Skip to main content

मिसळ पाव..

लेखक योगिता_ताई यांनी बुधवार, 11/06/2008 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच सभासद झाले. पहिलाच प्रयत्न आहे समजून घ्यावे ही विनंती. विचार केला मिपाच्या लेखनाचा शुभारंभ मिसळ पावाच्या पाककृतीने करुया. -------------------------------------------------------- साहित्य- मटकी + वाटाणा - ३ वाटी कांदे - २ लसुण आले पेस्ट - १/२ टे स्पून १ टोमेटो पेस्ट गरम मसाला - १ टे स्पून लाल तिखट - १ टे स्पून हळद - अर्धा टी स्पून तेल - फोडणीसाठी मीठ - चवीनुसार कोथिंबीर सजावटीसाठी: फरसाण बारीक चिरलेले २ कांदे कोथिंबीर लिंबू कृती: तेलावर जिरे मोहरी घालून फोडणी करावी. त्यावर चौकोनी चिरलेले दोन मोठे कांदे घालून चांगले तांबुस होईपर्यंत परतावे.

तो मी नव्हेच --- कीती समान नामधारी?

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 11/06/2008 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या प्रमोद देवांचे तो मी नव्हेच डिसक्लेमर वाचून हा चर्चेचा विषय सुचला. आपल्याच सारखे नाव असणारी आणखी इतर व्यक्तीमत्वे जगात असतात. (कधी कधी आपल्यासारखे तंतोतंत दिसणारेही असतात. ते जरा पचवायला कठीणच जाते.) मिपाकरांपैकी कोणाला आपापले समान नामधारी सापडले आहेत का? मी माझ्यापासून सुरवात करतो. मी अरुण मनोहर रहाणार सिंगापूर. ललीत साहित्य लिहीणे आणि वाचणे हा छंद. याशिवाय मला दोन आणखी अरुण मनोहर माहित आहेत. एक अरुण मनोहर हे नागपूरचे नावाजलेले सिनीयर लॉयर प्रसीद्धच आहेत. दुसरे अरुण मनोहर graduate student working towards PhD at the Department of structural engineering, UCSD.

फरसबीची भाजी

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 10/06/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदघन यांचे राजवाड्यांचे गाव वाचले आणि आमची म्हैसूर ट्रीप आठवली.त्यावेळी आम्ही एका गेस्ट हाऊस मध्ये राहिलो असताना तेथल्या खानसाम्याने फरसबीची इतकी झक्कास भाजी केली होती की त्याच्याकडून रेसिपी घेतल्याशिवाय राहवले नाही.तीच पाकृ तुम्हाला सांगत आहे. साहित्य- २५० ग्राम फरसबी,१ मध्यम कांदा, १/२ वाटी ओले खोबरे,२ सुक्या लाल मिरच्या,कढीलिंबाची ४,५ पाने,१/२ चमचा उडीदडाळ,फोडणीचे सामान,तेल,मीठ चवीनुसार,साखर १ चहाचा चमचा,कोथिंबिर कृती- कांदा चौकोनी चिरा,फरसबी चौकोनी चिरा.१ टेबलस्पून तेलात फोडणी करा.त्यात कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ,लाल सुक्या मिरच्या घाला व परता.कांदा घाला व परता.खोबरे घाला व परता.झाकण ठे