लेखकसृष्टीलावण्यायांनी शुक्रवार, 04/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे एक सुंदर मराठी शुभेच्छापत्र आहे. काय आश्चर्य, त्यातल्या ओळी ह्या चित्राला बिनचूक बसतात. अगदी एका ओळंब्यात. ह्या योगायोगाची गंमत वाटली कारण दोन कुठल्या वेवेगळ्या जगातल्या गोष्टी. एक नेटवरची तर एक छापील कागदावरची. म्हणून हे चित्र आणि त्या ओळी इथे देत आहे.
आम्ही दूध पितो.
मांजरही दूध पिते.
पण मांजराच्या ते अंगी लागते.
लेखकअनिरुद्ध अभ्यंकरयांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मनात कोणी वस्तीस येत नाही
मीही चुकून तेथे कोणास नेत नाही
ऐन्यात शोधतो मी सारे जुने पुरावे
निसटून काळ गेला हातात येत नाही
बाजार वेदनेचा आहे भरात आला
जखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाही
मी श्वास घेत आहे की भास होत आहे ?
काळीज धडकल्याचा आवाज येत नाही
आश्वासने जरी ते देऊन काल गेले
परतून भेटण्याला कोणीच येत नाही
माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही
आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही
लेखकविसोबा खेचरयांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
II स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मंडळी,आज मी थोडं तात्विक चित्रविवेचन करणार आहे!
खालील चित्रांत मला काही राग दिसले. या चित्रांना आपण 'ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे' असं म्हणू. आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातली 'राग', ही पूर्णत: भावनांशी निगडीत असलेली संकल्पना आहे. एकच राग प्रत्येकाला तसाच दिसेल असं नव्हे. रागदारी संगीत किंवा एकंदरीतच कुठलीही कला, ही अनुभवायची गोष्ट आहे.
लेखकगमत्यायांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव)
लेखाच्या नावावरुन अपणास असे वाटले असेल की मी कोल्हापुरी मिसळ बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला की काय !
पण असे झाले असते तरी मी आनंद मानला असता. पण....... माझा हा अनुभव म्हणजे कुर्हाडीवर पाय मारल्यासारखा आहे.
आता जास्त न ताणता सरळ मुद्याचे बोलतो नाही तर पहिल्या लेखात तुम्हा सर्वांना पकवल्याचे पातक डोक्यावर यायचे.
तर झाले असे कि मागच्या रविवारी कोल्हापुरला जाण्याचा योग आला.
लेखकशरुबाबायांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
येक सुविचार
निराशावादी म्हणतो , ग्लास अर्धा रिकामा आहे...
...
आशावादी म्हणतो ,
ग्लास अर्धा भरलेला आहे...
वास्तववादी माणूस त्या ग्लासात आपल्याला हवा तो द्रव योग्य त्या प्रमाणात मिसळतो आणि म्हणतो ,
चीअर्स!!!!
लेखकप्रगतीयांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
उडत्या पाख्ररांना
परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरटयाचे काय आहे
बांधता येईल केव्हाही
नजरेत सदा क्षिति़ज्यांच्याही
पलिकडे झेप घेण्याची
जिद्द असावी.
लेखकधनश्रीदिनेशयांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मराटी मुलानी डोन बोस्को म्ध्ये प्रवेश् का नाहि मिळ्त ? फक्त ख्रिच्नन्न मुलाना प्रवेश , हा मराटी आहे म्हणुन आमच्या मुलानि चान्ग्ल्या शाळेत शिकु नाही कि काय ? मुम्बइकर अस्ल्याचा हा एक तोटा कि फायदा
लेखकछोटा डॉनयांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या अतिशय छोट्या पुणे ट्रीप मध्ये "वळू" नावाचा अतिशय मोठा [ महान या अर्थी] सिनेमा बघण्याचा योग आला. त्याआधी "नेटवर" व वॄत्तपत्रातून याविषयी बरेच वाचले होते त्यामुळे सिनेमाबद्दल बर्याच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. यामुळेच कदाचित सिनेमाला जाताना तो एकदम तद्दन बकवास निघण्याची शक्यता वाढली होती कारण पुर्वानुभव ... पण नाही "वळू" खरच झकास आहे.
लेखकचतुरंगयांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
थोर कृषिवल 'अमित'जी हेच आमचे खरे स्फूर्तिस्थान. बाकी दादांच्या मूळ काव्याबद्दल सांगणे न लगे!
आज मावळात दंग 'अमित' हा तरी
जपून जा जरा कशी 'जयू' तुझ्या घरी!
तो लबाड वित्तचोर वाट लावतो
दाम देउनी खुशाल टोपी घालतो
गुंगवूनि संगती दलाल 'फासतो'
'चारतो' अजूनही तिथे खरोखरी!
त्याच 'अमर'सुंदरास हात जोडले
शेती लाटल्याविना कुणा न सोडले
कोणि राव कोणि रंक करुन टाकले!
एकटीच 'बाराबंकी' नाही ती तरी !
भू तिथे करुन दान वाद संपला;
थोर 'अमित' तो बनून काळ लोटला;
कृषक बनुनि आज फिरुनि तोच पातला
हाय! वाजली फिरून गाडी ती खरी!
चतुरंग