Skip to main content

अनुस्वार ....

लेखक उदय ४२ यांनी सोमवार, 28/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दावर अनुस्वार कसा द्यावा?कुणी सान्गेल का?

बासूदांचे 'अनुभव'

लेखक भोचक यांनी सोमवार, 28/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच. फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते.

"पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण

लेखक मानस यांनी सोमवार, 28/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना, "पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण. एकाच वेळेस १० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचा विक्रम. "ईस्रो" च्या सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. ह्या बद्दल सविस्तर माहीती येथे वाचा.

या गरमीला काय करावे बॉ?

लेखक वेदश्री यांनी सोमवार, 28/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही. ढीगभर काळजी घेत घरातच पडून राहूनदेखील जात्याच उष्ण प्रकृती असल्याने तोंडावर जर उठला आहे. दोन दिवसांनी घरी जायचे आहे. असे थोबाड घेऊन घरी गेले तर घाबरतील सगळे ( हापिसातही घाबरतातच आहेत पण बोलू शकत नाहीत तसे कोणी.. ) लवक्कर फरक पडेल असा काही उपाय आहे का कोणाकडे?

प्रारब्ध

लेखक पल्लवी यांनी सोमवार, 28/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वेचले जे क्षण सुखाचे, ते मुळी नव्हतेच माझे पाहिले स्वप्नात माझ्या सौख्य ते नव्हतेच माझे ! आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे ! राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ? गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे ! एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे ! ~पल्लवी~

आपली परिक्षापध्दती

लेखक भावना यांनी सोमवार, 28/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी अलीकडेच दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या. या परींक्षांदरम्यान चालणाय्रा कॉपी प्रकाराकडे पाहीले की परीक्षा नेमक्या कशासाठी घेतल्या जात असतात याबाबत संभ्रम निर्माण होतो. कित्येक ठिकाणी परिक्षाकेंद्रावर शिक्षकच यात सामिल असतात. तसे करण्यास त्यांनी नकार दिला तर त्यांना अनेक जीवघेण्या धमक्यांना सामोरे जावे लागते हे मी अगदी जवळुन अनुभवले आहे. अशा परीक्षांनी नेमके कुणाचे व कसे भले होणार आहे हे कितीही काथ्याकुट केला तरी समजत नाही.

गोरीच बायको हवी !

लेखक शितल यांनी सोमवार, 28/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गोरा र॑ग हा आता सै॑द॑र्याचा एक मुख्य भाग बनला आहे. ज्याला त्याला आपली गोरीच बायको हवी असते, आता एवढ्या गोर्‍या मुली आणायच्या कोठुन आणि ह्या आणि सावळ्या मुली॑॑ची लग्न कशी होणार ? सध्या लग्नाचा सीझन चालु आहे, लग्नातच लग्नाला आलेल्या उपवर मुला- मुलीची ही लग्ने ठरतात, सु॑दर मुली॑ना पटकन मागणी येते, आणि बाकीचे ज्या॑णी स्वतःचे जमविले नसेल त्या॑चे पाय वधुवर सुचक म॑डळाकडे वळतात. मग सुरू होते अपेक्षा॑ची ला॑ब लचक यादी , आपले स्वतःचे रुप आरशात न पाहता साथीदार अत्य॑त सु॑दर शोधला जातो. यातील पहिली इच्छा गोरी, नाके डोळी सरळ, अमुक अमुक उ॑ची, आणि क॑सात असते चष्मा नको.

फिशपॉन्ड

लेखक शितल यांनी रविवार, 27/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज मध्ये असताना आपल्यावर काही फिशपॉन्ड पडले असतील, तर काही आपण इतरा॑वर टाकले असतील, तर काही असेच आपल्या मित्र- मैत्रिणी॑वर पडले असतील तर ते आपण सा॑गु एकमेका॑ना.
Taxonomy upgrade extras