Skip to main content

अलक चाहुल

लेखक नीळा यांनी मंगळवार, 02/02/2021 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
सारख जाणवत होत ती आसपास वावरतेय. रिकाम्या घरात बेडरूममध्ये मधुन कीचन तीथून हॉल. क्षणभर हार घातलेल्या तीच्या फोटो समोर स्थब्ध. सारा सारा वेळ मागे पाठीशी तीचीच चाहुल, तीचाच गंध,जीवघेणी हुरहूर.चुकुनच लावलेला तीचा शांपू!

कधीतरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 02/02/2021 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
उल्कापाताच्या आतषबाजीने दिपून जातोय मी आज पण कधीतरी चंद्रमाधवीच्या अद्भुत प्रदेशात अंतर्बाह्य उजळायचंय मला शब्दांच्या समृद्ध अडगळीत हरवून जातोय मी आज पण कधीतरी शब्दापल्याडच्या घनघोर निबिडात निरुद्देश पोहोचायचंय मला नीटनेटक्या रंगरेषा रेखाटतोय मी आज पण कधीतरी अमूर्ताचं असीम अवकाश अनवट रंगांनी भरायचंय मला त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्‍यात घुसमटतोय मी आज पण कधीतरी स्थलकालाचं वितान व्यापून थोडं थोडं उरायचंय मला
काव्यरस

माझ काय चुकलं

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 02/02/2021 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझ काय चुकलं भंडाऱ्यातल बाळ माझ्या स्वप्नात आलं म्हणल आजोबा , मला देवानी नाही नेल नऊ महिने तीच्या पोटात खुप काही ऐकलं बाहेर आल्यावर तीचं तोंड सुद्धा नाही पाहिलं निघाली होती आणायला करून स्वागताची तयारी हळूच घेऊन जा रे आजी होती म्हणायली अधीर झालो होतो भेटायला बघुन साऱ्यांची स्वप्नं म्हटलं होत मनाशीच लवकरच येतो खेळायला पळा पळा धावा धावा चहूकडे गोंधळ माजला अंधार झाला सगळीकडे छतावरचा दिवा पण विझला इवले इवले पाय माझे सांगा पळू मी कसा काका, मावशी, ताई ओरडून बसला माझा घसा माह्या लेकराला वाचवा माझी माय आरडत होती पदरानी तोंड दाबून टाचा खरडत होती काय झालं कस झालं कळलच नाही सुरू व्हायच्या