Skip to main content

वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 29/04/2008 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश असे आहेत:- १)रवि - दिनांक १४/०५/२००८ रोजी दुपारी ०३ वाजून ३३ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. २) शुक्र- दिनांक २०/०५/२००८ रोजी सकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. वरील राशीप्रवेशाच्या वेळा या मुंबई अक्षांश-रेखांशानुसार आहेत. आपला, (गणकभास्कर) धोंडोपंत

शनी - समज गैरसमज

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 29/04/2008 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
शनीग्रहाबद्दलच्या या लेखमालेत या लेखात सप्तमातल्या शनीबद्दल लिहिण्याचा मानस आहे. पंचमातील शनी आणि संततीसौख्य याबद्दल पूर्वी एका लेखात सविस्तर लिहिलेले आहे. जिज्ञासूंना तो लेख आमच्या ब्लॉगावरील Blog Archieves मध्ये सापडेल. शनी संततीसौख्यावर काय परिणाम करतो हे तेथे समजेल. या लेखात मानवी जीवनातील अत्यंत महत्वाच्या म्हणजे विवाहसौख्याच्या बाबतीत शनी काय फले देतो हा विषय आहे. सप्तमस्थान हे विवाहाचे स्थान आहे.

प्रतिमा सृष्टी

लेखक मन यांनी मंगळवार, 29/04/2008 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल घरी गेलो. दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही. काय झालयं तेच कळेना.म्हटलं जाउन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालय तरी काय? तर तीही जागची गायब. काहिच कळेना.अजब शांतता.माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना. जे दिसताहेत् ते बोलेनात.वैतागुन खिडकीवर ओरडलो:- "अरे, झालय तरी काय् ईथे?काल् पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे.मला जरा बर वाटायचं आनंदी जोडप्याकडे पाहुन.ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणुन मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणुनच लेका तुझा जन्म झाला) काय,चाललयं तरी काय ईथे?" खिडकीने एक स्माइल दिली.(गूढ, गमतीशीर स्माइल.खिडकी खुश आहे का उदास तेही कळेना.) मल

(रस्ता)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 29/04/2008 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच प्रतीक्षेनंतर अनिरुद्ध अभ्यंकर यांचा सुंदर 'रस्ता' सापडला आणि मला हायसे वाटले!;) चावल्यावर जे मुखी मी घोळले तेच फिरता पाठ मागे थुंकले पिंकलो न येथे एकटा मी कधी सोबतीला हे जथे पण पिंकले तू कशाला चुना निघताना दिला तोंड रे माझे अशाने पोळले मुखरसां, मी काय रे आता करू? कोपरे सगळे जिन्याचे रंगले यार माझे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती थुंकण्या हे चालले हाय हा तांबूल मजला भावतो, त्या तमाकूविण कुणाचे भागले? तांबूलहा 'रंगेल'ही माझ्या मुखी थुंकण्याचे सुख मलाही लाभले! हा मला 'रस्ता' मिळाला शेवटी त्यास पिचकारुन आता रंगले! पचकला 'रंग्याच' जाल
Taxonomy upgrade extras

रस्ता

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी मंगळवार, 29/04/2008 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
भेटल्यावर तोंडभर जे हासले तेच फिरता पाठ मागे बोलले मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले? मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! अनिरुद्ध अभ्यंकर

का बघायची मराठी नाटकं?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 28/04/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
कालच "सही रे सही'ची तिकिटं काढून दिली सासू-सासऱ्यांना. पहिलं तिकीट दीडशे रुपयांचं होतं आणि दुसरं एकशेवीस रुपयांचं. त्याच्या खालची तिकिटंच नव्हती! "बाल्कनी' बंदच ठेवली होती. गेली पाच-सहा वर्षं हे नाटक गाजतंय. दोन हजारांच्या आसपास प्रयोग झालेत. मी पहिला प्रयोग तीस रुपयांत खाली बसून पाहिला होता. फार वर्षं नाही झाली त्याला. त्यानंतर दुसऱ्यांना 50 रुपयांत बाल्कनीतून हे नाटक पाहिलं होतं. एवढी तिकिटं का असावीत या नाटकांना? नाटक म्हणजे काही सर्वंकष मनोरंजन नाही. काही कलाकार जिवंतपणे कला सादर करतात आणि आपण ती अनुभवतो, एवढंच. त्याहून विशेष काही नाही.