लेखकतु तिथं मीयांनी सोमवार, 01/09/2008 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो
तुम्हाला १ बातमी द्यायची आहे
आपला मराठी उत्सवाची आस्स्मिता जपण्यासाठी व आपला आवडता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मला १ माध्यम मीळाले आहे ते मी आपल्या सगळ्यांना सांगतो. एकदा जरुर पहा.
www.devbappa.com
लेखकस्नेहश्रीयांनी सोमवार, 01/09/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य.
बटाट्यच्या काचर्या एकदम पातळ चिरलेल्या
आलं, मिरची , आणि जिरे एकत्र वाटुन
१ डबा
मीठ, साखर चवी प्रमाणे
नारळ, कोथिंबीर
लिंबु( आवडत असल्यास्..मला आवडते म्हणुन मी घालते ते आवश्यक आहे अस नाही)
पाव चमचा तुप.
क्रुती:-
१ घट्ट झाकणाचा डबा घ्या त्याला पाव चमचा तुप लावुन घ्या.
कोथिंबीर, लिंबु सोडुन सर्वा पदार्था एकत्र करावेत आणि डब्याला झाकण लावुन कुकर मध्ये ३ शिट्या काढा. बारिक चिरलेली कोथिंबीर, लिंबु पिळुन खा.
हा पदार्थ कमी उष्मांकाचे पदार्थ खाणर्यासाठी छान आहे.
आणि चटकन होणारा ही आहे.
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी रविवार, 31/08/2008 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझं आजोळ आजगांवचं.वेंगुर्ल्यापासून आजगांव साधारण दहा मैलांच्या आंत.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी आजोळी जात असू.पहाटे उठून आई वाटेत खाण्यासाठी डब्बा द्यायची.उकडलेल्या बटाट्याची भाजी,पुऱ्या,लसणीची खोबरं घालून चटणी,थोडी वेलची पिवळी केळी.आणि फिर्कीच्या तांब्यात विहीरीचं थंडगार पाणी,असा थाट असायचा.
पहाटे पहाटे निघताना हवा थंड असायची.त्यामुळे सुरवातीचा प्रवास झपाट्याने व्हायचा.
वेंगुर्ल्याच्या बाजारातून वाट काढत निघताना जरा अड्चण यायची,कारण इतक्या पहाटे आजूबाजूच्या गांवातून बरेचशी मंडळी विक्रीसाठी माल घेऊन येत असल्याने चांगली जागा मिळण्य़ासाठी चूरशीत असायची.
बाजारातली चहाची दूकाने अगोदरच उघडले
लेखकविसोबा खेचरयांनी रविवार, 31/08/2008 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी,
(ह्या लेखातल्या ष्टोर्या या सूर्याइतक्या सत्य आहेत. परंतु पात्रांची नावे मात्र बदलली आहेत!)
तसा मी वृत्तीने खुशालचेंडूच! आजपर्यंत लग्नकार्य वगैरे काही केलं नाही. नाही, म्हणजे एक मुलगी तशी मला खूप आवडली होती परंतु तिच्याशी काय आपलं लग्न जमलं नाय बुवा! आमच्या हृदयावर पाय का काय म्हणतात तो देऊन एक भल्या इसमाशी विवाह करून ती बया माझ्या लाईफमधून कायमची चालती झाली. परमेश्वर त्या दोघांना सुखी ठेवो. असो, तो विषय डिटेलमंदी पुन्ना केव्हातरी.
तर काय सांगत होतो? हां! तर आपण अजूनपर्यंत लगीनकार्य वगैरे काय केलेलं नाही.
लेखकपद्मश्री चित्रेयांनी रविवार, 31/08/2008 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
वृषाली ची आमची मुंबई कविता वाचुन माझी एक बरीच अगोदर लिहिलेली कविता आठवली. खुप दिवसानीं.
काही अपरिहार्य इंग्रजी शब्द आहेत्-त्यासाठी क्षमस्व.
धावता धावता एक नजर घड्याळाच्या काट्यावरती
पळणार्या पावलांना , आमच्या मुम्बई ची खास गती
आठ-तीन,आठ-सात कुठली लोकल मिळेल आज
विंडो जर मिळाली तर पोचलेच मग स्वर्गात हात.
नाही तर आहेच लटकत जाणं, तो ही प्रवास एन्जॉय करणं
घामाच्या वा पावसाच्या धारांमध्ये भिजुन जाणं
पाउस ,खड्डे ,मेगा-ब्लॉक..
लेखकपद्मश्री चित्रेयांनी रविवार, 31/08/2008 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-
तीन वाट्या बेसन पीठ, १ वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी तांदूळ पीठ, ३ वाट्या किसलेला गुळ्,दोन मोठे चमचे साजुक तूप, एका नारळाचे दुध, वेलची-जायफळ पूड, मीठ ,काजू.
कृती-
प्रथम सर्व पीठे एकत्र करुन तूपात मंद आचेवर खमंग भाजून घ्यावीत्.गुठ्ळ्या होवु न देता. गूळ नारळाच्या दुधात विरघळवुन त्याचे सरसरीत मिश्रण करुन घ्यावे. पीठ गार झाले कि या मिश्रणात टाकुन वरुन वेलची-जायफळ पूड, मीठ ,काजु टाकावे.
मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत घाटावे.
लेखकवृषालीयांनी रविवार, 31/08/2008 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची मुंबई
असे शहर जेथे सारे काही शक्य आहे खासकरुन अशक्य.
येथे carbon-dioxide हा oxygen पेक्क्षा जास्त आहे.
येथे रस्त्यां नाच कचरापेटी म्हणुन गनले जात आहे.
येथे मनुष्य गोळी घेतल्या खेरीज रात्री झोपु शकत नाही.
येथे दुरध्वनीचे बिल माणसाला जगू देत नाही.
येथे प्रत्येकजण स्वत:ला star समजत आहे.
येथे सायकल सूद्धा कार पे क्षा जलद गतीने धावत आहे.
येथे sky-scrapers मान उंचावून slum कडे पाहत आहेत.
येथे पावसाळ्याचे आगमन होताच घरे कोसळत आहेत.
येथे मनुष्य पहिल्यांदा कॄती करत आहे आणि मग विचार क
लेखकविनायक प्रभूयांनी रविवार, 31/08/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
चायनीज टॉर्चर मध्ये कैद्याला एका खुर्चीवर बसवतात. हातपाय बांधतात. कोणत्याही हालचालीची शक्यता अशी खबरदारी घेतात. एका बालदी मध्ये पाणी भरुन डोक्यावर टांगली जाते. डोक्यावर एकावेळी एकच थेंब पडेल एवढ भोक पाडतात. डोक्याचं पूर्ण मुंडण करतात. पुढचा थेंब केव्हा पडेल ह्याची कैद्याला खात्री नसते. १२ ते २४ तासात कैदी शरण येतो.
असेच काही तरी आजकालच्या शिक्षक जमातीचे होत असावे. शिस्त मोडणार्या मुलांची संख्या वाढते अशी कायमची तक्रार शिक्षक मंडळी करतात. बरं शिक्षा करावी तर कुठला पालक नेमका चॅनेल वाल्याना घेउन उभा राहील ह्याचा नेम नाही. लहान सहान शिक्षेला मुले भिक घालत नाहीत. वर्गात गोंधळ कायम.
लेखकरामदासयांनी रविवार, 31/08/2008 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झालं आणि मी राव झालो.बायकोच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आणि मी पंत झालो. काही वर्षापूर्वी काका पण झालो.नैसर्गीक क्रमानी माझी उत्क्रांती होतेआहे असं म्हणता म्हणता काकापण अचानक खुपायला लागलं.पन्नासाव्वा वाढदिवस झाला त्या दिवशी माझा पुतण्या आला होता. माझ्या हातात एक गुळगुळीत कागदात गुंडाळलेलं पुस्तक देत म्हणाला काका, आता रिटायरमेंट प्लॅनींग कर. ह्या पुस्तकात बघ सगळी माहिती दिलीय. माझी बायको नाक फेंदारत म्हणाली
"हे आणि रीटायर?"
"करेला और निमचढा. " "बाई बाई आताच घरी असतात तेव्हा हा धुडगुस घालतात ."
बोलता बोलता जीभ चावली खरी ....
पण पुतण्या टिर्या बडवत तासभर हसत होता.