर माहीत असेल तर व्य. नी. तून कळवावे - शुक्रवारी मी अचूक ओळखणार्‍यांच्या नावासह इथे देईन.)

मी कोण होणार? : भाग ३

बुधवार, 27/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.


डॉक्टर की कलेक्टर ?

महत्वाची सूचना

लेखक सरपंच
बुधवार, 27/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही  दिवसांपासून मिसळपाव वर काही सदस्यांना संकेतस्थळ उघडण्यात अडचण
येत असल्याचे जाणवले.या बाबत अधीक शोध घेतला असता असे निदर्शनास आले की ही अडचण इन्टरनेट एक्प्लोरर ६ व ७ मधेच केवळ आहे. 
या प्रकरणी प्रथम दर्शनी युट्युब चे मिसळपाव वर जोडल्या गेलेले व्हिडीयोज मुळे ही अडचण येते आहे असं दिसतंय.
 
त्यामुळे संकेतस्थळावर असलेले सगळे युट्युब व्हिडीओज पुन्हा संपादित करावे लागतील.

समस्यापूर्ती : चारोळी ..........

लेखक छोटा डॉन
बुधवार, 27/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या कॉलेजच्या जीवनात आमच्या 'सांस्कॄतीक संघाची' एक 'पंच लाईन' होती. एकदम झक्कस .......
मला ती माझ्या ब्लोग वर टाकायची आहे पण मला त्या ४ ओळींपैकी फक्त ३ ओळीच आठवत आहेत, तर मला त्याची चौथी ओळ पूर्ण करण्यास मदत करा .........
मी हा 'मिपा' च्या 'चारोळीत्तम लोकांना ' दिलेला 'खो' समजावयास हरकत नाही ....

"जिज्ञासा आमची जननी आहे ,
-------------------------
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "