ब्रिटन प्रवास... माहिती
मित्रहो,
जून महिन्यात कंपनी तर्फे ब्रिटन मधे प्रवासाचे घाटत आहे.
अनुभविं कडून मार्गदर्शनाच्या अपेक्षेने लिहित आहे.
कृपया पुढिल माहीती हवी आहे:
१) मुंबई - लंडन प्रवास..
BA, VA, AI किंवा Jet Airways?
कोणता प्रवास ज्यास्त सुखकर आहे?
२) लंडन (हीथ्रो) ते लिस्टरः
विमान कि ट्रेन?
कोणता प्रवास स्वस्त?
३) लिस्टर मध्ये हॉटेलांचे दर काय आहेत?
सर्वसाधारण परंतु स्वच्छ हॉटेल अपेक्षित आहे.
जरा ह्यांचा आहार पहा...
जरा त्या बुश आणि कॉन्डोलिसा राइस यांना हे दाखवा.
म्हणजे कोण अन्नटंचाई आणि माहागाई वाढवतय ते कळेल त्यांना. आयला जरा आम्ही बर खायला लागलो तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागल.
जहाल नेत्याचे अंतरंग
जहाल नेते भाषणे करुन लोकांची माथी भडकवत असतात. पण त्यांच्या मनांत वेगळेच असते. बाकी कवितेतच वाचा.
समतेचा टिळा
लावून सर्वांशी खेळा
स्वतःला मात्र वगळा ॥
आश्वासने मोहात मिसळा
स्वप्नांचा फुलवा मळा
प्रत्यक्ष मदत मात्र टाळा
नुसताच वाजवा खुळखुळा ॥
शिव्यांनी जाळा
टीकेने डागाळा
स्वतःला मात्र संभाळा ॥
जातपात उगाळा
काढा बाहेर कोथळा
भावनांशी खेळा
वाहू द्या जखम भळभळा ॥
पण काढला जर कोणी गळा
तर म्हणावे बाळा ऽ ऽ
तुझ्यासाठीच सोसतोय या कळा ॥
Taxonomy upgrade extras
किंमत
कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला
प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागली ती कारणे शोधायला
मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला
काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला
बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला
हो मला म्हटलेस तू कविते जसे
मी खुळ्यागत लागलो वागायला
भाव मी दुखःस या थोडा दिला
आसवे ही लागली माजायला
माणसे येतील ही रस्त्यावरी
भूक आहे लागली बोलायला
प्रेमाची गोष्ट
कांही वर्षांपूर्वी "प्रेमाची गोष्ट" हे नाटक आलं होतं. लागू आणि निळु फुले ही नांवे पहाताच आम्ही ग्रुपने ते बघायला गेलो. पण नाटक फार वरच्या पातळीवरचे असल्यामुळे आमच्या डोक्यावरुन गेले .दोन दिवस अस्वस्थपणाने काढले मग ठरवलं, जसं दिसलं तसं लिहून काढायचं, कोणी जाणकार सांगेल समजावून! पण कसलं काय हो, अजून कोणी भेटलं नाही. तर वाचाच त्याबद्दल......
प्रेमाची गोष्ट म्हणजे कॉय ?
के.बी. साठे, बी.सी. साठे आणि तात्या पाटील हे तिघे कॉलेजातले जिवलग मित्र. नाटकांत अभिप्रेत असलेल्या काळात, कोणालाच आपल्या जातीची लाज वाटत नसावी, किंवा ते तिघे खिलाडु वृत्तीचे असावेत.
भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभेच्छा
लोकहो ,
शके १९३० सालची भगवान श्री परशुराम जयंती वैशाख शुद्ध तृतीया दिनांक ०७ मे २००८ रोजी आहे. हा दिवस अक्षय्य तृतीयेचा.
समस्त मिसळपावकरांना भगवान श्री परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भगवान परशुरामांना त्रिवार वंदन.
अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥
आपला,
(परशुरामभक्त) धोंडोपंत
(एका 'बैलाचे' मनोगत (गजल))
आमची प्रेरणा अजब यांचे 'एका फुलाचे मनोगत (गजल)'
कधी तरी मी 'फुगलो' होतो, अता जरी मी 'सुकलो' आहे
कधी तरी 'दरवळलो' होतो, अता जरी 'मावळलो' आहे...
गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली
हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे...
मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे
'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे...
अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो
विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे...
उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची
शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!...
चतुरंग
Taxonomy upgrade extras
मिसळपाव