आठवण सुद्धा...
घेता घेता नशा चढेल
देता देता प्रेम वाढेल
बोलता बोलता शब्दच संपेल
बघता बघता नजर अडकेल
भेटता भेटता मनच गुंतेल
निघता निघता पाऊल थबकेल
चालता चालता वाटच संपेल
पाहता पाहता नजर पाणावेल
घेता घेता श्वासही थांबेल
वळून बघता वाटेल, इथं सारंच संपेल
या निरगाठी तोडता ह्रदय नक्की तुटेल
--- मी अश्विनी
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
