Skip to main content

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी बुधवार, 27/08/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

मला आवडलेले पुस्तक

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 27/08/2008 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत. पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत. त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत. कोठेही असली तरी प्रसंगी अखंडीत वाचीत जावे हे ब्रीद आपण सारेच पाळत असतो. चला मग आपण आपल्याला आवडलेली पुस्तके शेअर करुयात.

मसाज ... एकपात्री शब्दखेळ

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 27/08/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मसाज ...विजय तेंडुलकरांचं हे नाटक.. रूढार्थानं हे नाटक नाही, किंवा एकपात्री प्रयोग म्हणावं तर तसाही नाही हा... ( याला एकपात्री शब्दखेळ असे नाव दिले आहे) हे नाटक पहायचा योग नाही आला, पण पुस्तक सापडलं म्हणून घेऊन आलो.... ज्या माणसाची ही कैफ़ियत तेंडुलकर मांडतात तो त्यांना खरंच भेटला होता आणि त्याचं आयुष्य पाहून त्यांना हे लिहावेसे वाटले....

भयमुक्त -बंधानुरक्त (एक छोटीशी गोष्ट)

लेखक मन यांनी बुधवार, 27/08/2008 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
तो उठला,पंख झटकले,आपलं घरटं आणि त्या सभोवतालची ती दाट जंगलातली तुटकी-पडकी विहिर बघत बघत ,थोडासा आळस देत तो बाहेर पडला. सकाळी सकाळी सुंदर सोनेरी कोवळ्या उन्हाची तिरिप अंगावर घेत प्रसन्नतेने तो उडु लागला. स्वतःच्या लाल चुटुक ओठ, हिरवे गार पंख्,दिमाखदार तोरा आणि एकुणच समग्र सृष्टीत नावाजलं जाणारं रुपडं घेउन, आपल्याच आनंदात स्वच्छंदात गाणी गुणगुणत तो जंगलातुन आला बाहेर आणि समोरच्या शेतावर झेपावु लागला. त्याला मोठीच मौज वाटत होती. इतक्या उंचावरुन माणसही मुंगीइतकी छोटिशी दिसत होती.त्या शेकडो माणसांना गिळुन एकदम उंच भरारी घेणार्‍या त्या पांढर्‍या पक्ष्याइतकीच उंची आज ह्यानही गाठली होती.

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़....

लेखक मनिष यांनी बुधवार, 27/08/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता.

आम्ही मराठी....

लेखक स्नेहश्री यांनी बुधवार, 27/08/2008 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आपण सर्वा मराठीप्रेमी नेहमी अभिमानाने सांगत असतो की आम्ही हे आणि आम्ही ते. पंण आपल्या बाबतीत हिंदी भाषा बोलण्याच्या बाबतीत मात्र आपण काहीवेळा मार खातो (अर्थात याला अपवाद असतात) आज सकाळी गाडी मध्ये एक-दोन किस्से ऍकायला मिळाले... तुमच्याकडे असतील तर तुम्ही ही सांगा... गीता नावाच्य मैत्रिणीने सांगितलेला किस्सा लै भारी होता... तिच्या येथे एका वाड्याचे इमारती मध्ये रुपांतर झाले होते. पण तिकडचे मालक मात्र एकदम साधेसुधे होते.त्यांचा रखवालदार एकदा आल्याआल्या झोपा काढत होता. तेव्हा ते त्याला बघुन चिडुन म्हणाले की "तुम आया बरोबर क्यो सोया था "......

"खेळ खेळूया सारे आपण"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 27/08/2008 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर भेटले.बरेच दिवस मी एकटाच तळ्यावर फिरायला जायचो.भाऊसाहेब आपल्या मुलाकडे काही दिवस राहयाला गेले होते ते मला त्यांच्या मुलीकडून कळलं होतं. मला म्हणाले, "संध्याकाळची मी तुमची खूप आठवण काढायचो.मुलाच्या घरी सुद्धा फिरायला खूप जागा आहे,पार्क्स आहेत पण असं तळं नाही." मी म्हणालो, "भाऊसाहेब,तुमच्या गैरहजेरीत मी काही कविता केल्या आहेत.पुढल्या खेपेला मी तुम्हाला वाचून दाखवीन." भाऊसाहेब म्हणाले, "आज मला तुम्हाला माझ्या लहानपणाची एक गमतीदार गोष्ट सांगायची आहे. ज्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तो गृहस्थ अलिकडेच मला एका दुकानात भेटला होता.प्रथम मी त्याला ओळखलं नाही.सहाजी

मुक्तसुनित ना शुभेच्छा!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 27/08/2008 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मिपाचे सन्माननीय सदस्य, मिपाच्या संपादकीय लेखनाचे पहिले मानकरी तसेच बनीला अमेरिकेची सफर घडवून युरोपला जाणार्‍या विमानात बसवून दिलेले आणि गायन हा एक सुप्त गुण अंगी बाळगणारे मुक्तसुनित उर्फ राजेंन्द्र बापट यांना संपूर्ण मिपा परिवारा तर्फे वाढदिवसाच्या (२७ ऑगस्ट) हार्दिक शुभेच्छा. मुक्तसुनितराव, बनीला युरोप टूर घडवून आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आम्हालाच भेट द्यावी ही विनंती. :) परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो..!! - प्राजु

(...आदिम घास...)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 27/08/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
हा थरकाप उडवणारा...आदिम ध्यास.. हीच आमच्या आदिम घासामागची प्रेरणा! ;) ...आदिम घास... ================================ अमूर्त अनाकलनीय कवितांपासून.. लपूनछपून.. स्वत:ला वाचवत.. फिरत होतो, अगदी तेव्हापासून! मी टाळत होतो... प्रत्येक असह्य कविता... जीवघेण्या प्रतिकांतून.. उपमांच्या कराल जबड्यांतून.. थरकाप उडवणार्‍या रुपकांपासून.. दूर.. दुबळ्या वाचकासारखं जगत..! त्याच विडंबनाच्या ध्यासापोटी.. दुर्बल वाचकाचा लेखक झाला.. लेखकाचा झाला विडंबक... लेखणीत चळ, शब्दात घोळ असलेला... चक्रम.. विक्षिप्त..! आणि त्या बरोबरच जन्माला आली.. वक्रोक्तीतली हूल...