Skip to main content

मि.पा. कट्ट, पुणे दिनांक - १२ जुन २००८

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 13/06/2008 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
सविस्तर माहिती (कोणी लिहिली तर) येईलच नंतर, हे आपलं 'सिनॉप्सिस' :) स्थळ : हॉटेल अभिषेक आणि हॉटेल पुरेपूर कोल्हापुर - दोन्ही एरंडवणे, मेहेंदळे गॅरेज जवळ (फु़कट पत्त्यावरून परत पुण्यालाशिव्या नकोत)
(सु) संवाद - प्र. हॉटेल अभिषेक कुठे आहे? उ. हॉटेल पुरेपूर कोल्हापुर समोर. प्र. बरं, हे हॉटेल पुरेपूर कोल्हापुर कुठे आहे? उ. हॉटेल अभिषेक समोर! प्र. हम्म! दोन्ही कुठे आहेत? उ. समोरासमोर! ;)
असो! हजेरी -
  1. दस्तुरखुद्द, मि.पा. मालक, अण्णांचे (मानस)शिष्य संत तात्याबा महाराज उर्फ तात्या अभ्यंकर
  2. मि.पा.

उद्यान नगरी

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 13/06/2008 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असतांना शांतारामबापूंचा 'झनक झनक पायल बाजे' हा आगळा वेगळा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्य यांना केंद्रस्थानी ठेऊन निर्माण केलेल्या या सिनेमातील कांही दृष्यांचे चित्रीकरण 'म्हैसूरच्या वृंदावन गार्डन'मध्ये केले होते आणि "ती दृष्ये पाहतांना प्रत्यक्ष स्वर्गलोक पहात असल्यासारखे वाटते." अशी त्याची तारीफ ऐकल्यामुळे "म्हैसूर म्हणजे वृंदावन गार्डन आणि म्हणजेच स्वर्ग " असे एक समीकरण डोक्यात फिट झाले होते.

आइस्क्रीम फलुदा

लेखक योगिता_ताई यांनी शुक्रवार, 13/06/2008 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त गोड व सोपी पाककृती ---------------------------------------- साहित्य - दीड चमचे कॉर्नफ्लोअर, २ कप पाणी, दीड कप बर्फाचे पाणी, २ चमचे तुळशीचे बी, १ चमचा गुलाब सरबत, आइस्क्रीम स्कूप थंड दूध (आवश्‍यकतेनुसार). कृती - तुळशीचे बी भिजवून ठेवा. साध्या पाण्यात कॉर्नफ्लोअर घालून शिजवा. पारदर्शक दिसू लागल्यावर शेवयाच्या यंत्राने बर्फाच्या पाण्यात शेवया पाडून घ्या. ३० मिनिटांनी गाळून घ्या. तुळशीचे बी ग्लासमध्ये घालून फलुदा घाला. १ चमचा गुलाबजल, बारीक केलेला बर्फ व थंड दूध घाला. सर्वांत वर आइस्क्रीम स्कूप ठेवा.

जगातली सगळ्यात फंडु मिसळ

लेखक सचीन जी यांनी शुक्रवार, 13/06/2008 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी मिपा चा नुकताच सभासद झालो आहे. नावावरुन आठवलं, जगातली सगळ्यात फंडु मिसळ पुणे - सोलापुर रस्त्यावर भिगवण या गावी मिळते. ज्योती हॉटेल. मी केवळ ही मिसळ खाण्यासाठी अनेकदा सोलापुर -पुणे - सोलापुर हा प्रवास कारने केला आहे ( सोपा रेल्वे पर्याय असताना). मिपाकरांसाठी भिगवण वारी अनिवार्य आहे. मिपा चा पंखा, सचीन जी

केळेपाक

लेखक वैशाली हसमनीस यांनी शुक्रवार, 13/06/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य_तीन पिकलेली केळी,एक वाटी साखर,एक वाटी ओले खोबरे,वेलचीपूड क्रुति_प्रथम केळ्याचे बारीक तुकडे करावेत,साखरेत थोडे पाणी घालून त्याचा एकतारी पाक करावा.तयार पाकात थोड्या वेळाने केळयाचे तुकडे,खोबरे आणि वेलचीपूड घालावी.सर्व मिश्रण नीट हालवावे.केळेपाक तयार.आयत्या वेळेस पाहूणे आल्यावर गोड पदार्थ झटपट तयार.पाहूंणे व आपण दोघेही खूश.

मन उधाण वार्‍याचे....

लेखक सुचेल तसं यांनी गुरुवार, 12/06/2008 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
हे गाण जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा अस वाटत की मन खरोखर आपल्याच मस्तीमधे धुंद होऊन, बेभानपणे झुलतय... इतक्या ठिकाणी ह्या मनाबद्दल ऐकतो/वाचतो की कधी कधी अस वाटत की हे मन आपल्या शरीराचा एक भागच आहे. पण विचार केल्यावर लक्षात येत की ह्रदय म्हणजे काही मन नाही. ह्रदयाला स्पंदन असतात. एका मिनीटामध्ये अमुक अमुक ठोके पडले की समजायच सगळ आलबेल आहे. हे ह्रदय तर मला घडयाळाच्या लंबकासारख वाटत. विशिष्ट गतीन सतत ठोके देत असत. ह्रदयाला मनासारख उधाण होऊन चालत नाही. मला वाटतं, सर्वप्रथम मनाची ओळख समर्थ रामदास स्वामींनी करून दिली. लहानपणी "मनाचे श्लोक" वाचताना मन म्हणजे नक्की काय हे खचितच कळल नव्हतं.

पाऊस

लेखक भारती यांनी गुरुवार, 12/06/2008 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
मिरवत रोषणाई वाजवीत ढोल ताशा स्वागत करण्या सृष्टीचे आला वरूण राजा करूनी रामराम त्या ग्रीष्माला झाली सुरवात बाई पावसाला उन्हाळी वनवास गेला ग लयाला जाग आली सृष्टीच्या नवचैतन्याला धुऊनी अ॑गे झाडे झाली ओली चि॑ब पाहती आइन्यात आपुलेच प्रतिबि॑ब झटकल्या पशुपक्षा॑नी ग माना चराचरा मुखी ओतला अमृताचा पान्हा धु॑द हवा पावसाळी, गारव्याची उठवत शिरशिरी पाउस आला ग बरसवत सरीवर सरी तने मने भिजवत झाली रोमा॑चित तरूणाई गेल्या क्षणा॑ना आठवत उसासली प्रौढाई
Taxonomy upgrade extras

मीलनाची ओढ

लेखक काळा_पहाड यांनी गुरुवार, 12/06/2008 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
ती त्याच्या वाटेकडे डोळे लावुन होती. वाट बघुन शिणली होती असे म्हणण्याइतका वेळ अजुन गेला नव्हता. मात्र त्याच्या येण्याची वेळ जवळ आली तशी ती सवयीने त्याची वाट बघू लागली. मीलनाची स्वप्ने रंगवू लागली. त्या मधुर स्वप्नांत असतानाही तिला चटके मात्र बसतच होते. रविराजाची नजर चुकवायची आजपर्यंत तिला कधीही हिंमत झाली नाही. वडिलांचा दराराच तसा होता. तापट , कडक आणि शीघ्रकोपी. त्यांच्यामोर कुणाचीच धडगत नसते. अशा वेळी तिला हमखास निशेची आठवण व्हायची. निशा आली की रविराज गायब होतात. किंबहुना रविराज दिसेनासे झाले की मगच निशा येते. निशा मायाळू आहे. ती आली की शांत, शितल वाटते.