Skip to main content

बटाट्याची जिलबी (उपासाची ?)

लेखक खादाड_बोका यांनी मंगळवार, 15/07/2008 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बटाटे, तूप, साखर, केशर, आरारोट कृती: बटाटे घेऊन ते उकडुन, कुस्करुन घ्यावेत. एक वाटी गोळ्यास पाव वाटी आरारोट घेऊन, त्या गोळ्यात घालून गोळा चांगला मळावा. नंतर गोळ्याच्या दीडपट साखर घेऊन, त्याचा दोन तारी पाक करून, त्यात केशर घालावे. वरील बटाट्याचा गोळा जाड भोकाच्या शेवपात्रात घालून, साजुक तुपावर शेवेसारखा चवंगा पाडावा व तांबूस रंगावर तळावा व पाकात सोडावा. ही बटाट्याची जिलबी कुरकुरीत व छान लागते. :P (ही जिलबी उपासात खायची की नाही ही स्वत: ठरवावे. ~X( )

रताळ्याचे गुलाबजाम

लेखक खादाड_बोका यांनी सोमवार, 14/07/2008 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
सामुग्री : चार रताळी साखर दीड वाटी तळण्यासाठी तूप शिंगाडे पीठ 2 चमचे साबुदाणा पीठ 1 चमचा वेलची पूड कृती : रताळी उकडून सोलून घ्यावी आणि चांगली कुस्करून त्यात दोन चमचे शिंगाडे पीठ, साबुदाणा पीठ घालून ते मळून घ्यावे. या मिश्रणात वेलचीचा दाणा घालून लहान गोळे करून घ्यावे. कढईत तूप तापवून घ्यावे. त्यात मंद आचेवर हे गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यावे. नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात हे तळलेले गुलाबजाम सोडावे आणि या पाकात दोन चमचे गुलाबपाणी घालावे. चार पाच तास हे गुलाबजाम पाकात भिजत राहू द्यावे. सजावट : सजावटीसाठी त्यावर लाल गुलाबाच्या पाकळ्या आणि सुक्या मेव्याचे बारीक तुकडे पेरावे.

जातीधर्माविषयक लेखन - मिपाचे धोरण!

लेखक आणिबाणीचा शासनकर्ता यांनी सोमवार, 14/07/2008 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे. या चर्चांमधून काहीही निष्पन्न होत नाही, उलटपक्षी अशा लेखनातून/चर्चांमधून बर्‍याचदा सभासदांमध्ये एकमेकांच्या जातीधर्मावर आणि पर्यायाने एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर उतरून चिखलफेक केली जाते. आणि त्यामुळे या संकेतस्थळाची शांतता भंग पावते असे मिपा व्यवस्थापनाला वाटते! बर्‍याच सभासदांच्या तक्रारींवरून मिपा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलेला आहे.

अणु करार भारतास अनुकुल की घातक ?

लेखक गमत्या यांनी सोमवार, 14/07/2008 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
अणु करार भारतास अनुकुल की घातक? आज काल आपण सर्वजण वरील विषयावर काही ना काही वाचतो किंवा एकतो आहे. तर मित्रांनो चला तर आपण आपले मत ह्या विषयावर मांडु या जेणे करुन आपल्या सर्वांच्या माहीति मध्ये भर पडण्यास मदत होईल. मि मा. तात्यांनाही विनंती करतो कि त्यांनी ही आपले अमुल्य मत मांडावे. धन्यवाद. देश हिताचा विचार करणारा (गमत्या)

साधे सोपे गणित.....

लेखक तात्या विंचू यांनी सोमवार, 14/07/2008 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
खालील समीकरणांमध्ये योग्य ती गणिती चिन्हे घालुन उत्तर ६ आणा. गणिती समीकरणांचे सर्व नियम लागू. त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये. उदा. २ + २ + २ = ६ ६ + ६ - ६ = ६ मी २ सोपी उदाहरणे सोडवुन दाखवली आहेत.आता उरलेली सोडवा. १ १ १ = ६ २ २ २ = ६ ३ ३ ३ = ६ ४ ४ ४ = ६ ५ ५ ५ = ६ ६ ६ ६ = ६ ७ ७ ७ = ६ ८ ८ ८ = ६ ९ ९ ९ = ६

'नवी मुंबई' दर्शन

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 14/07/2008 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
नवी मुंबई दर्शन - आधुनिक शतकातील सुनियोजीत शहर म्हणुन उदयास येत असलेली 'नवी मुंबई '. जुन्या मुंबईतील अनेक प्रेक्षणीय ठिकानांना आपण नेहमीच भेट देतो. मात्र नवी मुंबईतील ठिकाणे आपल्याला फारशी माहित नाहीत. यातील काही ठिकाणांची चित्रमय माहिती. ------------------------------------------------------------------------ मुंबईहुन नवी मुंबईत यायचे झाल्यास सायन - पनवेल महामार्गावरुन , मानखुर्द नंतर येणारा खाडी पुल ओलांडुन आपण नवी मुंबईच्या आर्थिक राजधानी 'वाशीत' प्रवेश करतो ( तस मुलुंड - ऐरोली खाडीपुलावरुन ही नवी मुंबईत येता येते.

मिपाचा ट्रॅफिक जॅम..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 14/07/2008 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, दिवसेंदिवस मिपावर नवीन लेख आणि प्रतिक्रिया यांचा ट्रॅफिक जॅम होत आहे. अनेक मंडळी अत्यंत आवडीने व मिपावरील प्रेमाखातर इथे भरभरून लिहीत आहेत, चांगलं लिहीत आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. परंतु हा ओघ इतका भरभर आहे की वाचायला टाईमच भेटत नाय! :) कामधंद्यापायी टाईमच भेटत नाय हे एक, आणि सवडीने वाचू म्हटलं तर नवीन लेख आणि प्रतिक्रियांचा ट्रॅफिक अजूनच जॅमच होत रहातो! :) तर मंडळी, तूर्तास आमच्यापुढे असा प्रश्न आहे की या ट्रॅफिक जॅमचं करयचं काय? एवढं सगळं वाचायचं कधी अन् केव्हा? :) कुणी काही उपाय सुचवेल का? :) आपला, (मिपा पोलिसांच्या वाहतुक शाखेचा) हवालदार तात्या.

काय करु

लेखक किर्ति यांनी सोमवार, 14/07/2008 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
8> मला एक मुलगा आहे आणी माझी अशी इच्छा आहे कि मी एक मुलगी अडॉपट करवी क्रुपया मला सल्ला द्यावा

श्रद्धा॑जली: स॑गीतकार मदन मोहन

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी सोमवार, 14/07/2008 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ जुलै ! १९७५ साली याच दिवशी माझ्या अत्य॑त लाडक्या स॑गीतकाराने 'मदन मोहनने' शेवटचा श्वास घेतला. ह्या लेखाद्वारे मी त्या॑ना भावपूर्ण आदरा॑जली वाहतो आहे. ब्रिटिश अ॑कित मेसापोटेमिया (आत्ताचा इराक) मधील बगदाद शहरात दि. २५ जून १९२४ रोजी एका धनिक कुटु॑बात मदनमोहनचा जन्म झाला. त्या॑चे वडिल रायबहाद्दूर चुनिलाल कोहली हे एक वजनदार असामी होते. बगदादमधून रावळपि॑डी- चकवाल येथे काही वर्षे वास्तव्य केल्यावर कोहली कुटु॑ब मु॑बईत स्थायिक झाले. (१९३५) रायबहाद्दूर त्यावेळच्या 'बॉम्बे टॉकिज' ह्या नामव॑त फिल्म क॑पनीत भागिदार होते.