Skip to main content

||ओम नमः शिवाय ||

लेखक मृगनयनी यांनी सोमवार, 04/08/2008 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमन माझे तुला नटवरा.. हे शिवशंभो, भोळ्या शंकरा.. कृपासिंधो तू, हे गौरीहरा.. प्रसन्नवदन तू , कर्पूरगौरा.. तांडव करुनि, तु ब्रह्मांड पेलिसी.. प्राशुनि हलाहल, नीलकंठे मिरविसी.. फासुनि विभुती, तू हिमालये वससि.. उमापती शिव, हस्ती त्रिशूल घेसी.. मस्तकी तुझिया चंद्र विराजे.. हाती डम डम डमरू वाजे... तुझ्या जटा-मुकुटातुनि वाहे मुक्त मंदाकिनी.. सर्प-भुजंग खेळति देहावरी, तू शूलपाणिनी.. मुंडक-माला धारिसी तू, चिता-भस्म विलेपुनि, विश्वजननी महामाया , असता तुझी अर्धांगिनी.. महेश्वर तू, महादेव तू, धन्य धन्य देवी सती.. पुन्हा मिळविण्या तुज भूपती, जन्मली ती पार्वती.. अनाथांचा नाथ असुनि, निराकार तू, नि:स
Taxonomy upgrade extras

मानसिक भितीने ग्रासलेला गुरुनाथ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 04/08/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
"बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं" मी एकदा माझी कार रिपेअर करण्यासाठी एका कारखान्यात टाकली होती.मोटर कारखान्याच्या मालकाने मला एक भली मोठी लिस्ट दिली आणि म्हणाला, "ह्या लिस्ट मधले पार्टस तुम्ही अमूक अमूक दुकानातून आणा.हे पार्टस स्पेशल आहेत आणि आम्ही ते ठेवत नाही." ती लिस्ट घेवून मी त्या दुकानाच्या पत्त्यावर दुकानात गेलो.दुकानाच्या कॅबिन मधून आतून येणारा आवाज जरा परिचयाचा वाटला.म्हणून कौन्टरवरच्या त्या माणसाकडे जरा चौकशी केली की ते कोण बोलत आहेत.तो म्हणाला, "ते आमचे मालक गुरुनाथ आजगावकर" माझ्या चट

(नूर)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 04/08/2008 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
कुमार जावडेकरांची 'नूर' गजल पाहून कोणे एके काळी आमचा बदललेला 'नूर' पुन्हा एकदा आमच्या आठवणीत आला! दारावरुन गेली, पाहून हूर आलो आता इथेच होती, शोधीत दूर आलो! जाऊन बारमध्ये ना घेतली कशी मी (पाहून तेथला मी आनंद-पूर आलो) ही फौज बेवड्यांची, पाहू कशास आता भेटीस 'पेजथ्रीं'च्या येथे चतूर आलो... 'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण- भलताच मैफिलीचा पाहून 'नूर' आलो चतुरंग

प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 04/08/2008 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी दिल्ली एअरपोर्टवर फ्लाइट चुकली म्हणून निवांत दुसरी फ्लाइट मिळेपर्यंत वेळ काढत बसलो होतो.माझी एक खूर्ची सोडून दुसर्‍या खूर्चीवर-व्हिलचेअरवर- एक सदगृहस्थ बसले होते.सायंटिफिक जगतात ते विषेश नावाजलेले होते.त्यांची विषेश गोष्ट अशी होती की त्यांना स्नायू हळू हळू क्षीण होण्याचा एक व्याधी झाला होता.तरीपण ते आपल्या कामात नेहमी व्यग्र असायचे.त्यांच्या बाजूला एक गृहस्थ बसून ते जे काही बोलत होते ते तो लिहून घेत होता. लेट फ्लाइट बद्दल आमचा विषय निघाला आणि दोन तास इथं बसून राहण्याला पर्याय नव्हता.मीच त्यांच्याशी जास्त जवळीक आणून त्यांची चौकशी करू लागलो होतो. त्यांची ही परिस्थिती पाहून मीच त्य

बंधने

लेखक स्नेहश्री यांनी रविवार, 03/08/2008 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
झुगारुन टाकावीशी वाटत आहेत ही बंधने काहीतरी शोधत आहेत माझ्या मनाची स्फंदने काहीतरी बोजड घेऊन चालते आहे उगीच कोणाच्यात तरी मन गुंतवत आहे तुझ ते scapbook मला अस्वस्थ करतय आणि एकीकडे मात्र माझ मन तुझ्यासाठी झुरतय गुंतत आहे फक्त तुझ्यासाठीच पण मनात येत आहे,काय करायच त्या "scap"च माझच मला कळत नाही की नक्की आता काय करायच तुझ्या बरोबर आयुष्य काढायच का तुला विसरुन जायचा...???

निळसर छटा अपरिहार्य...

लेखक मेघना भुस्कुटे यांनी रविवार, 03/08/2008 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
कित्येकदा आपल्या आयुष्यातल्या अभावांची आपल्याला जाणच नसते. दुखऱ्या नसेला स्पर्श होईस्तोवर आपल्याला इथंही दुखतं आहे, हे समजतच नसतं. त्या दुखण्याला आपल्या असण्यात सामावून घेत निमूट विनातक्रार वाट चालत असतो आपण. एखादं वळण मात्र असं येतं, की सगळ्या सगळ्या गाळलेल्या जागा चरचरून समोर उभ्या ठाकतात. वाट अडवतात. प्रश्न विचारतात. तिथून पुढचं आयुष्य साधं-सोपं-सरधोपट उरत नाही मग. वाट तर उरतेच, पण सोबत दरेक पावलापाशी एक लख्ख बोचही उरते. दुखावते. सुखावतेही. या जागांचं ऋणी असावं की शाप द्यावेत त्यांना? हा ज्याच्या त्याचा निर्णय. आपापल्या वकुबानं आणि जबाबदारीनं घेण्याचा.

श्रावणमासी, विरस मानसी,हळहळ दाटे चोहिकडे

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 03/08/2008 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणमास! निसर्ग सौंदर्याचा मास. व्रत-वैकल्यांचा मास. त्याच बरोबर मद्य-मांस विरहित मास. रोज `मद्यमासा'वाचून अजिबात न चालणारे अनेक मद्य-मांस प्रेमी, कुत्रा-मांजर पाळायचे ठरवावे इतक्या सहजतेने श्रावण पाळायचे ठरवतात. पण ते इतके सोपे नाही याची जाणीव एक दोन दिवसात होते. (काहीना एक दोन तासातच. असो.) न पेलणारी व्रते करायला गेले की हे असेच हाल हाल होतात. बालकवींचा श्रावणमास या `श्रावणपाळ' मंडळींच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा हा एक प्रयत्न.
Taxonomy upgrade extras

खरचं तु हवी होतीस ..

लेखक पंचम यांनी रविवार, 03/08/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
खरचं तु हवी होतीस ..
वाळुतल्या त्या शिंपल्यांना नवे साज देण्या तु हवी होतीस .. वाळुतल्या पावलांना घुंगरांचा आवाज देण्या तु हवी होतीस .. किती लाटा किना-यांवरुन, परत फिरुन उदास गेल्या.... त्या लाटांना पावलाचा, स्पर्श देण्या तु हवी होतीस .. प्रकाशाने आस सोडली, तु परत येण्याची, अंधारल्या त्या किना-याला कवडसा देण्या तु हवी होतीस .. विखुरलेले शब्द सारे, त्यांना पाश देण्या तु हवी होतीस .. अर्थ हरविलेल्या शब्दांचे काही आभास देण्या तु
Taxonomy upgrade extras

फुलझाडे कशी लावावीत?

लेखक लबाड मुलगा यांनी रविवार, 03/08/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
नर्सरी किंवा बागेची साहित्य (रोपे वगैरे) न आणता कमीत कमी किंमतीत (फुकटातच म्हणा ना) फुलझाडे वगैरे लावुन बाग कशी सजवावी‍?