Skip to main content

गुरुवार गुंज आणि गुरू

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 28/01/2021 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवार गुंज आणि गुरु. वीज नव्हती, टिव्ही नव्हते ,त्या काळात गावात रात्री लवकरच शांतता होई.संध्याकाळी कामावरून घरी परतलेले लोक थकलेले असत.दिवे लागण झाली की थोड्याच वेळात जेवणखाणे आटोपून बहुतेक जण झोपी जात.रात्री आठ साडेआठचे सुमारास सगळीकडे चिडीचूप.कुठे पोथी,भजन वगैरे सुरू असे ते आणि दर गुरुवारी रात्री देशमुख गल्लीत 'दत्त पंचपदी 'होई,तेवढेच अपवाद.तिथे मात्र उशीरा पर्यंत जाग असे. ज्या घरी पंचपदी असे ते घर गॅसबत्तीने उजळून निघे. जेवणे आटोपून लोक रात्री आठचे दरम्यान पंचपदी साठी जमा होत. बैठकीत चौरंगावर दत्ताची तसबीर मांडून पुजा केली जाई.

आपल्या पैकी कुणाला, थेट शेतकरी वर्गा कडून, शेतमाल खरेदी करायची इच्छा आहे?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 28/01/2021 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
https://misalpav.com/node/47970 ह्या विषयावरील चर्चा वाचली. एक जाणवले की, सगळ्यांनाच, शेतकरी वर्गाला, मनापासून मदत करायची इच्छा आहे. माझ्या ओळखीत, काही शेतकरी आहेत, जे स्वतः काही गोष्टी पिकवतात किंवा Process करून विकतात. काही लोकांना मी वैयक्तिक रित्या ओळखतो, काहींना, What's App मुळे ओळखतो. मी जसे जमेल तसे, फोन नंबर आणि ते काय विकतात? सांगत जाईन. 1. दामले आडनावाचे एक गृहस्थ, नैसर्गिक रित्या आंबे लागवड करतात. मी स्वतः त्यांची शेती बघून आलो आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके, वापरत नाहीत. फोन नंबर देतो .... 9405767101 2.

पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 28/01/2021 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
बनशंकरी मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले ते १०० वर्षे चालले. अन् त्यामुळे समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नासाठी वणवण सूरू झाली.

पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा जिजामाता जयंती

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 28/01/2021 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा जिजामाता जयंती मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले अन् समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नायाठी वणवण सूरू झाली. केवळ मानवच नाही तर सकल प्राणीमात्र अन्नावाचून तडफडू लागला अन् नष्टत्वाच्या फेऱ्यात सापडला. अशा भयाण काळी साक्षात आदिशक्ती जगद्जननी भगवतीचे मातृहृदय तळमळून जागे झाले. आपल्या लेकरांचे दु:ख तिला पाहवेना, सोसवेना. त्याच्या दु:खावर फुंकर घालून ते शांत करण्यासाठी आवश्यकता होती अन्नाची त्यासाठी भगवतीनेच अवतार धारण केला.

आज काय घडले... पौष शु. १३ केशवस्वामींचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 28/01/2021 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
केशव स्वामी शके १६०४ च्या पौष शु. १३ रोजी समर्थपंचायतनांतील प्रसिद्ध सत्पुरुष भागानगरकर केशवस्वामी हे समाधिस्थ झाले! महाराष्ट्रांतील संतांत तीन पंचायतने प्रसिद्ध आहेत.

कृष्णमयी.

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/01/2021 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णमयी ..... चकोर शाह ते टेकडीवरचे झाड पाहिलस? एकटच उभे आहे. कधी पासून माहीत नाही. मला आठवत तेंव्हापासून इथेच असतं .असंच आकाशाच्या कॅनवासवर सुकलेल्या फांद्यानी नक्षी उमटवत. याच्या फांद्याना हिरव्या गार पानांनी नटलेलं कधी पाहिलं नाही, की त्यावरची फळं तोडायला कुण्यामुलांन दगड मारलेला पाहिला नाही. नाही म्हणायला हिवाळ्यात कधितरी एखादा चुकार पतंग याच्या फांद्यात अडकतो. काही दिवस फडफडत रहातो.प्रेमात पडल्यासारखा फांदीला बिलगतो. इतका की झाडाला फुल आलंय असे वाटावे. एक दोन दिवसच. वारं आलं की तो पतंग सुटायची धडपड करतो. त्याच धपडडीत फडफडून फाटून जातो.

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 27/01/2021 18:39 या दिवशी प्रकाशित केले.

‘मी पाहिलेले-अनुभवलेले आखीव माधवनगर’.

1

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

१.गणेशोत्सव... माधवनगरातील कॉटन मिलमधे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. त्यात आरती-प्रसाद विसर्जन या भानगडीत न पडता आम्हा सवंगड्यांना त्यावेळचे खास आकर्षण असे ते दर शनिवारी ठेवल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांचे. त्या काळात एकमेकांच्या घरी जाऊन गल्लीतील सगळे जण बसायला पटकुरं घेऊन रात्री आठ वाजल्यापासून घोळक्याने मिलच्या गेटपाशी रेटारेटी सहभागी होत, आत झुंडीने जात.