जीवन मी जगून गेलो
जीवन मी जगून गेलो
.
एकसे सुख दु:खा लेखून गेलो
जीवनी असा मी जगून गेलो
पाहिली मी दिवास्वप्ने कधी जी
साकारण्या तया गढून गेलो
आनंद दिला-घेतला असा की
सुगंध बागेस देऊन गेलो
ऊन-पावसात हसलो सदा मी
मैफलीत गीत गाऊन गेलो
म्हणती कुणी सटकला कधी हा
साथ अशी तुला देऊन गेलो
करशिल मजवर आरोप कसे तू
जगणे तुला मी शिकवून गेलो
=========================
स्वाती फडणीस ....................... २२-०५-२००८
मिसळपाव