Skip to main content

पेन्सिल स्केच.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 11/08/2008 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा कर ! यावेळी मी मागे कुणीतरी दिलेल्या सूचनेचा आदर राखत एक स्केच जोडत आहे पण नाव सांगत नाहिये.स्केच कुणाचे आहे हे ओळखा आणि आवडले तर कळवांआही आवडले तर उलट जास्त प्रतिक्रिया येतातच. उदय सप्रे

पालीचं शेपूट

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 11/08/2008 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
"मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं. "पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते." "अंतरज्ञान म्हणजे"व्यवहारी विचारसरणी बाजूला करून मिळालेले ज्ञान." कदाचीत ही व्याख्या किती बरोबर असेल कुणास ठावूक.पण एव्हडंच म्हणता येईल की अंतरज्ञान अव्यवहारी असलं पाहिजे." असं म्हणत शामली मला आपला अनुभव सांगू लागली. "मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.आजी, आजोबा, मामा, मामी ही नाती आणि त्यांच्या

वय सोळावं सरलं की.....

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी सोमवार, 11/08/2008 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
वय सोळावं सरलं की सगळं हिरवं दिसू लागत स्वतःभोवती गिरकी घेत मनात पाखरू वसू लागत वसंताच्या बागेमध्ये चाफा केवडे फुलू लागतात फुलां भोवती पिंगा घालण्या भवरे ही जमू लागतात न बोलता प्रत्येकाला सार काही कळू लागत वय सोळावं सरलं की..... पुनवेच्या रातीला सागराला भरती येते क्षितिजावर आकाशाला भेटायला धरती येते प्रेमाची ही आगळी भाषा प्रत्येकजण बोलू लागत वय सोळावं सरलं की..... पहिला वाहिला पाऊस अन पहिली वाहिली प्रीत असते प्रत्येकाच्या ओठांवरती धुंद एक गीत असते ओलाचिंब मन तेव्हा वार्‍यावर झुलू लागत वय सोळावं सरलं की..... हिरव्या हिरव्या पानांमध्ये सळसळणार वारं असत तुझ्या डोळ्यांच्या नजरबंदीत

हौतात्म्याची शताब्दी आणि अजरामर हौतात्म्यगीत

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 11/08/2008 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानातील १८५७ साली भडकलेला क्रांतिचा वणवा शमला कि काय असे वाटत असतानाच विसावे शतक सुरू झाले आणि भारतमातेला मुक्त करण्यासाठी हिदुंस्थानातील क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा क्रांतिदेवतेची आराधना सुरू केली.

पावसाळ्यातील एक दिवस

लेखक अजिंक्य यांनी रविवार, 10/08/2008 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर अलार्म झाला, कोंबडा कानि ओरडला, पाऊसही आला मजला, उठवण्या ||१|| आवरले मग वेगात, आंघोळ उरकली झटपट, धावलो बॅगसह पटपट, स्टेशनी ||२|| गाडी न थांबली पूर्ण, तरि कुदलो आतच थेट, बैसण्यास 'विंडो सीट', मिळविली ||३|| अजिबात हले ना गाडी, स्टेशनात होई 'शोर', गाडीस मिळेना जोर, धावण्या ||४|| पाऊस वाढला फ़ार, आतले प्रवासी गप्प, 'सेंट्रल'चे धंदे ठप्प, जाहले ||५|| एक तास थांबुन आत, मग मुकाट जागा सोडत, पकडली घराची वाट, सगळ्यांनी ||६|| माझा जो झाला पोपट, कविता त्याचीच करून, 'पावा'त दिली 'मिसळू'न, चाखण्या ||७||
Taxonomy upgrade extras

पावनखिंड

लेखक घाटावरचे भट यांनी रविवार, 10/08/2008 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
पावनखिंडीच्या रणसंग्रामाला काव्यात बंदिस्त करण्याचा हा एक क्षुद्र प्रयत्न प्रेरणा: मनीषतैंची ही कविता आणि अर्थातच राजा शिवछत्रपती

मलेशियातील माझे खाद्यजीवन

लेखक वैशाली हसमनीस यांनी रविवार, 10/08/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून रात्री निघालेले विमान कोलालंपूरला सकाळी सात वाजता उतरले आणि माझ्या भारतीय मनाला पहिली आठवण झाली ती शरीर आणि मन तरतरीत करणाऱ्या फर्मास चहाची! विमानतळावरील उपाहारगृहात बीओएच टी अशी पाटी दिसल्यावर प्रत्येकी ५रिंगेट (अंदाजे ६२रु, )खर्च करून मोठ्ठा ग्लासभर चहा घेतला. एकघोट घेतल्यावरच मळमळते की काय असे वाटू लागले. कितीही साखर घातली तरी पचकट चव जाईना! शेवटी तो चहा तसाच टाकला. पैसे गेल्याचे दुःख वेगळेच! त्यामुळे कनेक्टींग फ्लाईटमध्ये ग्वावा ज्यूस घेण्यास मन धजावेना. परिणाम दुपारी तीन वाजेपर्यंत उपाशी. ओळखपाळख होऊन विद्यापीठाच्या कॅंटिनमध्ये पाऊल टाकले ते मन प्रसन्न होऊनच.