Skip to main content

खेळी.

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 15/07/2008 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
खेळी. पळत होते मी........ नियती चकवत होती. तेजाळ कवडसे!! कधीच हाती न येणारे. मग ठरवल, बास!. आता नाही पळायचे, पुरे झाला उन-सावल्यांचा खेळ, आणि थांबले. एका जागी निश्चल. जिंकल्या सारखी. : : : खुप उशिरा कळलं, ती ही तिचीच खेळी. पुन्हा बरोबर पडलेली. ======================== स्वाती फडणीस......................१९-०१-२००८
Taxonomy upgrade extras

महासमर्थ : "नानासाहेब धर्मधिकारी."

लेखक रमा पेशवे यांनी मंगळवार, 15/07/2008 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
"दासबोधाच्या" निरुपणाद्वारे समाजजागॄति करणार्‍या आणि तळागाळातील अशिक्षित लोकान्पर्यन्त सु-सन्स्कारान्चे बीज रोवणार्‍या , समर्थ व्यासपीठावरील महासमर्थ "नानासाहेब धर्माधिकारी" यान्ना आदरपूर्वक भावन्जली..... जय जय रघुवीर समर्थ!!!

फुकटची फौजदारी

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 15/07/2008 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दोन लेखांना मिळालेले प्रतिसाद वाचल्यानंतर फक्त एक प्रतिसाद लिहिण्यापेक्षा एक नविन प्रकटन लिहावे असे मनात आले.

मिसळ

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 15/07/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal

पांडेकर आजी..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 15/07/2008 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या. "वयनी..... " अशी किनर्‍या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै.

अज्ञातवासातला एक पांडव..अर्जून (दिगसकर).

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 15/07/2008 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
"अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी?

(...ते तसे नाहीत ना, मी ...)

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 15/07/2008 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा शैलेश कुलकर्णी यांची सुंदर गझल ...ते तसे नव्हतेच, पण... ते 'तसे' नाहीत ना, मी ते तपासुन पाहिले, मी जरा त्यांच्यातले नाते तपासुन पाहिले... रोज रात्री ढोसली की , सोडुनी मज एकला, नेमके, हे घर कुठे जाते ? तपासुन पाहिले... त्या तिच्या नरड्यात होते अडकलेले काय, ते का असे रेड्या परी गाते ? तपासुन पाहिले... जाणिले, जे गायले , का गायले ? माझेच मी काल या छातीतले भाते तपासुन पाहिले... रोज ती पळते तरीही , ती अशी फुगली कशी ? कोणते हे पीठ ती खाते ? तपासुन पाहिले... ...केशवसुमार

(मोजलेली 'मापे')

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 15/07/2008 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसे यांची 'माझ्या रचना' वाचून आणि त्यानंतर केसुशेठची (माझ्या रचना) बघून आमचीही जुनी कारागिरी डोळ्यांसमोर आली! ;) मोजण्याची माप पहिली खेप आहे त्यात अन आखूड मेला टेप आहे कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! 'मोजमापे' घेतली का मी चुकीची यौवनाचा की तिच्या प्रक्षेप आहे? मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? सलवार, वा कुडता असो वा कंचुकी शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे! चतुरंग

बटाट्याची शेव (आषाढी एकादशी विशेष)

लेखक खादाड_बोका यांनी मंगळवार, 15/07/2008 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बटाटे, तिखट, मीठ, जिर्‍याची पूड, थोडे राजगिर्‍याचे पीठ, तळण्यासाठी तूप. कृती : बटाटे घेऊन, ते वाफवून, अगदी वाटून घ्यावेत. ह्या बटाट्याच्या गोळ्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व जिर्‍याची पूड व थोडे राजगिर्‍याचे पीठ घालून गोळा चांगला मळावा. नंतर शेवपात्राने शेव तुपात तळून काढावी, ही शेव कुरकुरीत व चवदार लागते. ;)