Skip to main content

गं! राहू मी कसा भानावरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 18/07/2008 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--हसरत जयपुरी) पाहूनी तुला मजसमोरी केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी पदर तुझा तू न सांवरी गं! राहू मी कसा भानावरी नयन तुझे बिलोरी जांबापरी ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी गं! राहू मी कसा भानावरी पाहूनी तुला मजसमोरी हंसणे तुझे जणू वीज चमकणे श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे पाहूनी तुला मजसमोरी गं! राहू मी कसा भानावरी श्रीकृष्ण सामंत

जोगवा

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 18/07/2008 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा स्वातीताईंची कविता गोडवा जोगवा . घडी भर असेच राहू, बदा बदा नको लिहू! हातामधली लेखणी जरा, खाली उतरवून ठेवू!! जलद विडंबकांचा, कसा आता सूड घेऊ! नीती मती सोडून, प्रतिभेचा तळ गाठू!! चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ! आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!! ======================= केशवसुमार.............. १७-०७-२००८

(सोडवा)

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 18/07/2008 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
सोडवा . राशीला या आलाय राहू, कवितेचा लकडा नका लावू! (गद्यामधल्याच ओळी सगळ्या, खाली-वरती रचून ठेवू!!) श्रोत्यांच्या या करड्या दर्यात, कविता मारुन सूर घेऊ! फुलेपाकळ्या,चंद्रचांदण्या निवडत-चिवडत सरसर पोहू!! विडंबन पडता पुन्हा एकदा, कविता दुसरी उधार घेऊ! तोंड पोळता,बोट चेपता "सोडवा,सोडवा" म्हणत राहू!! ======================= बेसनलाडू.............. १७-०७-२००८ प्रेरणा: स्वातीताई फडणीसांचा गोडवा (हा कलाविष्कार)

गोडवा

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 18/07/2008 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
गोडवा . घडी भर असेच राहू, धाव धाव नको धावू! डोक्यावरच टोपलं जरा, खाली उतरवून ठेवू!! निळ्या करड्या दर्यात, जलद सूर घेऊ! नाती ज्ञाती निरखत, जीवनाचा तळ गाठू!! चल पुन्हा एकदा, पेन उधार घेऊ! खार्‍या खर्‍या पाण्यात, गोडवा शोधत राहू!! ======================= स्वाती फडणीस.............. १७-०७-२००८

फराळी मिसळ - फोटो

लेखक चकली यांनी गुरुवार, 17/07/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
फराळी मिसळीचे फोटो - सर्व मि पा करांकरता! एक -> साजूक तुपावरची बटाटा भाजी दोन -> ऑल टाइम फेव.

(ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते..)

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 17/07/2008 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा सध्याचे 'मिपा वरचे प्रतिसादित विषय' (कृपया सर्व जण हे विडंबन मजेत घेतील या बद्दल विश्वास आहे ) चाल : चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते -------------------------------------------------------------------------- खेळीमेळीन लिहीत होते ! ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते.!! कौल लाविला मर्मस्थानी ! गाणं शिकुन लहानपणी ! इतिहास अभ्यासित होते ! ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते.
Taxonomy upgrade extras

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

लेखक पावसाची परी यांनी गुरुवार, 17/07/2008 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
एक अबोल प्रेम फुललेच नाही !! दोघांच्याही मनात होतं, दोघांनाही ते ठाऊक होतं कुनी कधी काही बोललेच नाही….. एक अबोल प्रेम फुललेच नाही !! जाण्या-येण्याच्या वेळाही एक, ठरुनच गेल्या होत्या बहुतेक वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही एक अबोल प्रेम फुललेच नाही !! नजर भिरभिरते,एकमेंका शोधते; दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते नजरेपलिकडे काही घडलेच नाही एक अबोल प्रेम फुललेच नाही !! नसेना का घडले मिलन परि… आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही! -अज्ञात

प्रतिसाद

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 17/07/2008 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा स्वाती ताईंची कविता खाली-वर, खाली-वर -------------------------------------------------------------------------- घोंघावणार्‍या चर्चेत सोडुन दिला एक प्रतिसाद अलगद करुन राहिलो गमन पहात राहिलो मजा इकडे तिकडे : प्रतिसाद.......... आता दिसतही नाही मी शोधत आहे......... नवीन आलेले प्रतिसाद वर-खाली वर-खाली
Taxonomy upgrade extras

खाली-वर, खाली-वर

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 17/07/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
. उसळणार्‍या लाटांत सोडून दिली एक बोट अलगद सोडवून घेतले बोट वर-खाली, वर-खाली हेंदकाळतंय पाणी बोट............... आता दिसतही नाही : मी तिथेच............. बोटाकडे बघत खाली-वर, खाली-वर ==================== स्वाती फडणीस............२९-०१-२००८

काळ्या ढगाभोवतालची चंदेरी किनार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 17/07/2008 05:11 या दिवशी प्रकाशित केले.
"अरविंदनेच मला चंदेरी किनार दाखवली,आणि आता मी ती अल्यागेलेल्याला दाखवते." असं, ज्यावेळी मला स्मिता अध्यारत बोलली,त्यावेळी मला पण तिची गोष्ट जास्त आत्मीयतेने ऐकावीशी वाटली.