लेखकचिन्या१९८५यांनी बुधवार, 06/08/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते.
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी बुधवार, 06/08/2008 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
"हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली "मला माझा जॉब आवडतो म्हणून."
आमच्या बिल्डिंगच्या अगदी वरच्या माळ्यावर एक चतर्जी म्हणून बंगाली कुटुंब राहत होतं.राहत होतं म्हणण्याचं कारण बरेच वर्षानी ते आपलं घर सोडून कलकत्यात राहायला गेलं.पण इतकी वर्ष मुंबईत राहिल्याने त्यांच्या सर्व मुलाना मराठी अगदी अस्खलीत येत होतं.कदाचीत हे मुळचे बंगाली आहेत असं सांगणं पण जरा कठीण झालं असतं.
लेखकबेचवसुमारयांनी बुधवार, 06/08/2008 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
.....स्व.सुरेश भटांची माफी मागुन.....त्यांच्या "रंग माझा वेगळा" ह्या रचनेचे ई-डंबन
ढोसुनि गुत्त्यात सार्या ब्रँड माझा वेगळा
गुंतुनि गुंत्यात सार्या हँड माझा मोकळा
कोण जाणे कोठुनी ह्या बाटल्या येता पुढे
मी असा की होतसे मग ओवळ्याचा सोवळा
राहती माझ्यासवे हे बेवडे भूतांपरी
कोणते हे मद्य ज्याचा लागला आम्हा लळा
कोणत्या काळी कळेना मी उठाया लागतो
लुडकणारा मी कुठेही ठार ऐसा वेंधळा
सांगते 'तात्पर्य' माझे भणंग ही माझी दशा
बेवडा मी फाटका मी अस्थि
लेखकचतुरंगयांनी बुधवार, 06/08/2008 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाआधी अनिरुद्ध अभ्यंकरांची हळुवार'चाहूल' आम्हालाही लागत होती आणि त्या प्रणयधुंद काळानंतरची वास्तवाची चाहूल आम्हाला लागली ती अशी! आमच्यापाशी मूल सोडून काही कामानिमित्त गावाला गेलेली बायको दूरध्वनीवरुन विचारते आहे सगळे ठीक आहे ना?
किरकिरे तुझे ते मूल
मला चाहूल
सतत कानाशी
होईल पहाट
बदलतो कूस
पुन्हा जराशी
चालीत कसा मी मंद
गात्रात कुंद
दिवसाचा
हा असाच चाले
दिवस मास उत्सव
रडण्याचा
आकंठ रडे ते झोळीत
मुते खोलीत
तिथे ओल
तो स्पर्श नको
मज नको
बोबडे बोल
हे स्वप्ना परी वाटे
पण नसे खोटे
बोलू कुणाशी
थोपटले निजून मी
मूल लवंडलेले
उशाशी
चतुरंग
लेखकमनिषयांनी बुधवार, 06/08/2008 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा चांगला वेब होस्टींग सर्व्हिस प्रोव्हाइडर (? ? सेवादाता) सुचवाल का? नेट-४-डोमेन ची सेवा फार खराब झाली आहे आणि जागा कमी आणि दर जास्त. कोणी दुसरा एखादा सुचवेल का? माझी (कमीत-कमी) गरज व बजेट साधारण असे आहे -
(१) ५०० एम. बी. वेब-स्पेस
(२) १० मेल आय डी - पॉप/आय-मॅप/एस.एम.टी.पी. सह
(३) निदान ३ सब-डोमेन
(४) लिनक्स सर्व्हर आणि पर्ल्/पी.एच.पी.
(५) डाटाबेस असल्यास उत्तम.
(६) सगळ्यात मह्त्वाचे - चांगली सेवा/सपोर्ट आणि अखंडीत सेवा.
बजेट - ३०००/वर्ष
लेखकगणा मास्तरयांनी बुधवार, 06/08/2008 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
गूगल मॅपवर सहज पहाताना लक्षात आले की काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवले आहेत. दुसरा असा तुटक रेषेचा प्रदेश आहे तो गाझा पट्टीचा. 'गूगल अर्थ'वरपण हे प्रदेश लाल रेघेने दाखवले आहेत. ह्याचा अर्थ होतो काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतात नाहीत.
आपण याबाबतीत काय करु शकतो? काय केले पाहिजे. केवळ राज्यकर्त्यांना शिव्याशाप देउन चालेल का?
निदान गूगल कंपनीकडे निषेध नोंदवता येइल का? जाणकारांनी आपले मत मांडावे.
लेखकमृगनयनीयांनी बुधवार, 06/08/2008 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
मन कातर कातर...
फार जपलं जपलं...
पाणी गढूळ गढूळ...
उडे चिखल चिखल...
एक बोचला कातळ...
वाहे रक्त भळभळ....
मनी उठले काहूर...
एक वेदनेची लहर...
परत लाटांचा कल्लोळ...
पण जल निर्मळ निर्मळ...
मनी आशेचा मोहोर...
वाहू थांबले रुधिर....
मन कातर कातर...
झाले नितळ नितळ...
लेखकउपटसुंभयांनी बुधवार, 06/08/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही.
मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही.
भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना,
कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना.
मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा.
मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही.
मी डेटिंग केले नाही..
बुजलेला यांत्रिक चेहरा, सुटलेली घाबरगुंडी.
सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी
त्यांच्या बापाला भ्यालो अन भावालाही भ्यालो.
मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही.
मी डेटिंग केले नाही
अव्यक्त फार मी आहे मूळ मुद्द जिथल्या तेथे.